MR/Prabhupada 0258 - घटनात्मकरित्या आपण सर्व सेवक आहोत: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0258 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...")
(No difference)

Revision as of 16:12, 12 July 2018



Lecture -- Seattle, September 27, 1968

एक छान बंगाली श्लोक आहे. कृष्ण भुलिया जीव भोग वांछा करे पासते माया तारे जापटिया धरे. जेव्हा केव्हा आपली मूळ चेतना भौतिक उपभोगामुळे दूषित होते, की "मला भौतिक प्रकृतीच्या साधनांवर प्रभुत्व गाजवायचं आहे…" जेव्हा आपण आपल्या चेतनेला अशाप्रकारे वळण देतो, तेव्हा आपल्या अडचणी सुरु होतात. ताबडतोब माया. अशाप्रकारची भावना,की "मी हे भौतिक जग उपभोगू शकेन माझ्या जास्तीतजास्त क्षमतेनुसार…" प्रत्येकजण ते करण्याच्या प्रयत्नात आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण,सुरवात मुंगीपासून ते आदिजीव, ब्रम्हपर्यंत. प्रत्येकजण देवांपैकी एक बनण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे अलीकडेच तुमच्या देशात राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी पुष्कळ प्रचार झाला. का? तीच कल्पना. प्रत्येकजण कोणीतरी देव बनण्याच्या मागे आहे. ती माया आहे. आमची कृष्णभावनामृत चळवळ संपूर्णतः विरुद्ध आहे. आम्ही फक्त कृष्णांच्या सेवकाचा सेवकाचा सेवक बनण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त उलट. भगवंत बनण्याऐवजी, आम्हाला श्रीकृष्णांच्या सेवकाचा सेवक बनण्याची इच्छा आहे. गोपी-भार्तु: पद-कमलयोर दास-दासानुदासः (चै च मध्य १३।८०) ।

आधुनिक संस्कृतीच्या प्रवाहात,लोक असे म्हणतील की हि गुलामाची मानसिकता आहे. हि फार चांगली कल्पना आहे. "मी का गुलाम बनू? मी मालक बनेन." पण एखाद्याला समजणार नाही ही भावना, की "मी मालक बनेन." हे त्याच्या दुःखाचे कारण आहे. हे तत्वज्ञान समजले पाहिजे. कारण घटनात्मक दृष्टया आपण सगळे सेवक आहोत. या भौतिक जगाचे स्वामी बनण्याच्या नावाखाली आपण आपल्या इंद्रियांचे सेवक बनलो आहोत. कारण घटनात्मक दृष्टया आपण सेवक आहोत.सेवा केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. या सभेत बसलेलो आपण सर्वजण सेवक आहोत. आता, हि मुले ज्यांनी कृष्णभावनामृत स्वीकारले आहे. ते श्रीकृष्णांचे सेवक बनण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्येचे निराकरण होते. पण इतर, विचार करतात की "मी का भगवंतांचा किंवा स्वामीजींचा सेवक बानू? मी स्वामी बनेन.... पण प्रत्यक्षात, तो स्वामी बानू शकत नाही. तो इंद्रियांचा सेवक होतो, एवढेच. जरा समजण्याचा प्रयत्न करा. त्याला सेवक बनवचं लागत,पण तो वासनेचा सेवक आहे, तो लोभाचा दास आहे, तो त्याच्या हावरटपणाचा दास आहे, त्याच्या क्रोधाचा सेवक,अनेक गोष्टींचा सेवक. कामादीनां कती न कतिधा पालिता दुर्निदेशाः प्रगत अवस्थेत,कोणी मानवतेचा दास झाला आहे. कोणी समाजाचा दास झाला आहे, कोणी देशाचा दास झाला आहे. पण खरा उद्देश आहे की "मी स्वामी बनेन." तो रोग आहे. अध्यक्षपदासाठीचे उमेदवार,ते त्यांचे निराळे रूप सादर करतात. नाही, जाहीरनामा,असा की "मी देशाची फार छान सेवा करीन. कृपया मला तुमचे मत द्या." पण खरी कल्पना अशी की "या नाहीतर त्या मार्गाने,मी देशाचा सवामी बनेन." तर ही माया आहे. म्हणून जर आपण हे छोटं तत्वज्ञान समजलो, की घटनात्मक दृष्टया मी सेवक… यात काही शंका नाही. कोणीही म्हणू शकत नाही की "मी मुक्त आहे,मी स्वामी आहे. कोणीही म्हणू शकत नाही. जर त्यांनी तसा विचार केला, ती माया आहे. ते चुकीचे आहे.