MR/Prabhupada 1057 - भगवत गीतेला गितोपनिशद असे ही म्हणतात, वैदिक ज्ञानाचे सार



660219-20 - Lecture BG Introduction - New York

प्रभुपाद:

ऊँ अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाज्जनशलाकया।
चक्षुरून्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।।

(मी माझ्या गुरूंना सादर प्रणाम करतो, मी घोर अज्ञानाच्या अंधकारात उत्पन्न झालो होतो, आणि माझ्या गुरूंनी आपल्या ज्ञान रूपी प्रकाशाने माझे डोळे उघडले.)

श्री चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले।
स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्।।

(श्रील रूप गोस्वामी प्रभुपाद, ज्यांनी या भौतिक जगात चैतन्य महप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापन केले आहे, मला कधी आपल्या चरणकामलांचा आश्रय प्रदान करतील?)

वन्दे श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च।
श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवम्।।
साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं।
श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च।।

(माझे आध्यात्मिक गुरू आणि आणि भक्ति मार्गातील इतर गुरूंच्या चरणकामलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो. मी सर्व वैष्णवांच्या चरणकामलांशी सादर प्रणाम अर्पण करतो. मी श्रील रूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू सनातन गोस्वामी तसेच रघुनाथ दास आणि रघुनाथ भट्टनि श्रील जीव गोस्वामी यांच्या चरणकामलांशी सादर प्रणाम करतो. मी श्री अद्वैत आचार्य प्रभूंना, श्री नित्यानंद प्रभूंना, श्री चैतन्य महप्रभूंना आणि त्यांच्या भक्तांना, श्रीवस ठाकुरांच्या पुढाकरात असलेल्या भक्तांना, मी सादर प्रणाम करतो. मी श्री कृष्ण आणि श्रीमती राधाराणी तसेच श्री ललिता आणि विशाखा या त्यांच्या साखिंनच्या चरणकामलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो.)

हे कृष्ण करूणासिन्धो दीनबन्धो जगतपते।
गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तु ते।।

(हे श्रीकृष्ण! तुम्ही दुःखीजनांचेमित्र आणि सृष्टीचे निर्माते आहात. तुम्ही गोपींचे स्वामी आणि राधाराणीचे प्रियकर आहात. मी तुम्हाला सादर प्रणाम करतो.)

तप्तकाच्चन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी।
वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये।।

(मी राधाराणीला प्रणाम करतो, जीची अंगकांती तप्त, द्रवरूप सुवर्णा प्रमाणे आहे व जी वृंदावनाची राणी आहे. तू वृषभानू राजाची सुपुत्री आहेस तसेच भगवान श्री कृष्णास तू अत्यंत प्रिय आहेस.)

वांछा कल्पतरूभ्यश्च कृपासिन्धु एव च।
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम:।।

(मी भगवन्ताच्या सर्व वैष्णव भक्तांना सादर प्रणाम करतो. जे कल्पवृक्षा प्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि जे पतित जीवांच्या प्रती अत्यंत दयाळू आहेत.)

श्रीकृष्ण चैतन्य प्रभुनित्यानन्द।
श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द।।

(श्री कृष्ण चैतन्य, नित्यानंद प्रभू, श्रीअद्वैत, गदाधर, श्रीवस आणि भक्ति परंपरेतील सर्वांना मी सादर प्रणाम करतो.)

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।

(हे प्रभू, हे दिव्य शक्ति, कृपा करून मला तुमची सेवा द्यावी. मी आता भौतिक जगात रंजलो आहे. तर कृपा करून मला तुमची सेवा द्यावी.)

गितोपनिषदाचे उपोद्घात - ए सी भक्तिवेदान्त स्वामी. श्रिमद भागवत व इतर ग्रहांनचा सुगम प्रवास यांचे लेखक, जाऊ देवाचीया गावा याचे संपादक, इत्यादी.

भगवत गीतेला गितोपनिशद असे ही म्हणतात, वैदिक ज्ञानाचे सार, तसेच वैदिक साहित्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण उपनिषद् आहे. भगवद्गितेवर इंग्रजीमधे अनेक भाष्ये लिहिली गेली आहेत व एखाद्याच्या मनात आणखी एका भाष्याच्या गरजेबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रस्तुत आवृत्तीबद्दल पुढील प्रमाणे स्पष्ट समर्थन करणे शक्य आहे. एक श्रीमती शार्लट ल ब्लॅंक नामक, एका अमेरिकन महिलेने, मला विचारले की इंग्रजी भाषेतील कोणत्या तरी अनुवादची शिफारस करावी. भगवद्गीतेच्या इंग्रजीमधील अनेक आवृत्या अमेरिकेत उपलब्ध आहेत. पण माझ्या पाहण्यात तरी, केवळ अमेरिकेतच नव्हे पण भारतात सुद्धा जिला पूर्णपणे अधिकृत म्हणता येईल अशी गीतेची एकही आवृत्ती नाही. कारण बहुतेक प्रत्येक प्रकारच्या आवृतीत भाष्यकाराने आपली स्वतःची मते प्रदर्शित केली आहेत, पण "भगवद्गीता जशी आहे तशी" म्हणजेच यथार्थ रूपात प्रस्तुत केली नाही.

भगवद्गीतेचा मूळ आशय खुद्द भगवद्गीतेतच सांगितला आहे. तो याप्रमाणे आहे: आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असेल तर औषधावरलिहिलेल्या निर्देशांनुसारच ते घेतले पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिन्तकाच्या निर्देशांनुसार औषध घेऊ शकत नाही. त्यावरील लिखीत आदेशानुसार अथवा वैध्यांच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसार मान्य अथवा स्वीकार केली गेली पाहिजे.