MR/Prabhupada 0073 - वैकुंठ म्हणजे जिथे चिंता नाही

Revision as of 07:30, 20 December 2017 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0073 - in all Languages Category:MR-Quotes - 1967 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 10.2-3 -- New York, January 1, 1967


असे नाही कि तुम्ही या संघात राहूनच हे करू शकता . तुम्ही हि कला शिकू शकता , आणि घरी अमलात आणू शकता . तुम्ही सुद्धा असे छान भोजन घरी बनवू शकता , आणि ते कृष्णाला अर्पण करा . हे इतके कठीण नाही . आम्ही दररोज भोजन बनवतो आणि कृष्णाला अर्पण करतो .

नमो ब्रह्मण्य-देवाय गो-ब्राह्मण-हिताय च जगधिताय कृष्णया गोविंदाय नमो नमः (विष्णु पुराण १।१९।६५, (भ गी १४।१६ )

बस . हे इतके कठीण नाही. प्रत्येज जण पदार्थ बनवू शकतो आणि कृष्णाला अर्पण करून मग खाऊ शकतो . आणि मग परिवारासोबत किंवा मित्रांबरोबर बसून आणि कृष्णाच्या प्रतीमेसमोर जाप करून ,

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे,
हरे राम हरे राम राम राम हरे हरे

आणि पवित्र जीवन जागा . आणि परिणाम बघा . जर प्रत्य्रेक घराने , प्रत्येक व्यक्तीने , हे कृष्णाला समजून घ्र्ण्याचे तत्त्व समजले , तर ते पूर्ण जग वैकुंठ बनेल . वैकुंठ म्हणजे जिथे चिंता नाही . वैकुंठ . वै म्हणजे नाही , आणि कुंठ म्हणजे चिंता . हे पूर्ण जग चिंतेने भरले आहे .

सदा समुद्विगनाधियम् असद-ग्रहात (श्री भा ७।५।५ )

कारण आपण हे क्षणिक भौतिक अस्तित्व स्वीकारले आहे , म्हणून आपण नेहमी चिंतेत असतो . आध्यात्मिक जगात याच्या अगदी उलट परिस्थिती आहे , जिथे ग्रहांना वैकुंठ म्हणतात . वैकुंठ म्हणजे चिंते शिवाय . आपण सर्व चिंतेतून मुक्त होऊ इच्छितो . प्रत्येकजण स्वतःला चिंतेतून मुक्त करू इच्छितो , पण त्याला हे माहित नाही कि या चिंतेतून बाहेर कसे पडावे . या चिंतेतून मुक्त होण्यासाठी नशेचा आधार घेऊन काहीच उपयोग होणार नाही . ते मादक पदार्थ आहे . ते विस्मरण आहे . काही वेळेपुरता आपण सर्व विसरून जातो , पण पुन्हा जेव्हा आपण शुद्धीवर येतो तीच चिंता आणि सर्व तेच परत आहे . तर हे सर्व काही उपयोगाचे नाही . जर तुम्हाला चिंतेतून मुक्त व्हायचे असेल आणि जर तुम्हाला खरच शाश्वत आनंद आणि ज्ञान मिळवायचे असेल तर हि प्रक्रिय आहे हि प्रक्रिया आहे , तुम्हाला कृष्णाला समजून घावे लागेल .

इथे स्पष्टपणे नमूद केले आहे कि न मी विदू सूर गणः (भ गी १०।२ ) पण तिथे मार्ग आहे .

सेवोन्मुखे हि जिह्वादौ स्वयं एव स्फुरति अद: (भ. र. सि . १।२।२३४ ) हि प्रक्रिया आहे . श्रीमद भागवतात अनेक ठिकाणी हि प्रक्रिया विविध पद्धतीने वर्णन केली आहे जसे एका ठिकाणी असे नमूद केले आहे कि
ज्ञाने प्रयासम् उदपस्य नमन्त एव
जीवंती सन्मुखरितं भवदीय-वार्ताम
स्थाने स्तिाथ: श्रुति-गतां तनु-वाण-मनोभिर्
ये प्रायशो अजित जितोप्यसि तैस् त्रि-लोक्यम :(श्री भा १०।१४।३ )

हा खुप छान श्लोक आहे , तिथे अजित असे म्हंटले आहे , ज्याला कोणी जणू शकत नाही भगवंताचे दुसरे नाव आहे अजित . अजित म्हणजे कोणीही त्याला हरवू शकत नाही . कोणीही त्याच्या जवळ जाऊ शकत नाही . म्हणून त्याचे नाव अजित आहे . तर अजित पराजित होऊ शकतो . अजित जितोप्यसि. जरी भगवंताला कोणी जाणू किंवा जिंकू शकत नाही , तरी त्याला जिंकू शकतो . कसे ? स्थाने स्तिथा: