MR/Prabhupada 0378 - भुलिया तोमारेचे तात्पर्य
शरणागतीची प्रक्रिया म्हणून भक्तीविनोद ठाकूर यांनी हे गाणे गायले आहे. आम्ही शरणागती बद्दल खूप ऐकले आहे. एखादा कसा शरण जाऊ शकतो त्याची हि काही गाणी आहेत. तर भक्तिविनोद ठाकूर सांगतात की भुलिया तोमार, संसारे आसिया, "माझ्या प्रिय देवा, मी भगवंताला विसरून या भौतिक जगात आलो आहे. आणि आता मी इथे आलो असल्याने मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. बऱ्याच काळापासून, जीवनाच्या विविध प्रजातींद्वारा. तर, म्हणून, मी तुझ्याकडे आत्मसमर्पण करण्यासाठी आलो आहे. आणि माझ्या दुःखाच्या कथा तुला सादर करण्यासाठी. प्रथम गोष्ट मला माझ्या आईच्या गर्भात राहावे लागेले."
जननी जठरे, चिलाम जाखोन. "जेव्हा मी तिथे होतो, छोट्या, बंद ब्यागेत, हात आणि पाय, मी माझ्या आईच्या गर्भात होतो. त्या वेळेला, मला तुझे ओझरते दर्शन झाले होते. त्यानंतर मी तुला पाहू शकलो नाही. त्या वेळी मी तुला ओझरते पाहू शकलो, त्या वेळी मी विचार केला," ताखोन भाविनु, जनम पाइया, "मी विचार केला की या वेळी जेव्हा मी या गर्भातून बाहेर येईन, मी नक्की शंभर टक्के भगवंतांच्या सेवेत, त्यांची पूजा करण्यात गुंतून राहीन, परत जन्म आणि मृत्यूचे हे चक्र नको, ते खूप त्रासदायक आहे. आता मी गुंतून राहीन, या जन्मी मी फक्त स्वतःला भक्ती सेवेत गुंतवून घेईन, या मायेतुन बाहेर पडण्यासाठी. पण दुर्दैवाने, माझ्या जन्मानंतर," जनम होईलो, पदी' माया-जाले, ना होईलो ज्ञान-लव, "जसे मी गर्भाच्या बाहेर आलो, ताबडतोब माया, भ्रामक शक्तीने मला पकडले. आणि मी विसरलो की मी अनिश्चित स्थितीत होतो, आणि मी रडत आणि प्रार्थना करत होतो, की या वेळी मी बाहेर येईन आणि स्वतःला भक्ती सेवेत गुंतवून घेईन.
पण जेव्हा माझा जन्म झाला मी हि सर्व हुशारी, बुद्धिमत्ता घालवली." मग पुढची पायरी आदरेर छेले, स्व-जनेर कोले. मग मी सर्वांचा लाडका बनलो आणि सर्वजण मला मांडीवर घ्यायला लागले, आणि मी विचार केला, "आयुष्य खूप छान आहे, सर्वजण माझ्यावर प्रेम करत आहेत." मग मी विचार केला, " हे भौतिक आयुष्य खूप छान आहे." आदरेर छेले, स्व-जनेर कोले, हासिया कातानू काल. "कारण काही अडचण नाही. जेव्हा केव्हा मला जरा त्रास होतो, सर्वजण मला अराम देण्यास पुढे येतात. म्हणून मी विचार केला की माझे आयुष्य असेच असेल. तर मी माझा वेळ फक्त स्मित हास्य करण्यात वाया घालवला, आणि ते हास्य माझ्या नातलगांचें आकर्षण बनले आणि ते मला कुरवाळायला लागले. मी विचार केला, हे जीवन आहे." जनकी… जनक जननी-स्नेहेते भुलीया, संसार लागिलो. "त्या वेळी, आई वडिलांचे प्रेम.
तर मी विचार केला भौतिक जीवन खूप छान आहे." क्रमे दिन दिन, बालक होईया, खेलीनु बालक-सह. "मग हळूहळू मी मोठा झालो आणि मी माझ्या बालपणीच्या मित्रांबरोबर खेळू लागलो, आणि ते खूप छान जीवन होते. आणि नंतर काही दिवसांनी, जेव्हा मी थोडा समजदार झालो, तेव्हा मला शाळेत घातले. तर मी खूप गंभीरपणे अभ्यास करायला सुरवात केली. मग त्यानंतर," विद्यार गौरवे, भ्रमी देशे देशे, धन उपर्जन कोरी. "मग गर्वाने फुगून…" भक्तिविनोद ठाकूर मॅजिस्ट्रेट होतो. तर त्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होत होती. ते आपल्या आयुष्याबद्दल सांगत आहेत, की विद्यार गौरवे, कारण मी थोडे शिक्षण घेतले होते. माझ्याकडे पदवी होती आणि माझी कमाई चांगली होती.
तर मी विचार करीत होतो, "हे खूप चांगले आहे." विद्यार गौरवे, भ्रमी देशे देशे, धन उपर्जन कोरी. स्व-जन पालन, कोरी एक-मने, "आणि फक्त कर्तव्य कसे पालन करायचे, कुटुंबातील सदस्यांना कसे वाढवायचे, त्यांना कसे सुखी ठेवायचे. हे माझे एकमेव ध्येय आणि जीवनाचे उद्दिष्ट बनले." बार्धक्ये एखोन, भक्तिविनोद. आता भक्तिविनोद ठाकूर आपल्या वृद्धापकाळात, कांडिया कातर अति, "आता मी पहात आहे की मला हि सर्व व्यवस्था सोडावी लागेल, मला दूर जावे लागेल आणि दुसरे शरीर स्वीकारावे लागेल. म्हणून, काय प्रकारचे शरीर मला मिळेल मला माहित नाही. म्हणून, मी रडत आहे, आणि मी खूप व्यथित आहे." बार्धक्ये एखोन, भक्तिविनोद, कांडिया कातर अति, मी खूप व्यथित आहे." ना भजिया तोरे, दिन बर्था गेलो, एखोन कि. तर तुझे पूजन न करता, तुझी सेवा न करता, अशा प्रकारे मी फक्त माझा वेळ वाया घालवला. काय करायचे मला माहित नाही म्हणून, मी शरण आलोय."