MR/Prabhupada 0024 - कृष्णा दयाळू आहे: Difference between revisions
No edit summary |
(No difference)
|
Latest revision as of 04:07, 1 June 2021
Lecture on SB 3.25.26 -- Bombay, November 26, 1974
अर्जुन जेव्हा श्रीकृष्णांना समक्ष बघत होता - तेव्हा श्रीकृष्ण त्याला भगवद्गीता शिकवीत होते... श्रीकृष्णांना समक्ष बघणे आणि भगवद्गीता वाचणे हे एकच आहे.. ह्याच्यात कणमात्र देखील अंतर नाही. लोक म्हणतात कि "अर्जुन खूप नशीबवान होता... ...कारण त्याने श्रीकृष्णांच्या समक्ष त्यांच्या कडून उपदेश स्वीकार केला." हे काही योग्य नाही. जर तुमच्या कडे त्यांना बघण्यासाठी योग्य दृष्टी असेल, तर तुम्ही श्रीकृष्णांचं त्वरित दर्शन घेऊ शकता.. म्हणून म्हणलं गेलाय, प्रेमांजन-छुरीत... प्रेम आणि भक्ति.. दोन्ही एकच आहे. प्रेमान्जन छुरित भक्ति विलोचनेन सन्तः सदैव हृदयेषु विलोकयन्ति (ब्रह्म संहिता ५.३८) मी ह्या संदर्भात, एका दक्षिण भारतीय ब्राह्मणाची कथा सांगु इच्छितो.. तो ब्राह्मण रंगनाथ मंदिरात भगवद्गीता वाचत होता. तो पूर्णपणे निरक्षर होता.. त्याला संस्कृत काय कुठलं अक्षर हि माहित नव्हतं... निरक्षर. त्याचा आजू-बाजूचे लोक हे जाणत होते कि "तो निरक्षर आहे आणि तो भगवद्गीता वाचतोय.." तो अगदी अस्पष्ट पणे "अह, ऊ," करत भगवद्गीता वाचत होता... हे ऐकून लोक त्याची थट्टा उडवीत, "काय ब्राह्मणा, अशी कशी भगवद्गीता वाचतोय??" त्याला देखील हे समजत होतं कि "मी निरक्षर असल्यामुळे हे लोक माझी थट्टा करतायेत.." अश्या प्रकारे, श्री चैतन्य महाप्रभू देखील त्या दिवशी रंगनाथ मंदिरात उपस्थित होते.. आणि महाप्रभूंनी देखील ओळखलं कि "हा एका भक्त आहे." म्हणून ते त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणाले, "हे ब्राह्मणदेव, हे तुम्ही काय वाचताय." आणि ब्राह्मणाला हि कळलं कि "हि व्यक्ती थट्टा करत नाहीये.." म्हणूण तो म्हणाला, "मी भगवद्गीता वाचतोय. मी भगवद्गीता वाचण्याचा प्रयत्न करतोय, पण मी अशिक्षित आणि निरक्षर आहे.. "पण माझ्या गुरु महाराजांनी मला आज्ञा दिलीये कि 'तू रोजच्या-रोज १८ अध्याय वाचले पाहिजेत'.. "मला काही ज्ञान नाही आहे. मी वाचू शकत नाही.. "तरीही माझ्या गुरु महाराजांनी मला आज्ञा दिलीये, म्हणून मी त्यांची आज्ञा पालन करायचा प्रयत्न करतोय.. ".. अशाप्रकारे मी फक्त पानं उलटतोय.. मला वाचता येत नाही." हे बघून श्रीमन्महाप्रभू म्हणाले कि "मी बघतोय कि अधून-मधून तुमच्या नेत्रांमध्ये अश्रू येत आहेत." यावर तो म्हणाला कि, "हो, मी रडतोय." "जर तुला वाचता येत नाही तर मग तुझ्या डोळ्यात अश्रू का येत आहेत?" "कारण जेव्हा मी हि भगवद्गीता हातात घेतो, तेव्हा मी एक चित्र बघतो, "..कि श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत कि ते अर्जुनाचे सारथी बनले आहेत. "अर्जुन त्यांचा भक्त आहे. पण श्रीकृष्ण इतके कृपाळू आहेत, कि त्यांनी त्याचा दास बनणे स्वीकार केलंय. "आणि अर्जुन त्यांना आज्ञा देतोय कि, 'माझा रथ ह्या दिशेला न्या' आणि श्रीकृष्ण त्यांच्या आज्ञेचा पालन करीत होते.. ..श्रीकृष्ण हे इतके कृपाळू आहेत... आणि जेव्हा मी हे चित्र माझ्या मनात बघतो, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात." हे ऐकून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याला त्वरित मिठी मारली आणि म्हणाले कि, "तुम्ही भगवद्गीता वाचताय.. अशिक्षित व निरक्षर असतांना देखील तुम्ही भगवद्गीता वाचताय." त्यांनी त्याला मिठी मारली... तर हे असं आहे... तो ब्राह्मण हे चित्र कसं बघत जोता? तो कृष्ण प्रेमी होता, म्हणून तो हे श्लोक वाचू शक्तोय किंवा नाही ह्याने काही फरक पडत नव्हता. पण तो श्रीकृष्णांच्या प्रेमात मग्न होता आणि म्हणून तो बघत होता.. ..श्रीकृष्ण तिथे बसलेत आणि ते अर्जुनाचा रथ चालवतायेत. हे महत्वाचे आहे.