MR/Prabhupada 0350 - लोकांना श्रीकृष्णांना पाहण्यासाठी पात्र बनवण्याचा प्रयत्न करत आहोत: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0350 - in all Languages Category:MR-Quotes - 1975 Category:MR-Quotes - L...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
 
Line 7: Line 7:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0349 - |0349|MR/Prabhupada 0351 - |0351}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0349 - मी माझ्या गुरु महाराजांनी जे सांगितले त्याच्यावर केवळ विश्वास ठेवला|0349|MR/Prabhupada 0351 - तुम्ही काहीही लिहा, उद्देश केवळ सर्वेश्वराची स्तुती करण्याचा असला पाहिजे|0351}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 17: Line 17:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|lTxw3c9yFFw|लोकांना श्रीकृष्णांना पाहण्यासाठी पात्र बनवण्याचा प्रयत्न करत आहोत <br />- Prabhupāda 0350}}
{{youtube_right|5KILMhEfxQU|लोकांना श्रीकृष्णांना पाहण्यासाठी पात्र बनवण्याचा प्रयत्न करत आहोत <br />- Prabhupāda 0350}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->



Latest revision as of 18:07, 1 October 2020



Lecture on BG 7.2 -- Nairobi, October 28, 1975

ब्रह्मानंद: ते सांगतात वेदांवरून आपल्याला ज्ञात झाले आहे की कृष्ण अमर्यादित आहे, खास करून जेव्हा तो गोपींबरोबर रासलीला करत होता. जर कृष्ण अमर्यादित आहे, का त्यांनी नाही…?

भारतीय माणूस; स्वतःला संपूर्ण जगात प्रकट केले जेणेकरून सगळ्या जीवांना घरी परत जाण्याची सारखी संधी मिळेल?

ब्रम्हानंद: का त्यांनी स्वतःला संपूर्ण जगात प्रकट केले नाही जेणेकरून सर्व जीवांना सारखी संधी मिळाली असती…?

प्रभुपाद: होय, ते संपूर्ण जगात प्रकट झाले, पण तुमच्याकडे त्यांना पाहण्यासाठी दृष्टी नाही. तो तुमचा दोष आहे. कृष्ण सर्वत्र उपस्थित आहे. पण ज्याप्रमाणे आकाशात सूर्य आहे. तुम्हाला आता का दिसत नाही? हूं? याचे उत्तर द्या? सूर्य आकाशात नाही असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला वाटते का सूर्य तिथे नाही? तर छतावर जा आणि सूर्य पहा. (हशा) तुम्ही तुम्हाला का एक बदमाश सिद्ध करता, की " नाही, नाही तिथे सूर्य नाही"? ज्ञानी मनुष्याद्वारे हे स्वीकारले जाईल का? कारण तुम्ही सूर्य पाहू नाही, तिथे सूर्य नाही? कोणत्याही ज्ञानी मनुष्याद्वारे हे स्वीकारले जाईल का? रात्री तुम्ही सूर्य पाहू शकत नाही, म्हणून जर तुम्ही कोणत्याही ज्ञानी माणसाला म्हणालात कोणीही जो कोणी जाणतो. "नाही, नाही, तिथे सूर्य नाही," तर मग तो हे स्वीकारेल का? तो म्हणेल की 'सूर्य तिथे आहे. तुम्ही मूर्ख, तुम्ही पाहू शकत नाही? एवढेच. "तुम्ही तुमच्या मूर्खपणातून बाहेर पडा. मग तुम्ही पाहाल." कृष्ण सांगतात: नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृताः (भ.गी. ७.२५), तो मूर्ख माणसांना प्रकट होत नाही, पण जो जाणतो, तो पाहतो.

प्रेमाञ्जनच्छुरितभत्त्किविलोचनेन
संत: सदैव हृदयेषु विलोकयन्ति
यं श्यामसुन्दरमचिन्त्यगुण…
(ब्रह्मसंहिता ५.३८)

भक्त नेहमी श्रीकृष्णानाच स्मरतात. त्यांच्यासाठी ते नेहमी उपस्थित असतात. आणि दुष्टांना, ते दिसू शकत नाहीत. हा फरक आहे. तर तुम्हाला भक्त बनले पाहिजे; मग तुम्हाला दिसेल. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति (भ.गी. १८.६१) । प्रत्येकाच्या हृदयात श्रीकृष्ण स्थित आहेत. पण तुम्हाला ते माहित आहे का? तुम्ही पाहू शकता? तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता का? ते तुमच्या हृदयात आहेत, ते उपस्थित आहेत. पण ते कोणाशी बोलतात? तेषां सतत युत्त्कानां भजतां प्रितिपूर्वकम् ददामि बुद्धियोगं तं (भ.गी. १०.१०) ते अशा भक्तांबरोबर बोलतात जे चोवीस तास त्यांच्या सेवेत गुंतलेले असतात. हे भगवद् गीतेमध्ये सांगितले आहे. तुम्ही भगवद् गीता वाचत नाही? म्हणून प्रत्येक गोष्टीला पात्रता आवश्यक आहे. तर हे कृष्णभवनामृत अंदोलन म्हणजे लोकांना श्रीकृष्णांना पाहण्यासाठी पात्र बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. योग्य बनल्याशिवाय, तुम्ही कसे पाहू शकाल? त्याला योग्यतेची आवश्यक आहे.