MR/Prabhupada 0291 - मी अधिनस्थ होऊ इच्छित नाही, झुकू इच्छित नाही, हा तुमचा आजार आहे



Lecture -- Seattle, September 30, 1968

प्रभुपाद: होय? युवक: तुम्ही पुन्हा अधीनता समजावून सांगू शकाल का? तमाल कृष्ण: पुन्हा अधीनता समजावून सांगा. प्रभुपाद: अधीनता, ते सोपं आहे. तुम्ही अधीन आहात. तुम्हाला अधीनता म्हणजे काय समजत नाही? हे खूप कठीण आहे का? तुम्ही कोणाच्याही अधीन नाही आहात का? युवक: बरं, हो, मला वाटत, तुम्ही म्हणू शकता मी होतो. प्रभुपाद: होय. आवश्यक आहे. प्रत्येकजण. प्रत्येकजण आधीन आहे.अधिनस्थ. युवक: अर्थात, अध्यात्मिक दृष्टीने, मला अधिनस्थ वाटत नाही… प्रभुपाद: सगळ्यात प्रथम अध्यात्मिक जीवन काय आहे ते समजून घ्या. मग… अध्यात्मिक दृष्टीने सुद्धा तुम्ही अधिनस्थ आहात कारण तुमची प्रकृती अधीनता आहे. अध्यात्मिक,अध्यात्मिक आणि भौतिक म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? युवक: जसे, माझे शरीर एका खास ठिकाणी आहे आणि वेळ आणि हे सगळे (अस्पष्ट) जर मला नोकरी असेल तर मी माझ्या मालकाचा अधिनस्थ आहे, पण वास्तविक,माझे संपूर्ण अस्तित्व,माझे वास्तविक अस्तित्व, माझे आंतरिक अस्तित्व नाही… मला असे वाटत नाही की मी माझ्या मालकाच्या अधीन आहे. मला वाटत कि आपण तितकेच कमी किंवा समान असू. अस्थायी अर्थाने… प्रभुपाद: होय. हि चेतना खूप छान आहे की तुला आपल्या मालकाच्या अधीन होण्यात असंतोष वाटत आहे. आहे की नाही? युवक: नाही, ते बरोबर नाही. प्रभुपाद: मग? युवक: मी विशेषतः नाही… प्रभुपाद: कोणीही. युवक: मला वाटत नाही की… या विशिष्ट घटने विषयी बोलताना, हे जरुरी नाही की मला त्या व्यक्तीबद्दल मत्सर वाटतो कारण तो माझा मालक आहे. परंतु मला असे वाटते की आपले अस्तित्व अधिकतर समानच आहे. म्हणजे,तुम्हाला माहित आहे, हा माझा सिद्धांत आहे. मला नाही वाटत की मी कुणा समोर झुकले पाहिजे आणि कोणी माझ्या समोर झुकले पाहिजे. प्रभुपाद: का? का? का झुकायचे नाही? का? युवक: कारण मला असे वाटते की मी त्याचे काही देणं लागत नाही किंवा तो माझे काही देणं लागत नाही. प्रभुपाद: हा रोग आहे. आपल्याला झुकण्यासाठी भाग पाडले जात आहे आणि आपण विचार करतो की "मला झुकायला आवडत नाही." हा रोग आहे. युवक: त्याने मला वाकायला भाग पडले नाही. प्रभुपाद: होय. युवक: त्याने मला काही करायला भाग पडले नाही. मी तिथे आहे आणि तोही तिथे आहे. प्रभुपाद: नाही. फक्त समजून घेण्याचं प्रयत्न कर. हा फार चांगला प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की "मी झुकू इच्छित नाही." हे नाही का? युवक: होय, ते मूलभूत सत्य आहे. प्रभुपाद: होय.का? युवक: कारण मला असे वाटत नाही की मी कनिष्ठ आहे… प्रभुपाद: तो रोग आहे. तुम्ही स्वतःच स्वतःच्या रोगाचे निदान केले आहे. हा भौतिकवादाचा रोग आहे. प्रत्येकजण विचार करत आहे की "मला मालक बनायचे आहे. मला स्वतःला झुकायचे नाही." प्रत्येकजण विचार करत आहे,केवळ तुम्ही नाही,प्रयत्न करा, मला हे पूर्ण करू दे. हा रोग आहे.भौतिक रोग.सर्व प्रथम समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा तुमचा आजार किंवा माझा आजार नाही. प्रत्येकाचा हा आजार आहे,की "मी का खाली झुकू? मी काअधिनस्थ होऊ?" पण निसर्ग मला अधिनस्थ बनण्यास भाग पाडत आहे. आता कोणाला मृत्यूला कवटाळायचे आहे? लोक का मरत आहेत? तुम्ही याचे उत्तर देऊ शकाल का? युवक: लोक का मरत आहेत? प्रभुपाद: होय. कोणालाच मृत्यू नको आहे. युवक:मला वाटले की हे जैविक आहे… प्रभुपाद:फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. येथे कोण आहे…म्हणजे जैविक शक्ती. तुम्ही जीवशास्त्राच्या अधिनस्थ आहात. मग तुम्ही असे का म्हणता की तुम्ही स्वतंत्र आहात? युवक: ठीक आहे, मला वाटते की मी आहे… प्रभुपाद:तुम्हाला चुकीचे वाटत आहे. हा माझा मुद्दा आहे. तो तुमचा आजार आहे. युवक: मला एकटे वाटत आहे? प्रभुपाद: होय, चुकीचे. युवक: चुकीचे? प्रभुपाद: होय. तुम्ही अधिनस्थ आहात. तुम्हाला झुकलेच पाहिजे. जेव्हा मृत्यू येईल, तुम्ही असे म्हणू शकत नाही, "अरे,मी तुझी आज्ञा पाळणार नाही." म्हणून तुम्ही अधिनस्थ आहात. युवक: होय,मी भगवंतांचा अधिनस्थ आहे. प्रभुपाद: नाही,नाही,नाही… देवाला विसरून जा. आता आम्ही सामान्य ज्ञानाबद्दल बोलत आहोत. युवक:कृष्ण… मी नाही… प्रभुपाद: नाही. कृष्णाबद्दल बोलू नका. ते फार दूर आहे. तुम्ही फक्त समजण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला मृत्यू नको आहे, तुम्हाला मरणासाठी का जबरदस्ती केली जाते? युवक: मला का मरणासाठी जबरदस्ती केली जाते? प्रभुपाद: होय. कारण तुम्ही अधिनस्थ आहात. युवक: हो. प्रभुपाद: होय. मग तुम्ही तुमची स्थिती समजा, की तुम्ही अधिनस्थ आहात. तुम्ही जाहीर करू शकत नाही की "मी मुक्त आहे. मी अधिनस्थ नाही." जर तुम्ही इच्छित असाल की "मी अधिनस्थ होऊ इच्छित नाही,खाली झुकू इच्छित नाही," तो तुमचा आजार आहे. युवक: तुम्ही काय करू इच्छित आहात… काय… प्रभुपाद: नाही, सर्व प्रथम तुमचा आजार समजण्याचा प्रयत्न करा. मग आम्ही तुमचे औषध ठरवू. युवक: ठीक आहे. मी चुकीचा विचार करत आहे, पण मी कोणाला किंवा काय… मी नेमका कोणासमोर झुकू,मला म्हणायचे आहे…

प्रभुपाद; तुम्ही प्रत्येकासमोर झुकत आहात. तुम्ही मृत्यूसमोर झुकत आहात, तुम्ही आजारासमोर झुकत आहात. तुम्ही वृध्दापकाळासमोर झुकत आहात. तुम्ही इतक्या गोष्टीपुढें झुकत आहात.तुम्हाला सक्ती केली जाते. आणि तरीही तुम्ही विचार करता की "मी झुकू शकत नाही. मला आवडत नाही." कारण तुम्ही म्हणता "मला आवडत नाही." म्हणून सक्ती केली जाते. तुम्हाला झुकलेच पाहिजे. तुम्ही तुमची स्थिती का विसरलात?तो तुमचा आजार आहे. म्हणून पुढली प्रक्रिया हि की " मला खाली झुकणे भाग पाडले जाते." आता आपण शोधून काढले पाहिजे "मी कुठे खाली झुकूनसुद्धा आनंदी राहू शकतो?" तो श्रीकृष्ण आहे. तुमचे झुकणे थांबणार नाही,कारण तुम्ही त्यासाठीच आहात. श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीसमोर झुकला,तुम्ही आनंदी व्हाल. त्याची तपासणी करा. तुम्ही झुकले पाहिजे. जर तुम्ही श्रीकृष्णांपुढे आणि त्यांच्या प्रतिनिधींपुढे झुकला नाहीत, तर तुम्हाला दुसऱ्या कशा पुढेतरी झुकावे लागेल, माया. ती तुमची स्थिती आहे. तुम्ही कोणत्याही क्षणी मुक्त होऊ शकत नाही. पण तुम्हाला वाटेल… जसे एक मूल आपल्या पालकांसमोर चोवीस तास झुकते. ते खुश आहे. तो खुश आहे. आई सांगते, "माझ्या प्रिय बालका,इथे खाली बैस." ते खुश असते. हा स्वभाव आहे. केवळ कुठे झुकले पाहिजे हे शोधणे आवश्यक आहे,बस एवढेच. तो कृष्ण आहे. तुम्ही तुमचे खाली झुकणे थांबवू शकत नाही. पण आपण कुठे झुकले पाहिजे ते बघावे लागेल. एवढेच. जर तुम्ही कृत्रिमपणे विचार करता की "मी कोणापुढेही झुकणार नाही. मी स्वतंत्र आहे,"तर तुम्ही दुःखी होता. केवळ तुम्हाला कुठे झुकायचे ती योग्य जागा शोधावी लागेल. एवढेच. ठीक आहे. जप करा.