MR/Prabhupada 0053 - प्रथम आपण ऐकले पाहिजे
Lecture on SB 2.1.5 -- Delhi, November 8, 1973
तर आपणही प्रकृती आहोत. आपणही भगवंताची उर्जा आहोत . आणि आपण या भौतिक स्रोतांचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणून या भौतिक गोष्टींना मूल्य प्राप्त झाले आहे. अन्यथा त्यांचे काही मूल्य नाही . पण आपले काम आहे ... ते इथे नमूद केले आहे , कारण आपण या भौतीकतेत गुंतलो आहोत .. भौतिकता आपला व्यवसाय नाही . आपला एकमात्र व्यवसाय म्हणजे या भौतीकतेतून मुक्त कसे व्हावे . हा आपला खरा व्यवसाय आहे . जर तुम्हाला हा व्यवहार करायचा आहे तर इथे उपाय दिले आहेत . काय आहेत ते ?
- श्रोतव्य: कीर्तितव्यस् च (श्री भा १।२।१४ )
तुम्ही ऐकल्याशिवाय , तुम्हाला तुमच्या स्थितीबद्दल कसे समजेल ? जेव्हा तुम्ही भगवंताला कृष्णाला समजता , तुम्ही जाणून घेता कि तुम्ही कृष्णाचेच अंश आहात . किंवा कृष्ण , तेव्हा तुम्ही तुमची स्थिती जाणून घेता : " ओह आपण कृष्णाचेच अंश आहोत .
" कृष्ण हा परम परुष आहे , सद-ऐश्वर्य-पूर्णं , सर्व ऐश्वर्य युक्त . रस्त्यावर भटकणाऱ्या एका मूर्ख मुलाप्रमाणे , जेव्हा तो हुशारीने हे समजतो कि , " माझे वडील इतके धनवान आहेत , इतके शक्तिशाली आहेत , आणि मी असा रस्त्यावर मूर्ख माणसासारखा का भटकत आहे ? माझ्याकडे अन्न नाही , निवारा नाही . मी या दारावरून त्या दारावर भीक मागत आहे ", मग तो शुद्धीवर येतो . त्याला म्हणतात ब्रह्म-भूत स्थिति (श्री भा ४।३०।२० . " अरे , मी हे भौतिक पदार्थ नाही . मी जीवात्मा आहे , परमात्म्याचा अंश " ती आहे जाणीव . ही जाणीव जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत .
हि मनुष्याची सर्वोत्तम कल्याणकारी सेवा आहे , आपली हरवलेली चेतना जागृत करणे . तो मुर्खापणाने विचार करत आहे " मी एक भौतिक वस्तू आहे , आणि मला या भौतिक जगात माझ्या गोष्टी नियमित करायच्या आहेत " . हा मूर्खपणा आहे . वास्तवात बुद्धिमत्ता आहे ब्रह्म-भूता , अहं ब्रह्मास्मि . अहं ब्रह्मास्मि " मी परमेश्वराचा अंश आहे . भगवंत परम ब्राह्मण आहे . मी त्याचा अंश असल्याकारणाने .. " जसे सोन्याचा अंश , सोन्याची खाण , ते एखादे कानातले लहान डूल असू शकते , ते सुद्धा सोनंच आहे . तसेच , समुद्राच्या पाण्याच्या लहान कणात सुद्धा तीच गुणवत्ता आहे , खारट . त्याचप्रमाणे , आपण भगवंताचे अंश असल्यामुळे , आपल्याकडे सुद्धा तेच गुण आहेत . गुणात्मकतेनुसार आपण एक आहोत . का आपण प्रेमाच्या मागे तळमळत आहोत ? कारण कृष्णामध्ये प्रेम आहे . आपण इथे राधा कृष्णाची पूजा करत आहोत . मुळात तिथे प्रेम आहे .
म्हणून आपण भगवंताचे अंश असल्याकारणाने , आपण सुद्धा प्रेम कार्याचा प्रयत्न करत आहोत . पुरुष दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करण्याचा प्रयत्न करत आहे , स्त्री पुरुषावर प्रेम करण्याचा प्रयत्न करत आहे . हे स्वाभाविक आहे . हे कृत्रिम नाही . पण भौतिक आवरणात ते विकृत झाले आहे. तोच दोष आहे जेव्हा आपण या भैतिक आवरणातून मुक्त होऊ , तेव्हा आपण गुणात्मक रूपाने आहोत - अानन्दमयो अभ्यासात (वेदांत सूत्र १।१।१२), नेहमी आनंदी , कृष्ण नेमहमीच नृत्य करत आहे ..तुम्हाला कधी आढळणार नाही .. तुम्ही कृष्णाचे चित्र पहिले आहे , तो कालिया नागाबरोबर नाचत आहे तो नाचत आहे . त्याला नागाची भीती नाही . तो नाचत आहे . जसे तो गोपींबरोबर रास लीला करताना नाचतो , तसेच तो नागाबरोबर नाचत आहे. कारण तो अानन्दमयो अभ्यासातआहे . तो आनंदमय आहे . नेहमी आनंदी . नेहमी . तुम्ही पाहाल कृष्ण ... कृष्ण ... जसे कुरुक्षेत्रात युद्ध चालू आहे . कृष्ण आनंदी आहे . अर्जुन चिंताग्रस्त आहे कारण कारण तो जीव आहे , पण तो उदास नाही . तो आनंदी आहे . तो भगवंताचा स्वभाव आहे . अानन्दमयो अभ्यासात . हे सूत्र आहे ब्रह्म-सूत्रामध्ये , " भगवंत आनंदमय आहे , नेहमी आनंदी , नेहमी प्रसन्न .
तर तुम्ही सुद्धा आनंदी बनू शकता जेव्हा तुम्ही परत घरी जाल , पुन्हा भाग्वाद्धामात . हीच आपली समस्या आहे . आपण तिथे कसे जाऊ शकतो ? पहिली गोष्ट आहे कि आपण ऐकले पाहिजे . श्रोतव्य: फक्त ऐकण्याचा प्रयत्न करा कि भगवंत काय आहे , त्याचे राज्य काय आहे , तो कसे कार्य करतो , तो कसा आनंदी आहे . या गोष्टी ऐकल्या पाहिजेत . श्रावणम . मग जसे तुम्ही सहमत व्हाल , " अरे , भगवंत इतके चांगले आहेत , " मग तुम्ही संपूर्ण जगाला हे सांगायला आणि समजवायला उत्सुक व्हाल . हे आहे कीर्तनं . हे कीर्तन आहे .