MR/Prabhupada 0283 - आपला कार्यक्रम आहे प्रेम करणे: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0283 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...")
 
No edit summary
 
Line 8: Line 8:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0282 - |0282|MR/Prabhupada 0284 - |0284}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0282 - आपण आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे|0282|MR/Prabhupada 0284 - माझी प्रकृती अधिनस्थ होण्याची आहे|0284}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 18: Line 18:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|36_B4h_c5L0|आपला कार्यक्रम आहे प्रेम करणे - Prabhupāda 0283}}
{{youtube_right|LSNN8AOaq44|आपला कार्यक्रम आहे प्रेम करणे<br/> - Prabhupāda 0283}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->



Latest revision as of 13:06, 1 June 2021



Lecture -- Seattle, September 30, 1968

प्रभुपाद: गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. भक्त: गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. प्रभुपाद: तर आपला कार्यक्रम गोविंद,मूळ पुरुषाची प्रेमाने आणि भक्तीने आराधना करणे. गोविन्दमादिपुरुषं. हे कृष्णभावनामृत आहे. आम्ही लोकांना श्रीकृष्णांवर प्रेम करायला शिकवत आहोत,एवढेच. आमचा कार्यक्रम योग्य ठिकाणी प्रेम करणे आहे.हा आमचा कार्यक्रम आहे. प्रत्येकाला प्रेम करायची इच्छा आहे,पण त्याने योग्य ठिकाणी प्रेम न केल्याने तो निराश होत आहे. लोक ते समजत नाहीत. त्यांना शिकवले जात आहे, "सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करा." मग थोडे विस्तारित, "तुम्ही तुमच्या आई आणि वडिलांवर प्रेम करा." मग "तुमच्या भाऊ आणि बहिणीवर प्रेम करा." मग "तुमच्या समाजावर प्रेम करा, तुमच्या देशावर प्रेम करा,संपूर्ण मानव समाजावर,मानवतेवर प्रेम करा." पण हे सर्व विस्तारत प्रेम, तथाकथित प्रेम, तुम्हाला समाधान देऊ शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही श्रीकृष्णांवर प्रेम करण्याच्या टप्यापर्यंत येत नाही. त्यानंतर तुम्ही समाधानी व्हाल. ज्याप्रमाणे जर तुम्ही तलावात,जलाशयात दगड फेकलात, लगेच तरंग येऊ लागतात. तरंग वाढतात,आणि वाढत,वाढत वाढत,जेव्हा ते किनाऱ्याला स्पर्श करते,तेव्हा ते थांबते. जोपर्यंत तरंग जलाशयाचा काठ किंवा किनाऱ्यापर्यंत पोहोचत नाही,ते वाढत जाते. तर आपल्याला वाढवावे लागणार आहे. वाढवावे. वाढवणे म्हणजे तिथे दोन मार्ग आहेत. जर तुम्ही सराव केलात, "मी माझ्या समाजावर प्रेम करतो, मी माझ्या देशावर प्रेम करतो, मी मानवी राष्ट्रावर प्रेम करतो," मग "जीव," पुढे सुरु… पण जर तुम्ही थेट श्रीकृष्णांना स्पर्श केलात, मग सर्वकाही त्यात आहे. ते खूप छान आहे. कारण श्रीकृष्ण म्हणजे सर्व आकर्षक, सर्वकाही समाविष्ट आहे. का सर्वकाही? कारण श्रीकृष्ण केंद्र आहे. ज्याप्रमाणे कुटुंबात, जर तुम्ही तुमच्या वडिलांवर प्रेम केले, मग तुम्ही तुमच्या भावावर,बहिणीवर प्रेम करता,वडिलांचा दास, तुमच्या वडिलांच्या घरावर,वडिलांच्या पत्नीवर,म्हणजे तुमच्या आईवर,सर्वांवर तुम्ही प्रेम करता. केंद्रबिंदू वडील आहेत. हे सर्वसाधारण उदाहरण आहे. त्याचप्रमाणे,जर तुम्ही श्रीकृष्णांवर प्रेम केले,मग तुमचे प्रेम सर्वत्र पसरले जाईल. दुसरे उदाहरण, ज्याप्रमाणे तुम्ही झाडावर प्रेम करता पाने, फुले, फांद्या,खोड सर्वकाही. तुम्ही फक्त मुळांना पाणी घालता,मग आपोआप ते पाणी संपूर्ण झाडाला मिळते. जर तुम्ही तुमच्या देशवासीयांवर प्रेम केले, जर तुम्हाला पाहायचे असेल की आपला देशवासी सुशिक्षित झाला, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्टया,शारीरिकदृष्ट्या प्रगत झाला, मग तुम्ही काय कराल? तुम्ही सरकारला कर देता. तुमच्या उत्पन्नावरचा कर लपवू नका. तम्ही फक्त केंद्र सरकारला कर भरता, आणि तो शैक्षणिक विभागाला वाटला जातो. संरक्षण विभागाला, स्वच्छता विभागाला, सगळीकडे वाटला जातो. म्हणून... हि ढोबळ उदाहरणं आहेत, पण प्रत्यक्षात, जर तुम्हाला सर्वकाही आवडत असेल,तर तुम्ही श्रीकृष्णांवर प्रेम करायचा प्रयत्न करा. तुम्ही निराश होणार नाही कारण ते पूर्ण आहे. जेव्हा तुमचे प्रेम पूर्ण होते तेव्हा तुम्ही निराश होत नाही. जसे आपल्याला पूर्ण आहार मिळाला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाने तृप्त असता, मग तुम्ही म्हणता, "मी संतुष्ट आहे, मला आणखी काही नको."