MR/Prabhupada 0396 - राजा कुलशेखरच्या प्रार्थनेचे तात्पर्य: Difference between revisions

(No difference)

Revision as of 05:19, 15 April 2019



Purport to Prayers of King Kulasekhara, CD 14

हा श्लोक, प्रार्थना, एका मुकुंद-माला-स्तोत्र नावाच्या पुस्तकातून घेतली आहे. हि प्रार्थना एक राजा ज्याचे नाव कुलशेखर होते त्याने म्हटली आहे. तो एक महान राजा होता, त्याच बरोबर महान भक्त होता. वैदिक साहित्याच्या इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. की राजा महान भक्त आहेत, आणि त्यांना राजर्षी म्हणतात. राजर्षी म्हणजे, जरी ते राज्याच्या सिहासनावर असले, तरी त्या सर्व संत व्यक्ती आहेत. तर हा कुलशेखर, राजा कुलशेखर, कृष्णाला प्रार्थना करीत आहे की "माझ्या प्रेमळ कृष्ण, माझ्या मनाचा हंस आता अडकला आहे तुझ्या पादकमलांच्या देठाशी. कारण, मृत्यूच्या समयी, शरीराच्या कार्याचे तीन घटक, उदा. कफ, आणि पित्त, आणि वात, ते एकमेकांच्या वरचढ होतील, आणि माझा आवाज फुटणार नाही, तर मृत्यू समयी मी तुझे गोड पवित्र नाव उच्चारू शकणार नाही."

अशा प्रकारे तुलना केली आहे, की पांढरा हंस, जेव्हा त्याला कमळाचे फुल सापडते, तो तिथे जातो आणि पाण्यामध्ये सूर मारून खेळतो, आणि कमळाच्या फुलाच्या देठात त्याला अडकवून घेतो. तर कुलशेखर राजाची इच्छा आहे की त्याच्या मनाच्या आणि शरीराच्या निरोगी अवस्थेत, तो ताबडतोब भगवंतांच्या पदकमलांच्या देठात अडकेल आणि लगेच मृत्यू होईल. कल्पना अशी आहे की एखाद्याने कृष्णभावनामृत स्वीकारले पाहिजे, जेव्हा त्याचे शरीर आणि मन चांगल्या अवस्थेत आहे. तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका. जेव्हा तुमचे शरीर आणि मन निरोगी अवस्थेत आहे तेव्हा कृष्णभावनामृतचा सराव करीत रहा, आणि मग मृत्यू समयी तुम्ही श्रीकृष्ण आणि त्यांच्या लीला आठवू शकाल आणि ताबडतोब आध्यात्मिक राज्यात पाठवले जाऊ शकाल.