MR/Prabhupada 0076 - सर्वत्र कृष्णालाच पहा
Ratha-yatra -- San Francisco, June 27, 1971
जेव्हा आपले डोळे कृष्णप्रेमाच्या तेलाच्या अंजनाने भरले असतात , तेव्हा आपल्याला सर्वत्र तो दिसू शकतो । असे शास्त्राचे म्हणणे आहे . आपल्याला आपली दृष्टी ईश्वराच्या प्रेमाने विकसित केली पाहिजे ।
- प्रेमांजन च्चुरीत भक्ती विलोचनेन ( ब्र सं ५.३८)
जेव्हा एखाद्या योग्य प्रमाणात कृष्णा भावनामृतात विकसित झालेला असतो , तो परमेश्वराला प्रत्येक क्षणी त्याच्या हृदयात आणि तो सर्वत्र , तो जिथे जाईल तिथे पाहू शकतो । तर कृष्ण भावनामृत चळवळ एक प्रयत्न आहे प्रत्येकाला ईश्वराला कसे पाहावे , कृष्णाला कसे पाहावे हे शिकवण्याचा । जर आपण सराव केला तर आपण कृष्णाला पाहू शकतो । जसे कृष्ण म्हणतो ,
- रसो हम अपसू कौंतेय (भ गी ७।८)
कृष्ण म्हणतो , " पाण्यातली चव मी आहे "। आपण प्रत्येक जण रोज पाणी पितो , फक्त एकदा नाही , दोनदा , तीन वेळा किंवा त्यापेक्षा जास्त । तर जेव्हा जेव्हा आपण पाणी पितो , जर आपण विचार करू या पाण्यातली चव कृष्ण आहे , त्वरित आपण कृष्णमय होऊन जातो . कृष्ण भावनयुक्त बनणे काही कठीण काम नाही । आपल्याला फक्त सराव केला पाहिजे । जसे हे एक उदाहरण आहे कृष्ण भावनयुक्त होण्यासाठी कसा सराव करावा , जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी प्याला , जसे तुम्ही तृप्त व्हाल, तुमची तहान भागली असेल , त्वरित तुम्ही विचार करा की ही तहान भागवण्याची शक्ती कृष्ण आहे .
- प्रभास्मि शशी सूर्ययो:(भ गी ७।८) ,
कृष्ण म्हणतो , " सूर्याचा प्रकाश मी आहे . चंद्राची प्रभा मी आहे "। तर दिवसा आपण प्रत्येक जण सूर्यप्रकाश पाहतो । जसे तुम्ही सूर्यप्रकाश पाहाल , त्वरित तुम्ही कृष्णाला आठवु शकाल " इथे कृष्ण आहे "। जेव्हा जेव्हा रात्री तुम्ही चंद्र प्रकाश पाहाल , त्वरित तुम्ही आठवू शकाल " इथे कृष्ण आहे "। अशाप्रकारे जर तुम्ही सराव कराल तर अनेक उदाहरणे आहेत , भगवद गीतेत अनेक उदाहरणे दिली आहेत , सातव्या अध्यायात , जर तुम्ही नीट वाचाल , तुम्हाला कृष्ण भावनयुक्त कसे व्हावे हे समजेल । तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही कृष्णाच्या प्रेमात अग्रेसर व्हाल , तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कृष्ण दिसेल । कृष्णाला पाहण्यासाठी इतर कोणाच्याही मदतीची आवशकता नाही , पण तुमच्या प्रेमामुळे आणि भक्तीमुळॆच तो तुमच्यासमोर प्रकट होईल ।
- सेवोनमुखे हि जिहवादौ स्वयं एव स्फुरत्य अद: ( ब्र.१.२.२३४)
कृष्ण , जेव्हा एखादा सेवेच्या भावनेत असतो , जेव्हा एखादा निश्चित करतो की , " मी कृष्णाचा किंवा ईश्वराचा शाश्वत सेवक आहे ", तेव्हा कृष्ण तुम्हाला त्याला पाहण्यासाठी मदत करतो । तसे भगवद गीतेत म्हंटले आहे ,
- तेषां सततयुक्तानां
- भजतां प्रीतिपूर्वकम्
- ददामि बुद्धियोगं तं
- येन मामुपयान्ति ते :(भ गी १०।१०)