MR/Prabhupada 0299 - एक सन्यासी आपल्या पत्नीला भेटू शकत नाही: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0299 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...")
(No difference)

Revision as of 05:12, 24 October 2018



Lecture -- Seattle, October 4, 1968

तमाल कृष्ण: प्रभुपाद, चैतन्य महाप्रभूंनी सन्यास घेतल्यावर, ते त्यांच्या आईला भेटले. चैतन्य महाप्रभूंची शिकवण या पुस्तकात असे म्हटले आहे. मी नेहमी विचार करतो की संन्यासी ते करू शकत नाही.

प्रभुपाद: नाही, संन्यासी त्याच्या पत्नीला भेटू शकत नाही. संन्यास्याला घरी जाण्यास मनाई आहे, आणि त्याच्या पत्नीला भेटायला मनाई आहे. पण तो इतरांना भेटू शकतो… पण ते… चॆतन्य महाप्रभु त्यांच्या घरी गेले नाहीत. तशी व्यवस्था केली होती.

अद्वैत प्रभूनी चैतन्य महाप्रभूंच्या आईला त्यांना भेटायला आणले. चैतन्य महाप्रभूंनी सन्यास स्वीकारल्यावर ते फक्त वेड्यासारखे श्रीकृष्णांपाठी होते. ही गंगा आहे हे विसरून गंगेच्या किनाऱ्यावर जात होते. ते विचार करत होते की "ही यमुना आहे. मी वृन्दावनला जात आहे. अनुसरून…" तर नित्यानंद प्रभू एका माणसाला पाठवत, तो "मी चैतन्य महाप्रभूबरोबर जात आहे. कृपया अद्वैत आचार्यांना घाटावर नाव आणायला सागा. जेणेकरून ते त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकतील." तर चैतन्य महाप्रभु ब्रम्हानंदात होते. मग त्यांनी अचानक पहिले की अद्वैत नाव घेऊन वाट पाहत उभे आहेत. तर त्यांनी त्यांना विचारले, "अद्वैत, तू इथे का आहेस? इथे, यमुना आहे." अद्वैतनी सांगितले, " हो माझ्या प्रभू ,जिथे तुम्ही आहात तिथे यमुना आहे. तर तुम्ही माझ्याबरोबर चला." तर ते गेले आणि जेव्हा ते गेले… ते अद्वैतांच्या घरी गेले. मग त्यांनी पहिले, "तू मला फसवले आहेस. तू मला तुझ्या घरी आणलेस. हे वृदावन नाही. हे कसे?" "ठीक आहे, प्रभू. तुम्ही चुकून आलात, तर…," (हशा) "कृपया इथेच रहा." तर त्यांनी लगेच एका माणसाला त्यांच्या आईकडे पाठवले. कारण त्यांना माहित होत की चैतन्य महाप्रभूंनी सन्यास स्वीकारला आहे; ते पुन्हा कधी घरी येणार नाहीत. तर त्यांनी आई मुलापाठी वेडी होती. तो एकुलता एक मुलगा होता. तर त्यांनी त्यांच्या आईला त्यांना शेवटचे पाहण्याची एक संधी दिली. अद्वैतद्वारे ती व्यवस्था केली होती. तर जेव्हा आई आली तेव्हा चैतन्य महाप्रभु ताबडतोब त्यांच्या आईच्या पाया पडले. ते तरुण होते, चोवीस वर्षाचे, आणि आई, जेव्हा तिने पहिले की तिच्या मुलाने सन्यास स्वीकारला आहे, सून घरी आहे, नैसर्गिकपणे स्त्री,ती खूप प्रभावित झाली, ती रडायला लागली. तर चैतन्य महाप्रभूंनी खूप छान शब्दात तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, 'माझ्या प्रिय आई, हे शरीर तुझ्याद्वारे दिले गेले आहे. तर मी हे शरीर तुझ्या सेवेत गुंतवले पाहिजे. पण मी तुझा मूर्ख मुलगा आहे. मी काहीतरी चूक केली आहे. कृपया मला क्षमा कर. तर ते दृश्य खूप दयनीय आहे. आईपासून ताटातूट…(अस्पष्ट)