MR/Prabhupada 0450 - भक्ती सेवेच्या कार्यामध्ये कोणतीही भौतिक इच्छा आणू नका

Revision as of 13:51, 31 May 2021 by Soham (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0450 - in all Languages Category:MR-Quotes - 1977 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 7.9.4 -- Mayapur, February 18, 1977

प्रद्युम्न चे भाषांतर - नारद मुनी सांगतात की :हे राजा, उच्च कोटी चे भक्त प्रल्हाद महाराज खूप छोटे होते, तरी त्यांनी ब्रह्मा चे सांगणे मान्य केले भगवान नरसिंह जवळ गेले आणि आदरपूर्वक त्यांना नमस्कार केला. (SB ७.९.४) प्रल्हाद महाराज हे साधे भक्त नसून महा भागवत आहेत. अर्भक म्हणजे निरागस बाळ. ५ वर्षाचे छोटे बालक पण महा भागवत. छोटा मुलगा छोटा मुलगा सुद्धा महा भागवत बनू शकतो. आणि खूप शिकलेला पंडित सुद्धा राक्षस बनू शकतो. भक्ति खूप महान आहे अर्भ म्हणजे मूर्ख, बालिश. पण एकाच वेळी महा भागवत हे शक्य आहे महा भागवत म्हणजे आपण वेगळे वेगळे भक्त मध्ये फरक करायला शिकले पाहिजे. ... उत्तम अधिकारी. प्रल्हाद महाराज हे महा भागवत आहेत. ५ वर्षाचे आहेत म्हणून असे नाही. ते आईच्या पोटात असल्या पासून च महा भागवत होते जेव्हा त्यांचे आई ल देवांनी तुरुंगात टाकले तेव्हा नारद मुनींनी विचारले, "हे तुम्ही काय करत आहात?" ही हिरण्यकश्यपू ची बायको आहे, आणि ती गरोदर आहे. म्हणून आम्हाला ह्या बाळाला सुद्धा मारायचे आहे. नारद मुनींनी तत्काळ सांगितले, "नाही, नाही, नाही, नाही.हे बाळ साधे नाही. हे महा भागवत आहे. त्यांना काही करू नका." देवांनी हे मान्य केले. त्यांनी जरी चूक केली तरी जेव्हा नारद मुनींनी सांगितले "ते महा भागवत आहेत" नारद मुनी म्हणाले, "प्रिय पुत्री, जो पर्यंत तुझा पती परतून येत नाही, तो पर्यंत तू माझ्या सोबत चल" हिरण्यकश्यपू तेव्हा तपस्या करायला गेला होता जेणे करून देवांना पराभूत करू शकेल. ही राक्षस तपस्या आहे हिरण्यकश्यपू खूप कठोर तपस्या करीत होता. हेतू काय? भौतिक. अशी तपस्या काही उपयोगाची नाही. (SB १.२.८) भौतिक वादी खूप तपस्या करतात असे केल्या शिवाय ते त्यांचे व्यवसाय मध्ये, आर्थिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात प्रगती करू शकत नाही त्यांना खूप कष्ट करावे लागते. जसे आपले देशात महात्मा गांधींना खूप कष्ट करावे लागले वीस वर्षे डर्बनमध्ये त्याने आपला वेळ खराब केला आणि तीस वर्षे तो भारतात घालवला. मी म्हणेन त्याचा वेळ खराब झाला. कशासाठी? काही राजकीय हेतूने त्याचा राजकीय हेतू काय आहे? “आता आम्ही भारतीय नावाने ओळखले जाणारे एक गट आहोत आपण इंग्रजांना पळवून नेले पाहिजे आणि सर्वोच्च अधिकार स्वीकारला पाहिजे. "हा हेतू आहे. हा काय हेतू आहे? आज तुम्ही भारतीय आहात, उद्या काही दुसरे असणार. तुम्हाला शरीर बदलावे लागणार च. तर पुढचे शरीर कोणते? तुम्ही परत भारतीय होणार? काय पुरावा आहे. जरी तुम्हाला भारत बद्दल आपुलकी असेल पण तुम्हाला तुमचे कर्मा नुसार पुढचे शरीर मिळणार. जर तुम्हाला भारतीय वृक्षाचे शरीर मिळाले तरी तुम्ही ५हजार वर्षे उभे राहणार काय उपयोग? कृष्णा असे सांगत नाहीत की तुम्ही माणूस आहात तर परत तुम्ही माणूस म्हणून जन्म घेणार. असा पुरावा नाही काही मूर्ख लोक सांगतात की एकदा मानवी शरीर मिळाले की कधीही पतन होत नाही हे तथ्य नाही. तथ्य हे आहे की ८४ लाख योनी आहेत. तुमचे कर्मा नुसार तुम्हाला शरीर मिळेल. हे खरे. जरी तुम्हाला भारतीय शरीर मिळाले तरी कोणाला पर्वा आहे? म्हणून कृष्णा भावने शिवाय, कितीही तप केले तरी ते निरर्थक आहे आहे वेळेचा अपव्यय आहे. हे माहीत हवे. वेळ दवडाणे होय. शरीर बदलले की सारे काही बदलणार. तुम्ही नग्न आले होतात आणि नग्न जाणार आहात. तुम्हाला काही मिळणार नाही (BG १०.३४) तुम्ही जे काही मिळवणार ते सारे तुमचे कडून काढून घेतले जाणार. मृत्यूने सारे काही काढून घेतले जाणार. जसे हिरण्यकश्यपू चे झाले. प्रल्हाद महाराज सांगतात की " तुम्ही १ सेकंद मध्ये काढून घेतले. तर भगवंता, तुम्ही मला भौतिक आशीर्वाद का देत आहात? त्याची काय किंमत आहे? मी माझ्या वडिलांना बघितले आहे. त्यांनी फक्त भुवया फिरविले की सर्व देव भयभीत होत होते अशी स्थितीचा तुम्ही एक सेकंद मध्ये विनाश केलात. तर भौतिक संपन्नता काय उपयोगाची? शुद्ध भक्त भौतिक गोष्टींचा ध्यास करत नाहीत. (BRS 1.1.11) भगवंतांचे सेवे मध्ये भौतिक इच्छा नाही आले पाहिजे, याचे प्रत्येकाने स्मरण केले पाहिजे. ते शुद्ध नाही भौतिक इच्छा आले की समजावे आपण व्यर्थ वेळ दवडला. मग तुम्हाला भौतिक शरीर मिळणार तुमची इच्छा पूर्ण होणार. कृष्णा खूप दयाळू आहेत. तुम्ही भक्ति मधून एखादी भौतिक इच्छा पूर्ण करणार असणार तर कृष्णा बोलतात की "ठीक आहे" पण मग तुम्हाला पुढे भौतिक शरीर स्वीकारावे लागेल. जर तुम्ही शुद्ध आहात. शुद्ध भक्त हवे म्हणून आम्ही सर्वांना शुद्ध भक्त बनण्याची विनंती करतो. शुद्ध भक्त. महा भागवत हे एक उदाहरण आहे. ५ वर्षाचे या मुलाला, कृष्णाला आनंदी करा, कृष्णा चे शुद्ध भक्त व्हा हे सदून काहीही नव्हते