MR/Prabhupada 0013 - चोवीस तास गुंतवणे: Difference between revisions
No edit summary |
(No difference)
|
Latest revision as of 03:43, 1 June 2021
Lecture on BG 2.49-51 -- New York, April 5, 1966
योगः कर्मसु कौशलम. कौशलम म्हणजे तज्ञांची युक्ती, तज्ञांची युक्ती. ज्याप्रमाणे तिथे दोन पुरूष काम करत आहेत. एक मनुष्य अतिशय तज्ञ आहे; दुसरा माणूस तेव्हडा तज्ञ नाही आहे. जरी यंत्रसामग्री मध्ये. मशीन मध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. जो माणूस अती तज्ञ नाही, तो दिवस-रात्र प्रयत्न करत राहतो, कशी दुरुस्त करायची, पण तज्ञ येतो आणि एका नजरेत बघतो दोष काय आहे, आणि तो एक तार जोडतो, ह्या न त्या प्रकारे, आणि यंत्र चालू होते. झुम,झुम,झुम,झुम,झुम,झुम. बघितल ? फक्त आम्ही काहीवेळा, आम्हाला अडचण येते आमच्या, ह्या टेप-रेकॉर्डर मध्ये, आणि श्री कार्ल किंवा कोणीतरी येतो आणि दुरुस्त करतो. त्यामुळे सगळ्याना आवश्यक आहे काही तज्ञ ज्ञान. तर कर्म , कर्म म्हणजे कार्य. आम्ही कार्य केले पाहिजे. इतके की आपल्या कार्या शिवाय, हे शरीर व आत्मा चालू शकत नाही. हा एक खूपच गैरसमझ आहे की एक कोण आहे... अध्यात्मिक पुर्तीसाठी त्याने कार्य करता कामा नये. नाही, त्याला अधिक कार्य केले पाहिजे. जी माणस अध्यात्मिक पुर्ति साठी नाही आहेत, ती गुंतलेली असतात कार्य करण्यात फक्त आठ तासांकरिता, पण जे अध्यात्मिक पुर्ति मध्ये गुंतले आहेत, अरे बापरे, ते चोवीस तास गुंतलेली असतात, चोवीस तास . तो फरक आहे. आणि तो फरक आहे... तुम्हाला असे आढळेल की भौतिक मंचावर, जीवनाच्या शारीरिक संकल्पने वर, जर आपण फक्त आठ तास काम केल्यास, आपल्याला थकवा वाटतो. पण अध्यात्मिक उद्देशाने, आपण चोवीस तासांपेक्षा जास्त काम केल्यास ... दुर्दैवाने, तुमच्या कडे चोवीस तासांपेक्षा जास्त नाही निपटून काढायला. तरीही, तुम्हाला थकवा वाटणार नाही. मी सांगू इछितो. हा माझा प्रात्यक्षिक अनुभव आहे. हा माझा प्रात्यक्षिक अनुभव आहे. आणि मी इथे आहे, नेहमी कामात, वाचन किंवा लेखन काहीतरी, काहीतरी वाचन किंवा लेखन, चोवीस तास केवळ जेव्हा मला भुख लागली असे वाटते, मी काही तरी खातो. आणि फक्त जेव्हा मला झोप येते, मी झोपायला जातो. अन्यथा, नेहमी, मला थकवा वाटत नाही. आपण श्री पॉलना विचारू शकता मी असे करतो की नाही ते. त्यामुळे मी घेतो, मी हे करण्यात आनंद घेतो, मला थकवा वाटत नाही. त्याचप्रमाणे, जेव्हा एकाला तो अध्यात्मिक समज असेल, त्याला वाटणार नाही... ऐवजी, तो होईल, तो झोपी जायला निराश होईल, झोपी जाण्यासाठी, "अरे बापरे, झोप आली फक्त अडथळा आणण्यासाठी." पहा? त्याला झोपेची वेळ कमी करण्याची इच्छा आहे. नंतर... आता, जसे आम्ही प्रार्थना करू, वन्दे रूपसनातनौ रघुयुगौ श्रीजीवगोपालकौ. हे सहा गोस्वामी , ते ह्या विज्ञानावर चर्चा करण्यासाठी भगवान चैतन्य द्वारा नियुक्त केले गेले होते. त्यांनी याबद्दल प्रचंड साहित्य लिहिले आहे. आपण पहा? त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते झोपत होते फक्त दररोज दीड तासांकरिता, त्या पेक्षा अधिक नाही. ते सुद्धा, काहीवेळा ते सोडून देत.