MR/Prabhupada 0426 - जो शिकला आहे, तो जिवंत किंवा मृत शरीरासाठी विलाप करत नाही



Lecture on BG 2.11 -- Edinburgh, July 16, 1972

प्रभूपादा - भाषांतर.

प्रद्युम्न भाषांतरः आर्शिवादित परमेश्वर म्हणाले ः तुम्ही अश्या गोष्टींचे शोक करताय, ज्याचे दुःख करण्या लायक नाही. जे ज्ञानी आहेत, ते ना जीवनाचा आणि ना मरणा चा शोक करतात. (BG 2.11)

प्रभूपादा - आर्शिवादित परमेश्वर म्हणाले ः तुम्ही अश्या गोष्टींचे शोक करताय, ज्याचे दुःख करण्या लायक नाही. जे ज्ञानी आहेत, ते ना जीवनाचा आणि ना मरणा चा शोक करतात. हे कृष्णा चे तत्व ज्ञान, कृष्ण चेतना मध्ये जागृति चा मुख्य निर्धार हा आहे कि मनुष्या ला हे समजावणे कि जीवना चे अस्तित्व काय आहे आणि याचे जडण घडण कसे होते. इथे असे सांगितले आहे कि ज्याला हे कळते, असा मनुष्य जीवन आणि मरणा च्या पलिकडे जातो. त्यांना ना जीवना चा मोह असतो, आणि ना मरणा चा शोक असतो. त्यांना पुढच्या श्रेणीतून बाहेर काढलं पाहिजे. त्यांना काढलं पाहिजे. त्यांनी मागे जावं वर्तमान काळातली ही सभ्यता शारीरिक संकल्पने वर आधारित आहे. " मी हे शरीर आहे." मी भारतीय आहे." मी अमेरिकन आहे. " मी हिन्दू आहे. मी मुस्लिम आहे. मी काळा आहे. . मी गोरा आहे. इत्यादि..... संपूर्ण मानवी सभ्यता शारीरिक संकल्पनेवर आधारित आहे व चालली आहे. सगळी कडे विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थानात शिकण्या वर भर दिलाय आणि त्यात प्रगति पण झाली आहे. पण कुठेही हे शिकवले जात नाही, ना कधी या वर चर्चा होते, कि " मी कोण आहे.......?" उलट शिक्षणाच्या नावा खाली चुकी चे शिकवले जाते कि तुम्ही या भूमी वर जन्मलाय, तुम्हाला राष्ट्रा बद्दल आपलेपणा असला पाहिजे. तथाकथित राष्ट्रवाद शिकवला जातो. पण कुणी हे नाही शिकवत कि त्याचे स्वतः अस्तित्व काय आहे. अर्जुनाची पण कुरूक्षेत्राच्या रणभूमित अशीच अवस्था झाली. तिथे युद्ध झाले. हा महान भारतात झालेल्या महाभारताचा इतिहास आहे. याला महाभारत म्हणतात. भगवद्गीता महाभारताचा एक भाग आहे. महाभारत म्हणजे महान भारत किंवा महान पृथ्वितल... तर महान भारताच्या इतिहात दोन चुलत भावान मघले युद्ध होते. पांडव आणि कौरव मधले युद्ध. पांडव आणि कौरव दोघे कुरू वंशातले, एकाच कुटुंबातले होते. त्या वेळेस, ५००० वर्षांन पूर्वी, कुरूवंश पूर्ण जगावर राज्य करित होते. पण आज भारत वर्ष हा एक तुकडा राहिला आहे. पूर्वी, हे पृथ्वितल भारत वर्ष या नावाने ओळखले जायचे. याच्या आधी पाच हजार वषापूर्वी पृथ्वी ला वर्ष म्हणून ओळखले जात होते. पण तेव्हा भरत नावाचा राजा होऊन गेला. त्याच्या नावावर, पृथ्वी तला ला भरत खंड हे नाव पडले. पण हळु हळु काल परिवर्तन झाले आणि लोक एक खंडा पासून विभक्त झाले. जसे आपण भारतात अनुभवले आहे. २० , २५ वर्षांन् पूर्वी पाकिस्तान नव्हते. पण कुठल्या न कुठल्या प्रकारे, आणखी वेगळा भाग पाकिस्तान म्हणून तयार झाला. खर तर, खूप खूप वर्षां पूर्वी पर्यंत या पृथ्वी चे वेगळे भाग नव्हते. पृथ्वी एक, तर राजा पण एक होता व संस्कृति पण एक होती. वैदिक संस्कृति होती, आणि राजा पण एक होता. जसे मी सांगितले, कुरू वंशी राजांनी जगावर राज्य केले. त्यांची राजेशाही होती. तर ते एकाच कुटुंबातल्या दोन चुलत भावान मघले युद्ध होते हाच भगवद्-गीते चा मुख्य आधार आहे. भगवद्-गीता युद्धभूमी वर म्हटली गेली. युद्धभूमी वर वेळ कमी मिळेल. भगवद्-गीता म्हटली गेली जेव्हा दोन गट युद्धभूमि वर भेटले. आणि अर्जुनाने जेव्हा पाहिले कि पली कडच्या सेनेत सर्व त्याचेच कुटुंबीय आहेत, हे आणि दोन भावां मधले युद्ध आहे, तेव्हा तो खूप हळवा आणि संवेदनशील होऊन गेला. आणि कृष्णाला म्हणाला, कि " हे माझ्या प्रिय कृष्णा, मी ह्या युद्धात भाग नाही घेऊ शकत. " माझ्या भावंडांना राज्या चा उपभोग घेऊ दे. मी त्यांना युद्धात नाही मारू शकत. भगवद् गीतेचा हा मुख्य विषय आहे. पण कृष्णाने त्याला प्रेरित केले कि तू एक क्षत्रिय आहेस. युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. तुझ्या कर्तव्या पासुन तू विन्मुख आणि विचलित का होत आहेस.