MR/Prabhupada 0404 - कृष्णभावनामृताची हि तलवार घ्या, केवळ तुम्ही विश्वासाने श्रवण करण्याचा प्रयत्न करा
Lecture on SB 1.2.16 -- Los Angeles, August 19, 1972
तर सुश्रुशो:, सुश्रुशो: श्रद्धधानस्य (श्रीमद भागवतम १.२.१६) | जे श्रद्धेने ऐकण्यात गुंतले आहेत, श्रद्धधान… आदौ श्रद्धा. श्रद्धेशिवाय, तुम्ही कोणतीही प्रगती करू शकत नाही. हि आध्यात्मिक जीवनाची सुरवात आहे. आदौ श्रद्धा. "ओह, इथे आहे…, कृष्णभावनामृत सुरु आहे. हे खूप छान आहे. ते छान प्रचार करीत आहे." लोक अजूनही, ते आमच्या कार्यांचे कौतुक करीत आहेत. जर आम्ही आमचा दर्जा राखला, तर ते आमची प्रशंसा करतील. तर याला श्रद्धा म्हणतात. या प्रशंसेला श्रद्धा म्हणतात, श्रद्धधानस्य. तो सामील होणार नाही, अगदी जरी एखादा म्हणाला, "अरे हे खूप छान आहे, हे खूप… हि माणसे चांगली आहेत." काहीवेळा ते, वर्तमानपत्रात ते सांगतात की " हि हरे कृष्ण लोकं चांगली आहेत. आम्हाला त्यांच्यासारखी अजून झाली पाहिजेत ते सांगतात.
तर हि प्रशंसा देखील अशा लोकांसाठी प्रगती आहे. जर त्यानी श्रवण केले नाही, आला नाही, केवळ एखाद्याने सांगितले "हे खूप छान आहे. होय." लहान मुलांप्रमाणे, एक बाळ, ते देखील प्रशंसा करते, आपल्या करतालासह उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशंसा करते. अगदी जीवनाच्या सुरवातीपासून, प्रशंसा करते, "ते खूप छान आहे." त्याला माहित आहे किंवा माहित नाही, त्याने काही फरक पडत नाही. केवळ प्रशंसा त्याला आध्यात्मिक जीवनाचा एक स्पर्श देत आहे. हे इतके चांगले आहे. जर ते विरुद्ध गेले नाहीत, फक्त प्रशंसा केली, "ओह ते खूप छान करीत आहेत…" तर आध्यत्मिक जीवनाचा विकास म्हणजे या प्रशंसेचा विकास करणे, एवढेच. पण प्रशंसा निरनिराळ्या प्रमाणात आहे. तर सुश्रूशो: श्रद्धधानस्य वासुदेव-कथा-रुचि:. आधीच्या श्लोकात,हे स्पष्ट केले आहे. यद अनुध्यासिना युक्ता:. सतत विचारात गुंतले पाहिजे. हि तलवार आहे
तुम्ही हि कृष्णभावनामृताची तलवार घेतली पाहिजे. मग तुम्ही मुक्त होता. गाठ या तलवारीने कापली जाते. तर... आता आपल्याला हि तलवार कशी मिळेल? त्या प्रक्रियेचे इथे वर्णन केले आहे, की तुम्ही फक्त, विश्वासाने तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तलवार मिळेल. एवढेच. वास्तविक, आपले कृष्णभावनामृत आंदोलन पसरत आहे. आपल्याला एकामागून एक तलवार मिळत आहे, केवळ ऐकण्याने मी हे आंदोलन न्यूयॉर्कमध्ये सुरु केले. तुम्हाला सर्वाना माहित आहे. माझ्याकडे वास्तवात कोणतीही तलवार नव्हती. काही धार्मिक तत्वांप्रमाणे, ते एका हातात धार्मिक ग्रंथ घेतात. आणि दुसऱ्या हातात, तलवार: "तुम्ही हा ग्रंथ स्वीकार; नाहीतर, मी तुझे डोके कापून टाकीन." तो देखील एक वेगळा प्रचार आहे. पण माझ्याकडे सुद्धा तलवार आहे, पण त्या प्रकारची नाही.
हि तलवार - लोकांना ऐकण्याची संधी देण्यासाठी. एवढेच. वासुदेव-कथा-रुचि:. तर जशी त्याला रुची मिळते… रुची. रुची म्हणजे चव. "आह, इथे कृष्ण बोलतो, खूप छान. मला ऐकू दे." एवढे करूनच तलवार मिळते, लगेच. तलवार तुमच्या हातात आहे. वासुदेव-कथा-रुचि:. पण रुची कोणाला मिळते? हि चव? कारण, जसे मी अनेक वेळा स्पष्ट केले आहे, चव, उसाप्रमाणे. प्रत्येकाला माहित आहे तो खूप गोड आहे. पण जर तुम्ही कावीळ झालेल्या व्यक्तीला दिलात.त्याला त्याची चव कडू लागेल. प्रत्येकाला माहित आहे ऊस गोड आहे, पण विशिष्ठ व्यक्ती जी काविळीने पीडित आहे. त्याला ऊस खूप कडू लागेल. प्रत्येकाला हे माहित आहे. हे खरं आहे.
तर रुची. ऐकण्याची गोडी वासुदेव-कथा, कृष्ण-कथा, या भौतिक रोगग्रस्त व्यक्ती स्वाद घेऊ शकत नाही. याची रुची, चव. याची चव लागण्यासाठी प्राथमिक क्रियाकलाप आहेत.ते काय आहेत? पहिली गोष्ट आहे ती प्रशंसा: "ओह, हे खूप चांगले आहे." आदौ श्रद्धा श्रद्धधान. तर श्रद्धा, प्रशंसा, हि सुरवात आहे. मग साधू-संग (चैतन्यय चरितामृत मध्य २२.८३) । मग मिसळणे: "ठीक आहे, हे लोक जप आणि कृष्णाबद्दल बोलत आहेत. मला जाऊ दे आणि मला आणखीन ऐकू दे." याला साधू-संग म्हणतात. जे भक्त आहेत, त्यांच्याशी जोडले जाणे. हा दुसरा स्तर आहे. तिसरा स्तर भजन क्रिया आहे. जेव्हा एखादा चांगल्याप्रकारे जोडला जातो. मग त्याला वाटते, "शिष्य का बनू नये?" मग आम्हाला अर्ज येतो, "प्रभुपाद, जर तुम्ही मला तुमचा शिष्य म्हणून कृपया स्वीकार कराल. हि भजन-क्रियाची सुरवात आहे. भजन-क्रिया म्हणजे भगवंतांच्या सेवेत गुंतणे. हा तिसरा स्तर आहे.