MR/Prabhupada 0420 - असे समजू नको की तू या जगाची दासी आहेस

The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.


Lecture & Initiation -- Seattle, October 20, 1968

प्रभुपाद: (यज्ञासाठी मंत्रोच्चार करतात, भक्त पुनरूच्चार करतात) आभारी आहे. आता मला जपमाळ द्या. माळ . कोणीतरी… (प्रभुपाद जपमाळेवर जप करतात, भक्त जप करतात) तुझे नाव काय आहे?

बिल: बिल.

प्रभुपाद: तर तुझे आध्यत्मिक नाव आहे विलास-विग्रह. विलास-विग्रह. वि-ला-स-वि-ग्र-ह. विलास-विग्रह. तू इथून सुरवात कर, मोठा मणी: हरे कृष्ण, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, हरे हरे/ हरे राम हरे राम राम राम, हरे हरे. या बोटाला स्पर्श झाला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे पुढील. अशाप्रकारे तू इथपर्यंत ये, परत इथून सुरवात कर या बाजूला. तुझे गुरुबंधू तुला शिकवतील. आणि दहा प्रकारचे अपराध आहेत जे तू टाळले पाहिजेस. ते मी तुला सांगेन. तुझ्याकडे कागद आहे का त्या दहा प्रकारच्या अपराधांचा?

भक्त: हो.

प्रभुपाद: नमस्कार कर. (विलास-विग्रह त्यांच्या पाठून एक एक शब्द म्हणतो) नमा ओम विष्णू-पादाय कृष्ण-प्रिष्ठाय भू-तले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीं इति नामिने हरे कृष्णाचा जप करा आणि आनंदी रहा. आभारी आहे. हरे कृष्ण. (भक्त जप करतात) तुझे नाव?

रोब: रोब.

प्रभुपाद: रोब. तर तुझे आध्यात्मिक नाव आहे रेवतीनंदन. रे-व-ती, रेवती, नंदन, नं-द-न रेवतीनंदन म्हणजे रेवतीचा पुत्र. वासुदेवांच्या पत्नींपैकी एक होती रेवती, कृष्णाची सावत्र आई. आणि बलराम त्याचा मुलगा होता. तर रेवतीनंदन म्हणजे बलराम. तुझे नाव, रेवतीनंदन दास ब्रम्हचारी इथून जपाला सुरुवात कर आणि तसेच पुढे करत जा हरे कृष्ण, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम हरे राम राम राम, हरे हरे. मग पुढचा. अशाप्रकारे, तू या बाजूला ये, परत सुरवात इथपासून कर. तुझे गुरुबंधू तुला शिकवतील. नमस्कार कर. नमस्कार कर. (रेवतीनंदन त्यांच्या पाठून एक एक शब्द म्हणतो) नमा ओम विष्णू-पादाय कृष्ण-प्रिष्ठाय भू-तले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीं इति नामिने आता तुझी माळ घे. जप सुरु कर. (भक्त जप करतात) हे कशाचे बनले आहे? धातू? हे इतके वजनदार का आहे, हे?

तरुण: हि एक बी आहे, स्वामीजी.

प्रभुपाद: ओह, हि बी आहे? ती कसली बी आहे?

तरुण: मला माहित नाही. एक मोठी बी.

प्रभुपाद: हि खूप वजनदार आहे. बंदुकीच्या गोळीप्रमाणे. कृष्ण गोळी. (हशा) (भक्त जप करतात) तर तुझे आध्यात्मिक नाव आहे श्रीमती दासी. श्रीमती. श्री-म-ती. श्रीमती दासी. श्रीमती म्हणजे राधाराणी.

श्रीमती: म्हणजे काय?

प्रभुपाद: श्रीमती म्हणजे राधाराणी. तर राधाराणी दासी म्हणजे तू राधाराणीची दासी आहेस. असे समजू नको की तू या जगाची दासी आहेस. (मंद हसत)) राधाराणीची दासी बनणे खूप भाग्याची गोष्ट आहे. हो. तर श्रीमती दासी, तुझे नाव. तर तू इथून जप सुरु कर, हरे कृष्ण, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम हरे राम राम राम, हरे हरे. मग पुढचा. अशाप्रकारे, तू या बाजूला ये, परत सुरवात कर. कमीतकमी सोळा मला. (श्रीमती त्यांच्या पाठून एक एक शब्द म्हणते) नमा ओम विष्णू-पादाय कृष्ण-प्रिष्ठाय भू-तले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीं इति नामिने ठीक आहे. आनंदी रहा.

श्रीमती: हरे कृष्ण.

प्रभुपाद: तर दहा प्रकारच्या अपराधांचा, तो कागद कुठे आहे? तो कागद कुठे आहे? जपाचे तीन स्तर आहेत. ते काय आहेत?

तरुण: हे एक चित्र आहे जे हिने बनवले आहे.

प्रभुपाद: ओह, तू हे बनवले आहेस? छान. खूप चांगले. आभारी आहे.

जान्हवा: तुमच्या आशीर्वादाने, तुम्ही हे द्याल का? तुमच्या आशीर्वादाने तुम्ही हे शेरॉनला देऊ शकता का?

तरुण: श्रीमती दासी.

प्रभुपाद: ओह. हि भेट आहे.

श्रीमती: आभारी आहे.