MR/Prabhupada 0124 - आपण आध्यात्मिक गुरूंचे शब्द जीवन मरणाचा प्रश्न समजून स्वीकारले पाहिजे

Revision as of 17:53, 1 October 2020 by Elad (talk | contribs) (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


His Divine Grace Srila Bhaktisiddhanta Sarasvati Gosvami Prabhupada's Disappearance Day, Lecture -- Los Angeles, December 9, 1968


तर ते अखंड ब्रम्हचारी होते. भक्तिविनोद ठाकूरांना इतर अनेक मुले होती, आणि तो पाचवा मुलगा होता. आणि त्यांची दुसरी काही भावंड, त्यांनी लग्न केल नाही. आणि माझे गुरु महाराज, त्यांनी पण लग्न केलं नाही. लहानपणापासून ते कडक ब्रम्हचारी होते, भक्तीसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज. आणि त्यांनी हि चळवळ सुरू करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, जागतिक चळवळ. ते त्यांचे मिशन होते. भक्तीविनोद ठाकूर हे करू इच्छित होते. ते, १८९६ साली, भक्तिविनोद ठाकूर ह्या कृष्णभवनामृत चळवळीची ओळख करू देऊ इच्छित होते. श्री चैतन्य महाप्रभु, त्याचे जीवन आणि उपदेश हे पुस्तक पाठवून. सुदैवाने,ते वर्ष माझा जन्म वर्ष होत, आणि श्रीकृष्णांच्या योजनेनुसार,आम्ही संपर्कात आलो. माझा जन्म वेगळ्या कुटुंबात झाला, माझ्या गुरु महाराज्यांचा जन्म वेगळ्या कुटुंबात झाला. कुणाला माहित होते की मी त्यांच्या संरक्षणाखाली येईन? कुणाला माहित होते की मी अमेरिकेला येईन? कुणाला माहित होते की तुम्ही अमेरिकन मुले माझ्याकडे याला? ह्या सर्व श्रीकृष्णांच्या योजना होत्या. आपल्याला माहित नसते कश्या घटना घडतात.

१९३८मध्ये... आज ९ डिसेंबर, १९३८(६८). म्हणजे बत्तीस वर्षापूर्वी. मुंबईमध्ये, मी कुठलातरी धंदा करत होतो. एकाएकी, कदाचित ह्या तारखेला, काहीवेळा ९ किंवा १० डिसेंबर दरम्यान. त्यावेळी, गुरु महाराज थोडे आजारी होते, आणि ते जगन्नाथ पुरीला समुद्राकाठी राहात होते. तर मी त्यांना पत्र लिहिलं. "प्रिय गुरुमहाराज, तुमचे बाकीचे शिष्य,ब्रम्हचारी,संन्यासी, ते तुमची प्रत्यक्ष सेवा करत आहेत. आणि मी गृहस्थ आहे. मी तुमच्या बरोबर राहू शकत नाही, मी तुमची चांगल्याप्रकारे सेवा करू शकत नाही. तर मला समजत नाही. मी तुमची सेवा कशी करू. फक्त कल्पना, मी त्यांची सेवा करण्याचा विचार करत होतो,"मी त्याची प्रामाणिकपणे सेवा कशी करू?" तर १३ डिसेंबर, १९३६ला त्याचं उत्तर आलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं, " प्रिय अमुक तमुक, मला तुझे पत्र बघून आनंद झाला. मला वाटत तू इंग्लिश लोकांत आपली चळवळ पुढ नेण्याचा प्रयत्न कर."असं त्यांनी त्या पत्रात लिहिलं. "आणि ते तुझ्यासाठी आणि जी लोक तुला मदत करतील त्याच्यासाठी चांगलं असेल." आणि मला अशा आहे ..."हा त्यांचा आदेश होता." आणि नंतर १९३६मध्ये, १३ डिसेंबरला - ते म्हणजे हे पत्र लिहिल्यावर, त्यांच्या जाण्याच्या पंधरा दिवस आधी - ते वारले. पण मी माझ्या अध्यात्मिक गुरूंची आज्ञा गंभीरपणे घेतली. पण मी कधीही असा विचार केला नाही की मला अशा अशा गोष्टी केल्या पाहिजेत.

मी त्यावेळी गृहस्थ होतो. पण हि श्रीकृष्णांची योजना होती. जर आपण प्रामाणिकपणे अध्यात्मिक गुरूंची सेवा केली, त्यांची आज्ञा पाळली, श्रीकृष्ण आपल्याला सगळ्या सोयी उपलब्ध करून देतात. हे गुपित आहे. जरी काही शक्यता नव्हती, मी कधी विचार केला नाही,परंतु मी हे गांभीर्याने घेतलं. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या भगवद्-गीतेवरील भाष्याचा अभ्यास करून. भगवद्-गीतेतील श्लोक

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन (भ गी २।४१)

विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ह्या श्लोकावरील भाष्यात म्हणतात. की आपण अध्यात्मिक गुरुंचे शब्द जीवन मरणाचा प्रश्न समजून स्वीकारले पाहिजे. आपण आदेश पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अध्यात्मिक गुरूंचे विशेष आदेश. खूप कडकपणे, आपल्या वैयक्तिक नफा किंवा तोट्याचा विचार न करता. तर मी त्या अनुशंगाने करण्याचा प्रयत्न केला. तर त्याने मला त्याची सेवा करण्यासाठी सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या. गोष्टी इथपर्यंत घडल्या, तेही ह्या म्हतारपणात मी तुमच्या देशात आलो. आणि तुम्हीही ही चळवळ गंभीरपणे घेतलीत,ती समजून घेण्याचा प्रयत्न केलात. आता आपल्याला काही पुस्तक मिळाली आहेत.

तर त्यामुळे ह्या चळवळीला आधार आहे. तर माझ्या आध्यत्मिक गुरूंच्या तिरोभावच्या दिवशी जसे मी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच, मी सुद्धा तुम्हाला विनंती करतो माझी आज्ञा समजून त्याच इच्छा तुम्ही पुऱ्या करा. मी एक वयस्कर माणूस आहे,मी कोणत्याही क्षणी देह सोडला तो निसर्ग नियम आहे. ते कोणालाही माहित नाही. तर ते काही फार आश्चर्यजनक नाही, पण माझे तुम्हाला माझ्या अध्यात्मिक गुरूंच्या तिरोभाव दिवशी आवाहन आहे. की किमान काही प्रमाणात तुम्हाला कृष्णभवनामृत चळवळीचे सार समजले आहे. तुम्ही ते इतरांपर्यंत पोचवा. लोक ह्या कृष्णभावने अभावी दुःख भोगत आहेत.