MR/Prabhupada 0383 - गौर पहुचे तात्पर्य: Difference between revisions
(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0383 - in all Languages Category:MR-Quotes - 1969 Category:MR-Quotes - P...") |
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->") |
||
Line 8: | Line 8: | ||
<!-- END CATEGORY LIST --> | <!-- END CATEGORY LIST --> | ||
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | <!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | ||
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0382 - दशावतार स्तोत्र भाग २|0382|MR/Prabhupada 0384 - गौरंग बोलिते हबेचे तात्पर्य|0384}} | |||
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0382 - |0382|MR/Prabhupada 0384 - |0384}} | |||
<!-- END NAVIGATION BAR --> | <!-- END NAVIGATION BAR --> | ||
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | <!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> |
Latest revision as of 22:41, 1 October 2020
Purport to Gaura Pahu -- Los Angeles, January 10, 1969
गौर पहू ना भजिया गोईनु, प्रेम-रथन-धन हेलाय हाराऐणु. हे नरोत्तम दास ठाकूर यांचे दुसरे गाणे आहे. ते सांगतात की "मी चैत्यन्यप्रभूंची आराधन न करून माझ्या आध्यात्मिक मृत्यूला आमंत्रित केले आहे." गौर पहू ना भजिया गोईनु, गौर पहू म्हणजे चैतन्यप्रभू." ना भजिया, "आराधनेशिवाय." गोईनु, "मी आध्यात्मिक मृत्यूला आमंत्रित केले आहे." आणि अधने यातने करी धनु तैनु. "मी आध्यात्मिक मृत्यूला का आमंत्रित केले आहे? कारण मी अशा काही गोष्टींमध्ये गुंतलो आहे ज्या निरर्थक आहेत. आणि मी माझ्या आयुष्याच्या वास्तविक उद्देशाला नाकारले आहे."
अधन म्हणजे निरुपयोगी गोष्ट. आणि धन म्हणजे मौल्यवान. तर वास्तविक, आपल्यापैकी प्रत्येकजण, आपल्या आध्यात्मिक उद्धाराकडे दुर्लक्ष करत आहोत, आपण भौतिक इंद्रियतृप्तीमध्ये गुंतलो आहोत. आणि म्हणून आपण मानवी शरीराच्या या संधीला गमावत आहोत. स्वतःला आध्यात्मिक स्तराच्या उंचीवर नेण्याच्या. हे मानवी शरीर विशेषकरून बद्ध जीवाला दिले गेले आहे. आध्यात्मिक उद्धार करण्यासाठी एक संधी. तर कोणीही जो आध्यात्मिक उद्धाराची काळजी करीत नाही, तो आध्यात्मिक मृत्यूला आमंत्रित करत आहे. आध्यात्मिक मृत्यू म्हणजे स्वतःला विसरणे, की तो आत्मा आहे. तो आध्यात्मिक मृत्यू आहे. तर पशु जीवनात पूर्णपणे विसरणे आहे. कुठल्याही परिस्थितीत ते हे शरीर नाहीत याची आठवण करून दिली जाऊ शकत नाही, ते या शरीरापासून वेगळे आहेत. ते फक्त या मनुष्य जीवनात आहे, मनुष्य जीवनात, कोणीही समजू शकतो की तो हे शरीर नाही, तो आत्मा आहे.
तर हरे कृष्ण जप करून, कोणीही सहजपणे हि गोष्ट समजू शकतो. आणि चैतन्य महाप्रभूंच्या पूजेने, त्यांची तत्वे आणि मार्ग अनुसरून, कोणीही हरे कृष्णाचा जप करून आणि खूप सहजपणे आध्यात्मिक समजेच्या स्तरापर्यंत येऊ शकतो. पण नरोत्तम दास ठाकूर आपल्या वतीने सांगतात की आपण याकडे दुर्लक्ष करीत आहोत. म्हणून आपण आध्यात्मिक मृत्यूला आमंत्रित करीत आहोत. मग ते सांगतात की प्रेम-रथन-धन हेलाय हाराइनु. आध्यात्मिक जीवन म्हणजे खरे प्रेम विकसित करणे. प्रत्येकजण सांगते प्रेम. इतके सारे साईनबोर्ड आहेत, अनेक पेपर, "प्रेम, प्रेम." पण प्रेम नाही. तो भ्रम आहे. ती वासना आहे. नशेचे प्रेम, कामजीवनाचे प्रेम, याबद्दल प्रेम… हे चालू आहे. तर वास्तविक प्रेम म्हणजे… प्रेम, हा शब्द, केवळ कृष्णाला, देवालाच लागू होऊ शकतो. कारण आपण त्या उद्धेशासाठी बनलो आहोत. प्रेम करणे म्हणजे कृष्णावर प्रेम करणे. म्हणून ते पाहिजे आहे. ते आध्यात्मिक प्रेम आहे. तर प्रेम-रथन. मी ती आध्यात्मिक स्थिती प्राप्त करू शकलो असतो, पण मी दुर्लक्ष करीत आहे. म्हणून मी माझ्या आध्यात्मिक मृत्यूला बोलवत आहे. आणि या गोष्टी घडत आहेत माझ्या पूर्व दुष्कृत्यांमुळे प्रत्येकाला ज्याला हे भौतिक शरीर मिळाले आहे, ते पूर्व दुष्कृत्यांमुळे. काहीवेळा आपण पुण्य कर्म म्हणतो,
वास्तविक, जोपर्यंत आपणाला हे भौतिक शरीर मिळते तोपर्यंत कोणतेही पुण्य कर्म नाही. पुण्य कर्मचा अर्थ परत भौतिक शरीर नाही. ते पुण्य कर्म आहे. अन्यथा ते एक तथ्य म्हणून घेतले पाहिजे की ब्रम्हादेखील, जे ब्रम्हांडाचे मुख्य जीव आहेत आणि ज्यांना दीर्घायुष्य मिळाले आहे. सर्व शक्ती, तरीही, ते सुद्धा दुष्कृत्य समजले आहे, कारण त्यांना भौतिक शरीर मिळाले आहे. तर आपण खोल खाली आणखी खाली जात आहोत, एकामागून एक, शरीर आपल्या दुष्कृत्यांमुळे. भगवतामध्ये देखील सांगितले आहे की त्यांना माहित नाही, की इंद्रियतृप्तीच्या प्रक्रियेमुळे त्यांना आणखी एक शरीर मिळेल, आणि भौतिक कष्टाचे शरीर एक कारण आहे. कारण मला हे शरीर मिळाले आहे, म्हणून मला डोकेदुखी जाणवते, पोटदुखी जाणवते. मला हे आणि ते जाणवते. पण, जेव्हा आपण भौतिक शरीरा बाहेर येतो, तेव्हा कोणतेही भौतिक कष्ट राहात नाहीत. ते केवळ आनंदी जीवन आहे.
ब्रम्ह-भूत प्रसन्नात्मा (भ.गी. १८.५४). प्रसन्नात्मा म्हणजे आनंदी, जेव्हा आपणाला आध्यात्मिक जीवन मिळते. तर माझ्या पूर्व कर्मांमुळे, मी संधी गमावत आहे. अपान कर मद सेवा… हे का होत आहे? सत-संग छाडी खैनु असत्येर विलास. "मी भक्तांचा संग सोडून दिला, पण मी सर्वसाधारण मूर्ख माणसांचा संग करीत आहे." . असत्येर. असत आणि सत. सत म्हणजे आत्मा. आणि असत म्हणजे पदार्थ. तर भौतिक गोष्टीशी असलेल्या सहयोगाचा परिणाम म्हणजे बद्ध जीवन. तर आपल्याला भक्तांच्या सहवासात राहिलेच पाहिजे. सतां प्रसंगाद मम वीर्य-संविदो.
केवळ भक्तांच्या सहवासातच भगवंतांना जाणू शकतो. म्हणून आम्ही या कृष्णभावनामृत चळवळीचे, समाजाचे समर्थन करीत आहोत. खरे तर आपल्याला आढळेल, जो कोणी या समाजात येत आहे, थोड्या दिवसाच्या,थोड्या आठवड्याच्या सहवासाने, त्याला जाणीव होते, आणि तो दीक्षा घेण्यासाठी पुढे येतो आणि आणखीन प्रगती करू इच्छितो. तर हा सहवास खूप महत्वाचा आहे. जे वेगवेगळी केंद्र आणि मंदिरे चालवत आहेत, त्या खूप जबाबदार व्यक्ती असल्या पाहिजेत, कारण सर्वकाही त्यांच्या प्रामाणिक कार्यावर आणि चारित्र्यावर अवलंबून असेल. जर ते अविचार असतील, तर ते प्रभावी होणार नाही. एखादा येऊन आमच्या सहवासात राहू शकतो, जर आपण अविचारी असलो तर ते प्रभावी होणार नाही. पण जर भक्त प्रामाणिक असतील, कोणी हि जो भक्ताच्या संपर्कात येईल, त्याच्यात बदल होईल. हे रहस्य आहे.
सत-संग छाडी असत्येर विलास. आणि जेव्हा आपण भक्तांचा सहवास सोडू तेव्हा लगेच माया मला पकडेल. जसे आपण साथ सोडतो, माया म्हणते "हो, माझ्या सहवासात ये." कोणात्याही संगाशिवाय, कोणीही तटस्थ राहू शकत नाही. ते शक्य नाही. त्याला मायेचा किंवा कृष्णाचा संबंध जोडला पाहिजे. तर प्रत्येकजण भक्तांच्या कृष्णाच्या संगात राहण्यासाठी खूप गंभीर असला पाहिजे कृष्ण म्हणजे… जेव्हा आपण कृष्ण बोलतो, "कृष्ण" म्हणजे कृष्णाच्या बरोबर त्याचे भक्त. कृष्ण कधीही एकटे राहात नाहीत. जेव्हा कृष्ण राधाराणी बरोबर आहेत. राधाराणी गोपींबरोबर आहे. आणि कृष्ण गोपांबरोबर आहेत. आम्ही मायावादी नाही. आम्ही कृष्णाला एकटे पाहत नाही. त्याचप्रमाणे,कृष्णाचा अर्थ आहे कृष्णाच्या भक्तांसह
तर कृष्णभावनामृत म्हणजे कृष्ण भक्तांच्या संगात राहाणे. विषय विषम विष सतत खैनु. आणि सांगतात की "मी नेहमी इंद्रियतृप्तीचे अतिशय धोकादायक विष प्यायलो आहे." विषय विषम विष. विषय म्हणजे इंद्रियतृप्ती. आहार, निद्रा, भय,आणि मैथुन. याला विषय म्हणतात. आणि आणि विषम म्हणजे धोकादायक. आणि विष म्हणजे विष जर कोणी केवळ जीवनातील या चार तत्वांमध्ये गुंतला असेल, जनावरांप्रमाणे. तर असे मानले जाते की तो फक्त विष पिट आहे. एवढेच. विषय विषम सतत खैनु. "मला माहित आहे हे विष आहे, पण मी इतका नशेच्या आहारी गेलो आहे. मी प्रत्येक क्षणी विष पित आहे."
गौर-कीर्तन-रस मगन ना पैनु. "आणि मी चैतन्य प्रभुंनी सुरु केलेल्या संकीर्तन आंदोलनात स्वतःला सामील करू शकत नाही." ओह, ते वास्तविक तथ्य आहे. जे भौतिक जीवनात फारच रमले आहेत, किंवा सतत इंद्रियतृप्तीचे विष पीत आहेत, ते संकीर्तन आंदोलनाद्वारे आकर्षित होत नाहीत. तर सरते शेवटी, नरोत्तम दास ठाकूर शोक करत आहेत. ते स्वतःचे प्रतिनिधित्व करत आहेत. जर आपण त्या शोकाच्या स्तरापर्यंत आलो, ते देखील खुप चांगले आहे. तो लगेच शुद्ध होतो. शोक म्हणजे शुद्धीकरण.
तर ते सांगतात, केनो वा आचय प्राण किचु बली… "मी का जगत आहे? मी भक्तांचा संग करत नाही, मी संकीर्तन आंदोलनात भाग घेत नाही. कृष्ण काय आहेत मला समजत नाही. चैतन्य प्रभू काय आहेत मला समजत नाही. मग मी कशासाठी जगत आहे?" हा शोक आहे. "माझा आनंद काय आहे? माझ्या आनंदाचे प्रमाण काय आहे? मी का जगत आहे?" नरोत्तम दास केन ना गेला. "मी फार पूर्वीच का मेलो नाही? माझा मृत्यू झाला पाहिजे होता. माझ्या आयुष्याला काय अर्थ आहे." तर हा नरोत्तम दास ठाकुरांचा शोक नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे, की "जर आपण भक्तांचा संग करू शकत नाही, जर आपल्याला कृष्णभावनामृत आंदोलन काय आहे समजत नाही. जर आपण चैतन्य प्रभू आणि पार्षदांच्या संपर्कात येत नाही. माझ्यासाठी मारणे चांगले आहे. आणि दुसरा काही उपाय नाही."