MR/Prabhupada 0232 - तर भगवंतांचा हेवा करणारे शत्रूही आहेत, त्यांना राक्षस म्हणतात: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0232 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
(No difference)

Revision as of 04:25, 12 August 2019



Lecture on BG 2.4-5 -- London, August 5, 1973

प्रद्युम्न: "महात्मसम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरीही ते श्रेष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली, आमचे भोग रक्तरंजित होतील."

प्रभुपाद: तर अर्जुनाची पहिली समस्या होती नातेवाईकांची, गुरुजनांची कशी हत्या करायची. आता जेव्हा मित्र म्हणून कृष्णांनी त्याला फटकारले की "तू एवढा दुबळा का आहेस? कमकुवत बनू नको. हि भावुकता आहे. अशाप्रकारची करुणा भावुकता आहे. उत्तिष्ठ. तू उठ आणि लढ." पण, तो करू शकतो… जर मी काही करू इच्छित नसेन. तर मी अनेक करणे देऊ शकतो. आपण पाहा? नंतर तो गुरुन: प्रस्तुत करीत आहे. "ठीक आहे, कृष्ण, तुम्ही माझ्या नातलगांबद्दल बोलत आहात. मी स्वीकार करतो तो माझा कमकुवतपणा आहे. पण तुम्ही कसे मला माझ्या गुरुंची हाती करायचा सल्ला देता. द्रोणाचार्य माझे गुरु आहेत. आणि भीष्मदेव देखील माझे गुरु आहेत. तर तुमची इच्छा आहे की मी माझ्या गुरुंची हत्या करू? गुरुं हि हत्वा. आणि ते देखील साधारण गुरु नाहीत. असे नाही की त्या साधारण व्यक्ती आहेत. महानुभाव.

भीष्म महान भक्त आहेत, आणि तसेच, द्रोणाचार्य देखील, एक महान व्यक्तिमत्व आहे. तर कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन (भ.गी. २।.४) । "त्या दोन महान व्यक्ती आहेत. ते केवळ माझे गुरु नाहीत, पण त्या महान व्यक्ती आहेत." आणि कृष्ण यांना "मधुसूदन" संबोधले आहे. मधुसूदन म्हणजे… मधू कृष्णांचा शत्रू होता, एक आसुर. तर त्यांनी त्याची हत्या केली.

तर "तुम्ही मधुसूदन आहात, तुम्ही तुमच्या शत्रूंचा वध करता. तुम्ही एखादा पुरावा देऊ शकता का की तुम्ही तुमच्या गुरूचा वध केलात? तर तुम्ही मला का सांगता?" हे तात्पर्य आहे. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. परत अरी-सुदन. अरी म्हणजे शत्रू. मधुसूदन, विशेषकरून "मधू असुराचा वध करणारा." आणि पुढचा अरिसुदन. अरी म्हणजे शत्रू. तर कृष्ण यांनी अनेक असुरांना मारले, अरी, जो त्यांच्या बरोबर शत्रू म्हणून लढण्यासाठी आला. म्हणून त्यांचे नाव अरिसुदन आहे. तर कृष्ण यांचे अनेक शत्रू आहेत, आपल्याबद्दल काय बोलणार.

हे भौतिक जग असे बनले आहे, की तुम्हाला थोडेतरी शत्रू असलेच पाहिजेत. मत्सरता. मत्सरता म्हणजे इर्षा. हे भौतिक जग अशाप्रकारे आहे. तर इथे भगवंतांचा हेवा करणारे देखील लोक आहेत. त्यांना असुर म्हणतात. सर्वसाधारण मत्सरी किंवा शत्रू, ते नैसर्गिक आहे. पण भगवंतांबद्दल देखील. अगदी काल रात्री, संध्याकाळी, काहीजण मला भेटायला आहे. तो वादविवाद करीत होता "का कृष्णांच्या रूपात स्वीकारले पाहिजे?" हा त्याचा तर्क होता. तर कृष्णानां शत्रू आहेत. म्हणून कृष्ण… फक्त तो नाही, पण सर्वजण जे भौतिक जगात आहेत ते कृष्णांचे शत्रू आहेत. सर्वजण. कारण त्यांना कृष्णांचे प्रतिस्पर्धी बनण्याची इच्छा आहे.

कृष्ण सांगतात की भोक्तारम: "मी परम भोक्ता आहे," सर्व-लोक-महेश्वरम: (भ.गी. ५.२९) ((भ.गी. ५.२९ "मी परम स्वामी आहे." आणि वेद देखील पुष्टी देतात, ईशावास्यं इदं सर्वं (ईशोपनिषद १) । "सर्वकाही परम भगवंतांची मालमत्ता आहे." सर्वं खल्व इदं ब्रह्म. हा वैदिक आदेश आहे. यतो वा इमानि भूतानि जायन्ते: "ज्यांच्यापासून सर्वकाही प्रकट झाले आहे." जन्मांद्यस्य यतः (श्रीमद्भागवतम् १.१.१) । हे वैदिक संस्करण आहे. पण तरीही, आपण, कारण आपण शत्रू आहोत, "नाही, कृष्ण का स्वामी असले पाहिजेत? मी स्वामी आहे. केवळ कृष्ण भगवान का. मला अजून एक भगवान मिळाला आहे. इथे आणखीन एक दुसरा भगवान आहे.