MR/Prabhupada 0362 - जसे आपले बारा जीबीसी आहेत, तसेच श्रीकृष्णाचे जीबीसी आहेत



Lecture on SB 1.13.15 -- Geneva, June 4, 1974

तुम्ही रस्त्यावरून चालत असताना, जर तुम्ही एक मुंगी मारलीत, तुम्हाला शिक्षा होईल. हा निसर्ग नियम आहे. आपण अशा धोकादायक स्थितीत आहोत. प्रत्येक हालचालीवर शिक्षा आहे. आता, जर तुम्ही शास्त्रावर विश्वास ठेवलात, तर ती वेगळी गोष्ट आहे. जर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्हाला हवे ते तुम्ही करा. पण शास्त्रावरून आपण निसर्ग नियम किंवा देव, खुप कठोर, खूप खूप कठोर आहे हे समजू शकतो. तर मंडूक मुनींनी सुद्धा यमराजावर चिडले, की " माझ्या बालपणी, अजाणतेपणी मी काही केले, आणि त्यासाठी तू त्याची मला इतकी मोठी शिक्षा दिलीस. अजाणतेपणी मी काही केले, आणि त्यासाठी तू त्याची मला इतकी मोठी शिक्षा दिलीस. तर त्याला शूद्र बनण्याचा शाप दिला. म्हणून यमराजाने विदुराच्या रूपात जन्म घेतला आणि शूद्र आईच्या पोटी जन्म घेतला. हा विदुराच्या जन्माचा इतिहास आहे.

तर त्याच्या अनुपस्थितीत, अर्यमा एक देवता, त्याला यमराज म्हणून नियुक्त केले. म्हणून असे म्हंटले जाते, अबिभ्रद अर्यमा दंडं. कार्यालय चालू राहिले पाहिजे, दंडाधिकारी पद रिक्त असू शकत नाही. कोणीतरी येऊन कार्य केले पाहिजे. तर अर्यमा काम करत होता. यथावद अघ-कारिषु वाघ-कारिषु. अघ-कारि म्हणजे… अघ म्हणजे पापकर्म, आणि कारीषु. कारिषु म्हणजे ते जे पापकर्म करतात. आणि यथावत. यथावत म्हणजे नेमके काय आहे, त्याला शिक्षा कशी दिली जावी. यथावत अघ-कारीषु. यावद दधार शुद्रत्वम. जोपर्यंत यमराज शुद्र म्हणून जगत होता, तोपर्यंत अर्यमा यमराजाच्या जागी कार्यरत होता. हा त्याच अर्थ आहे.

(तात्पर्य वाचतात:) "विदुर, शूद्र आईच्या पोटी जन्मला आले होते. त्यांना विरोध केला होता. अगदी त्यांचे भाऊ धृतराष्ट्र आणि पांडू यांच्याबरोबर राजकीय वारसा हक्क मिळण्यात. कसे ते प्रचारक बनून सूचना देऊ शकतात अशा विद्वानाला…? उत्तर आहे की अगदी जरी स्वीकारले की ते जन्माने शूद्र असले तरी कारण त्यांनी मैत्रेय ऋषींच्या अधिकाराने आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी जगाचा त्याग केला. आणि ते पूर्णपणे दिव्य ज्ञानाने शिक्षित होते, ते आचार्य किंवा आध्यात्मिक गुरूच्या पदावर विराजमान व्हायला सक्षम होते. विदुर शूद्र जन्मले होते, मग ते कसे प्रचारक बनले?

तर कारण आहे… " श्री चैतन्य महाप्रभूंच्या मते. जो कोणी दिव्य ज्ञान किंवा देवतांच्या विज्ञानात प्रवीण असतो, जरी तो ब्राम्हण किंवा शूद्र किंवा गृहस्थ किंवा सन्यासी असो, आध्यात्मिक गुरु बनण्यास पात्र आहे. असे नाही की कारण तो शूद्र आहे, तो प्रचार करू शकत नाही. तो आचार्य किंवा आध्यात्मिक गुरुचे पद स्वीकारू शकत नाही. ते चैतन्य तत्वज्ञान नाही. चैतन्य तत्वज्ञानाचा या शरीराशी, बाह्य शरीराशी काही संबंध नाही. चैतन्य तत्वज्ञानाचा आत्म्याशी संबंध आहे. हे अंदोलन आत्म्याच्या उन्नतीसाठी आहे, आत्म्याचे पतन होण्यापासून वाचवण्याचे. म्हणून काहीवेळा लोक आश्चर्यचकित होतात. शारीरिक जीवनाची संकल्पना, तीच कार्य कर्म होतील. आध्यात्मिक जीवनाच्या स्तरावर, तेच कर्म भक्ती होते. तेच कर्म भक्ती होते. तर भक्ती म्हणजे निष्क्रियता नाही. भक्ती सक्रियता आहे. यत्करोषि यज्जुहोषि यत्तपस्यसि कुरुश्व तद मदर्पणम (भ.गी. ९.२७) हि भक्ती आहे, भक्ती-योग. कृष्ण सर्वाना सांगतात, "जर तुम्ही कर्म सोडून देऊ शकत नसाल तर ठीक आहे. पण तुमच्या कर्माचे परिणाम मला द्या. मग ती भक्ती असेल." तर विदुर यमराज होता. तो केवळ यमराज नव्हता, पण तो महाजनांपैकी एक आहे. शास्त्रामध्ये बारा महाजनांचा उल्लेख आहे. त्यापैकी एक यमराज आहे. बलीर वैयासकीर वयम्. हे श्रीमद भागवतामध्ये सांगितले आहे. यमराज कृष्णाच्या जीबीसीतील एक आहे. होय. जसे आपल्याकडे बारा जीबीसी आहेत, तसेच कृष्णाचे बारा जीबीसी आहेत. स्वयम्भुर्नारदः शम्भुः कुमारः कपिल मनुः प्रल्हादो जनको भिष्मोबलिर्वैयासकिर्वयम् :(श्रीमद भागवतम् ६.३.२०)

बारा पुरुषांना कृष्णभावनामृत प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे. तर आपण अनुसरण केले पाहिजे. महाजनो येन गतः स पंथाः (चैतन्य चरितामृत मध्य १७.१८६) म्हणून आम्ही जीबीसी तयार केले आहेत. तर त्यांना खूप जबाबदारीने वागले पाहिजे. अन्यथा, त्याना शिक्षा होईल. त्यांना शूद्र बनण्याची शिक्षा होईल. जरी यमराज जीबीसी असला तरी, पण त्यांनी थोडीशी चूक केली. त्याला शुद्र बनण्याची शिक्षा करण्यात आली. तर जे जीबीसी आहेत, त्यांना इस्कॉनच्या कार्याचे व्यवस्थापन करण्यासाठी खूप काळजी घेतली पाहिजे नाहीतर त्यांना शिक्षा होईल. जसे पद मोठे आहे तसेच शिक्षाही मोठी आहे. हि अडचण आहे. तुम्ही विदुराच्या उदाहरणावरून पाहू शकता. त्यांना ताबडतोब शिक्षा झाली. त्यांनी थोडी चूक केली. कारण ऋषी, मुनी, ते शाप देतात.