MR/Prabhupada 0264 - माया सुद्धा श्रीकृष्णांची सेवा करते, पण तिथे आभार नाही



Lecture -- Seattle, September 27, 1968

तमाल कृष्ण: माया शुद्ध भक्त आहे का? माया. प्रभुपाद: शुद्ध भक्त, नाही, तो मायेच्या अधीन नाही. तमाल कृष्ण: नाही,नाही. माया,मायादेवी एक शुद्ध भक्त आहे? प्रभुपाद: होय, नक्कीच. पोलीस दल,ते सरकारचे प्रामाणिक सेवक नाहीत का? त्याचा अर्थ असा आहे का पोलीस दल तुमच्यावर अत्याचार करत आहे; म्हणून त्यांना सरकारी नोकर मानायचं नाही. त्यांचं कार्य कृतघ्न कार्य आहे,एवढंच. त्याचप्रमाणे,माया सुद्धा श्रीकृष्णांची सेवा करते. पण तिथे आभार नाही. तो फरक आहे. तिने कृतघ्न कार्य हाती घेतले आहे अशा व्यक्तीला शिक्षा करायची जो नास्तिक आहे, एवढेच. तर माया जशी आहे तशी,असं नाही की ती श्रीकृष्णांच्या संपर्कात नाही. वैष्णवी. चांडीमध्ये,माया पुस्तकात,असं सांगितलं आहे की "वैष्णवी." मायेचं वर्णन वैष्णवी म्हणून केलं आहे. ज्याप्रमाणे शुद्ध भक्ताला वैष्णव म्हणतात, तिचे सुद्धा वर्णन वैष्णवी केलं आहे. विष्णूजन: तुम्ही सर्वकाही कसे समजायला सोपं करून सांगता? प्रभुपाद: कारण संपूर्ण तत्वज्ञान इतकं सोपं आहे. देव महान आहे;तुम्ही महान नाही. तुम्ही देव आहात असे म्हणू नका. देव नाही असा दावा करु नका. देव आहे,आणि आहे, आणि तुम्ही लहान आहात. मग तुमची स्थिती काय आहे? तुम्ही श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे. हे साधं सत्य आहे. तर हि बंडखोर वृत्ती माया आहे. जोकोणी घोषणा करतो की "देव नाही आहे. देव मृत आहे.मी देव आहे.तुम्ही देव आहात." ते सर्व मायाजालात फसले आहेत. पिशाची पैले येन मति-छन्न हय. ज्याप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती भुताने झपाटलेला असतो, तो मुर्खासारखी बडबड करतो. तर ही सर्व माणसं मायेने झपाटलेली आहेत, आणि म्हणून ते म्हणतात,"देव मृत आहे,मी देव आहे. तुम्ही सगळीकडे देवाला कशाला शोधता? रस्त्यावर अनेक देव फिरत आहेत. ते सर्व भुताने झपाटलेले, भ्रमिष्ट आहेत. तर आपण त्यांना हरे कृष्णाच्या दिव्य कंपनाने बरे केले पाहिजे, केवळ हीच बरे करण्याची पद्धत आहे. त्यांना फक्त ऐकू दे आणि हळूहळू ते बरे होतील. ज्याप्रमाणे एखादी माणूस गाढ झोपला आहे,तुम्ही त्याच्या काना जवळ जाऊन रडलात आणि तो जागा होतो. झोपलेल्या मानव समाजाला जाग करण्याचा हा मंत्र आहे. उत्तिष्ठ उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान निबोधत वेद सांगतात,"हे मानव जात, कृपया उठ. आणखी झोपू नको. तुला या मानव शरीरात संधी मिळाली आहे. तिचा उपयोग कर. मायेच्या तावडीतून स्वतःला बाहेर काढ." हि वेदांची घोषणा आहे. तर ते काम तुम्ही करत आहात. हरे कृष्ण,हरे कृष्णाचा जप आणि ते होतील… भक्त: हरे कृष्ण! प्रभुपाद: हो? जय गोपाल: भूतकाळ,वर्तमानकाळ, भविष्यकाळ भौतिक अर्थाने त्याचंच विकृत प्रतिबिंब आहे… प्रभुपाद:होय,भूतकाळ,भविष्यकाळ,वर्तमानकाळ विविध प्रकारच्या सापेक्षतेनुसार आहे. हा एक वैज्ञानिक पुरावा आहे. प्रोफेसर आइनस्टाइननी सिद्ध केले आहे. ज्याप्रमाणे तुमचा भूतकाळ ब्रम्हाचा भूतकाळ नाही. तुमचा वर्तमानकाळ मुंगीचा वर्तमानकाळ नाही. तर भूतकाळ,वर्तमानकाळ,भविष्यकाळ - काळ शाश्वत आहे. हे शरीराच्या विविध आकाराच्या सापेक्षतेनुसार आहे. काळ शाश्वत आहे. ज्याप्रमाणे छोटी मुंगी. चोवीस तासात तिला चोवीस वेळा भूत,वर्तमान आणि भविष्यकाळ आहे. उपग्रहाच्या, रशियाच्या उपग्रहाने, पृथ्वीला एका तास पंचवीस मिनिटात गोल फेरी मारली,किंवा असंच काहीतरी. मला म्हणायचं आहे, पृथ्वीला पंचवीस वेळा फेरी मारली. त्याचाअर्थ एक तास पंचवीस मिनिटात,उपग्रहातील व्यक्तीने दिवस आणि रात्र पंचवीस वेळा पहिले. तर उच्च वातावरणात भूतकाळ आणि वर्तमानकाळ वेगळे आहेत. तर भूतकाळ,वर्तमानकाळ,भविष्यकाळ शरीरानुसार,परिस्थितीनुसार सापेक्ष आहेत, वास्तविक इथे भूतकाळ,वर्तमानकाळ,भविष्यकाळ असं काही नाही. सर्व काही शाश्वत आहे. तुम्ही शाश्वत आहात. नित्य: शाश्वतोSयं न हन्यते हन्यमाने शरीरे(भ गी २।२०) आपण मरणात नाही. म्हणून… लोकांना माहित नाही की मी शाश्वत आहे. माझा शाश्वत संबंध काय आहे? माझे शाश्वत जीवन काय आहे? ते केवळ आजच्या आयुष्यावर मोहित झाले आहेत: मी अमेरिकन आहे," "मी भारतीय आहे," "मी हा आहे," "मी तो आहे." एवढेच. हे अज्ञान आहे. तर आपल्याला श्रीकृष्णांबरोबरचा शाश्वत संबंध शोधला पाहिजे. मग तो आनंदी होईल. धन्यवाद.