MR/Prabhupada 0366 - तुम्ही सर्वजण गुरु बना, पण मुर्खासारखे बोलू नका: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0366 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - L...")
(No difference)

Revision as of 05:32, 17 January 2019



Lecture on SB 6.1.21 -- Honolulu, May 21, 1976

तर चैतन्य महाप्रभूंद्वारे नवीन मान्यता: कृष्णस्तू भगवान स्वयं (श्रीमद भागवतम १.३.२८) | यारे देखा तारे कहा कृष्ण-उपदेश (चैतन्य चरितामृत मध्य ७.१२८) । चैतन्य महाप्रभु या कृष्णभावनामृत आदोलनाचा प्रचार, हा प्रचार काय आहे? ते म्हणतात की "तुमच्यापैकी प्रत्येकजण गुरु बना." त्यांना नकली गुरु नको आहेत, तर खरे गुरु हवे आहेत. ते त्यांना हवे आहे. कारण लोक तमोगुणात आहेत, आम्हाला लोखो गुरु हवे आहेत लोकांचे अज्ञान दूर करण्यासाठी. म्हणून चैतन्य महाप्रभूंचे उद्दिष्ट आहे, ते म्हणतात की "तुम्ही प्रत्येकजण गुरु बना."

अमार आज्ञाय गुरु हय तार ए देश. तुम्हाला परदेशी जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहेत, तिथे तुम्ही शकवा; गुरु बना. त्याने काही फरक पडत नाही. येई देश. ते सांगतात,येई देश. जर तुमच्याकडे शक्ती असेल तर तुम्ही, इतर देशात जाऊ शकता, पण त्याची आवश्यकता नाही. ज्याकोणत्या गावात, देशात, किंवा शहरात तुम्ही असाल, तुम्ही गुरु बना. हे चैतन्य महाप्रभूंचे मिशन आहे. आमदार आज्ञाय गुरु हय तार ऐ देश. "हा देश, हि जागा."

तर, "पण माझ्याकडे पात्रता नाही. मी कसा गुरु बनू शकतो?" पात्रतेची आवश्यकता नाही. "तरीही मी गुरु बनू शकतो?" होय, "कसे?" यारे देखा तारे कहा कृष्ण-उपदेश: (चैतन्य चरितामृत मध्य ७.१२८) "जोकोणी तुम्हाला भेटेल, तुम्ही फक्त जे कृष्णांनी निर्देशित केले आहे ते सागा. एवढेच. तुम्ही गुरु बनलात." प्रत्येकजण गुरु बनण्यासाठी उत्सुक आहे, पण दुष्टाना माहित नाही की कसे गुरु बनायचे, साधी गोष्ट. या देशात अनेक गुरु येतात, सर्व दुष्ट, पण ते कृष्णांनी जे सांगितले आहे ते सांगणार नाहीत. कदाचित पहिल्यांदाच हे कृष्णभावनामृत मध्ये सुरु झाले आहे. नाहीतर सर्व दुष्ट ते काहीतरी दुसरंच सांगतात, काही ध्यान, हे नाहीतर ते, सर्व फसवणूक.

खरा गुरु तो आहे जो कृष्णांनी संगितलेले सांगतो. असे नाही की तुम्ही तुमची शिकवण निर्माण करा. नाही. ते चैतन्य महाप्रभु आहेत. नवीन निर्माण करायची आवश्यकता नाही. सूचना पहिल्यापासूनच दिलेल्या आहेत. तुम्हाला फक्त सांगायचे आहे, "हे असे आहे." एवढेच. हे खूप कठीण काम आहे का? वडील सांगतात. "हा मायक्रोफोन आहे." एक मूल म्हणू शकते की "वडिलांनी हा मायक्रोफोन असल्याचे संगितले." तो गुरु बनला. अडचण कुठे आहे? अधिकारी, वडिलांनी संगितले आहे, "हा मायक्रोफोन आहे." एक मूल सांगू शकते, "हा मायक्रोफोन आहे." तर त्याचप्रमाणे, श्रीकृष्ण सांगतात की "मी सर्वोच्च आहे." तर जर मी म्हणालो, श्रीकृष्ण सर्वोच्च आहे," मला अडचण कुठे आहे. जोपर्यंत मी कृष्ण किंवा सर्वोच्च बनून दुसऱ्याना फसवतो? ती फसवणूक आहे. पण जर मी साधे सत्य सांगितले, की "कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. ते सर्वाचे मालक आहेत. ते पूजनीय आहेत," मग मला अडचण काय आहे? तर ते आमचे मिशन आहे. तुम्ही सर्व जे कृष्णभावनामृत आंदोलनात आले आहेत, हि आमची विनंती आहे, की तुम्ही सर्व, गुरु बना पण मुर्खासारखे बोलू नका. ती विनंती आहे. फक्त श्रीकृष्णांनी सांगितले आहे ते सागा. मग तुम्ही ब्राम्हण बनलं. तुम्ही गुरु व्हाल, आणि सर्वकाही. . खूप खूप धन्यवाद.