MR/Prabhupada 0091 - तुम्ही इथे उघडे उभे रहा: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN TRANSLATED TEXT --> धर्माध्यक्ष: आजकाल त्यांना प्रत्यक्षात आपली चूक लक्...")
(No difference)

Revision as of 13:32, 8 March 2018



धर्माध्यक्ष: आजकाल त्यांना प्रत्यक्षात आपली चूक लक्षात येत आहे आणि ते जास्त मृत्यूविषयीचा अभ्यास करायला लागले. लोकांना मृत्यूला सामोरे जाण्यासाठी तयार करत आहोत पण फक्त एकच गोष्ट ते त्यांना सांगू शकतात की,"स्वीकार करा." फक्त एकच गोष्ट ते करू शकतात की त्यांना सांगायचं,"तुमचा मृत्यू जवळ आला आहे. म्हणून त्याचा आनंदी वृत्तीने स्वीकार करा."

प्रभूपाद : पण माझी मारायची इच्छा नाही.मी का आनंदी होईन. तुम्ही दुष्ट माणसं, तुम्ही सांगता,"खुश व्हा." (हशा) "आंनदाने,तुम्हाला फाशी होऊ शकते."(हशा) वकील म्हणतील, "हरकत नाही. तुम्ही खटला हरला आहात. आता तुम्ही हसत हसत फाशी जा." (हशा)

धर्माध्यक्ष: हेच प्रत्यक्षात मानसशास्त्राचे ध्येय आहे, लोकांना खऱ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता की ज्यामुळे ते ह्या भौतिक जगात राहतील. आणि जर तुम्हाला हे भौतिक जग सोडायची थोडी जरी इच्छा असेल,तर ते सांगतील कि तुम्ही वेडे आहेत. "नाही,नाही. आता तुम्हाला भौतिक परिस्थितीशी जास्त जुळवून घ्यायला पाहिजे."

बहुलाश्व: ते तुम्हाला आयुष्यातील निराशा पचवायला शिकवतात. ते तुम्हाला शिकवतात की तुम्ही आयुष्यातील निराशा स्वीकारा.

प्रभुपाद: निराशा का? तुम्ही मोठं,मोठे वैज्ञानिक.तुम्ही सोडवू शकत नाही?

धर्माध्यक्ष: ते सोडवू शकत नाही कारण त्यांपण त्याच समस्या आहेत.

प्रभुपाद: समान तर्कशास्त्र, "हसत फाशी जा." एवढच. जसका एखादा कठीण विषय आला,ते सोडून देतात. आणि ते काही मूर्ख गोष्टींवर तर्क करतात.बस एवढेच. हे त्यांचे शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे आत्यन्तिक-दुःख-निवृत्ती,सर्व दुःखाचे अंतिम समाधान. ते शिक्षण आहे. असं नाही की काही प्रमाणात ते मिळाल्यावर,"नाही,तुम्ही सुखाने मरू शकता." आणि दुःख म्हणजे काय,ते कृष्णाद्वारे प्रस्तुत केले जाते.

जन्म-मृत्यू-जरा-व्याधि-दुःख-दोषानु... (भ गी १३।९)

हि तुमची दुःख आहेत. ती निवारण्याचा प्रयत्न करा. आणि ते ती काळजीपूर्वक टाळतात. ते मृत्यूला थांबवू शकत नाही,ना जन्म,ना वृद्धत्व ,ना जरा काही रोखू शकत नाही. आणि आयुष्याच्या अल्प कालावधीत,जन्म आणि मृत्यू,ते मोठं मोठया इमारती निर्माण करतात. आणि पुढच्या जन्मी त्याच इमारतीत तो उंदीर बनेल.(हशा) निसर्ग,आपण निसग नियमांना टाळू शकत नाही. जसे तुम्ही मृत्यू टाळू शकत नाही,तसेच,निसर्ग नियमानुसार तुम्हाला दुसरे शरीर मिळेल. ह्या जगात वृक्ष बना, पाच हजार वर्षे उभे रहा तुम्हाला नग्न राहायचं आहे. आता कोणी आक्षेप घेणार नाही. तुम्ही येथे नग्न उभे रहा.