MR/Prabhupada 0241 - इंद्रिये सर्पासामान आहेत
Lecture on BG 2.3 -- London, August 4, 1973
वैदिक साहित्यात स्वर्गाचे वर्णन त्रिदशपुर असं आहे. त्रिदशपूर. त्रिदशपूर म्हणजे तेहतीस लाख देव आहेत, आणि त्यांचे वेगवेगळे ग्रह आहेत. त्याला त्रिदशपूर म्हणतात. त्री म्हणजे तीन,आणि दश म्हणजे दहा. तर तेहतीस किंवा तीस असं असलं तरी. त्रिदशपूर आकाश पुष्पायते. आकाश पुष्प म्हणजे काहीतरी काल्पनिक, काहीतरी काल्पनिक. आकाशात फुल. बागेत फुल असलं पाहिजे,पण आकाशात फुल असल्याची कोणीतरी कल्पना करत, हे काहीतरी काल्पनिक आहे. तर भक्तांसाठी, स्वर्गीय ग्रहावर बढती ही आकाशातील फुलासारखी आहे. त्रिदशपूर आकाश पुष्पयते. कैवल्यं नरकायते. ज्ञानी आणि कर्मी. आणि दूरदांतेंद्रिय कालसर्प पतली प्रोत्खातदंस्त्रायते मग योगी.
योगी प्रयत्न करतात. योगी म्हणजे योग इंद्रिय-सम्यम इंद्रियांवर नियंत्रण. ते योगिक सराव आहेत. आपली इंद्रिय खूप प्रबळ आहेत. ज्याप्रमाणे आपण वैष्णव सुद्धा,आपण सगळ्यात पाहिलं जिभेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर योगी सुद्धा,ते इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात.योगिक प्रक्रियेने केवळ जीभ नाही, पण बाकी इतर,दहा प्रकारची इंद्रिय, का ते नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात? कारण इंद्रीय ही सापासारखी असतात. साप... ज्याप्रमाणे त्याने कुठेही स्पर्श केला, मृत्यूपर्यंत ताबडतोब काहीतरी. इजा झाली तर मृत्यू होऊ शकतो. हे उदाहरण दिले आहे. जसे आपल्या लैगिक संबंधाची प्रबळ इच्छा. अवैध लैगिंक संबंधांमुळे, अनेक अडचणी निर्माण होतात. अर्थात,आजकाल हे सर्व खुप सोपे झाले आहे. पूर्वी हे खूप कठीण होते, विशेषतः भारतात. म्हणून तरुण मुलगी कायम संरक्षित होती,कारण मुलांबरोबर मिसळली, जसा कसा किंवा इतर, लैगिक संबंध आला, ती गर्भवती होते. आणि तिचे लग्न करणे शक्य होणार नाही. नाही. सर्पाद्वारे स्पर्श झाला. हे आहे... वैदिक संस्कृती खूप कडक आहे.
कारण संपूर्ण ध्येय हे होते की कसे स्वगृही भगवत धामाला जायचे. इंद्रीयतृप्ती, खा,प्या,लग्न करा,मजा करा,नाही. ते मानवी जीवनाचे उद्दिष्ट् नाही. तर सगळ्याच नियोजन त्या दृष्टीने केले होते. विष्णुर अराध्यते.
- वर्णाश्रमाचारवता
- पुरुषेण पर: पुमान
- विष्णुर आराध्यते पंथे
- नान्यत तत-तोश-कारणम
- (चैतन्य चरितामृत मध्य ८.५८)
वर्णाश्रम, ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य,सगळ्यांनी विशिष्ट् विभागाचे नियम कठोरपणे पाळले पाहिजेत. ब्राम्हण हा ब्राह्मणासारखा वागला पाहिजे. क्षत्रिय म्हणूनच... इथे आहे... जसे श्रीकृष्णांनी सांगितले,"तू क्षत्रिय आहेस;तू अशा सर्व गोष्टी का बोलत आहेस? तु पाहिजे!"
- नैतत्त्वय्युपपद्यते (भ.गी. २.३)
"दोन मार्गाने तू हे करू नये. क्षत्रिय म्हणून तू असे करू नये, आणि माझा मित्र म्हणूनही करू नये. हा तुझा दुबळेपणा आहे." तर ही वैदिक संस्कृती आहे. क्षत्रिय म्हणून लढ. ब्राम्हण लढणार नाही. ब्राम्हण सत्य: शमो दम: तो कस सच्चा बनायचं,कस शुद्ध बनायचं याचा सराव करेल. इंद्रिय कशी नियंत्रित करायची,मन कसे नियंत्रित करावे कसे साधेपणी राहायचे, कसे वैदिक साहित्याचे जाणकार बनायचे. व्यवहारिक जीवनात कसे अमलात आणायचे.श्रद्धेने, दृढनिश्चयी कसे बनायचे. हे ब्राम्हण आहेत. त्याचप्रमाणे क्षत्रिय - लढा. ते आवश्यक आहे.
- वैश्य - कृषि गो रक्ष्य वाणिज्यम (भ.गी. १८.४४)
तर हे सगळं कठोरपणे पालन केले पाहिजे.