MR/Prabhupada 0132 - बिनवर्ग समाज म्हणजे निरुपयोगी समाज
Lecture on BG 7.1 -- Hyderabad, April 27, 1974
तर भगवद्-गीतेत आपल्याला सर्व मानवी समस्यांवर उपाय सापडतील ,सर्व समस्यांवर.
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः(भ गी ४।१३)
जोपर्यंत तुम्ही मानव समाज चार विभागांमध्ये विभागत नाही,ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य,क्षुद्र... आपल्याला विभागणे आवश्यक आहे. तुम्ही "वर्गविना समाज" म्हणू शकत नाही. तो निरुपयोगी समाज.वर्गविना समाज म्हणजे निरुपयोगी समाज. बुद्धिमान उच्च वर्ग, आदर्श दर्जाची माणसं पाहिजेत,"मानवी संस्कृतीची प्रगती पाहायला. त्याला ब्राह्मण म्हणतात.चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म...(भ गी ४।१३)
जोपर्यंत आदर्श मनुष्य समोर नसेल, तर समाज कोणाचं अनुसरण करेल.
यद्यदाचरति श्रेष्ठ, लोकस्तदनुवर्तते .(भ गी ३।२१)
ब्राम्हणांची शरीराच्या मेंदूशी तुलना केली जाते. जर मेंदूच नसेल,ह्या हाता पायांचा काय उपयोग आहे? जर एखाद्याचा मेंदू फुटला,वेडा माणूस ,तो काहीही करू शकत नाही. तर आत्ताच्या क्षणी,संपूर्ण मानव समाजात ब्राम्हणांची (बुद्धिमान) मनुष्यांची कमतरता आहे... त्याचा अर्थ असा नाही... ब्राम्हण वर्ग फक्त भारतीय हिंदूंमध्ये सीमित राहिले नाही. संपूर्ण मानवी समाजासाठी. श्रीकृष्णांनी कधीही असं सांगितलं नाही की चातुर्वर्ण्यं मया सृष्टं (भ गी ४।१३) .
हे फक्त भारतीयांसाठी आहे, किंवा हिंदू,किंवा ठराविक एका वर्गासाठी. संपूर्ण समाजासाठी,आदर्श बुद्धिवान माणूस असला पाहिजे, जेणे करून समाज त्याच अनुसरण करतील. मेंदू,समाजाचा मेंदू. ती भगवद् गीतेची शिकवण आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की,"मेंदू शिवाय काहीही करू शकतो." समजा तुमच्या शरीरातून मेंदू काढला,तुमचं शीर कापलं,तर तुम्ही संपलात. मेदू जर नसेल तर हात आणि पाय काय करतील, जर मेंदू नसेल? तर आत्ता या क्षणी संपूर्ण मानव समाजात मेंदूची कमतरता आहे. म्हणून,हि गोंधळलेली अवस्था आहे. म्हणून भगवद् गीतेत म्हंटले आहे की, तर गरज आहे. मानव समाज,संपूर्ण मानव संस्कृतीची ,ह्या प्रमाणे सुधारणा करण्याची गरज आहे.
नैसर्गिकरित्या पुरुषांचा बौद्धिक वर्ग आहे, पहिल्या दर्जाच्या बुद्धिमान माणसांचा वर्ग आहे,दुसऱ्या दर्जाची बुद्धिमान,तिसऱ्या दर्जाची बुद्धिमान,चौथ्या दर्जाची बुद्धिमान,त्यासारखे. तर पहिल्या दर्जाची बुद्धिमान माणस, ती ब्राम्हण असली पाहिजे,ब्राम्हणी पात्रात असलेली. आणि ती कृष्णभावनामृत असली पाहिजेत.मग ती संपूर्ण समाजाला योग्य मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन करू शकतील, आणि मग कसलीही अडचण नाही. हि कृष्णभावनामृत चळवळ. तर इथे श्रीकृष्णांनी सांगितलंय कस कृष्णभावनामृत बनायचं ते ब्राम्हणांसाठी किंवा बुद्धिमान दर्जाच्या माणसांसाठी. ते काय आहे? ते श्रीकृष्णांनी वर्णन केले आहे. मय्यासत्त्कमनाः "माझ्यावर मन आसक्त झाले पाहिजे,श्रीकृष्ण." हि सुरवात आहे.
ह्या नाहीतर त्या मार्गाने आपण... आपले मन दुसऱ्या कशावरतरी आसक्त असते. मन अलिप्त राहू शकत नाही. आपल्या बऱ्याच इच्छा आहेत. तर मनाचे काम - संलग्न रहाणे. म्हणूनच,मी काहीतरी स्वकारतो,काहीतरी नाकारतो. हे मनाचे खेळ. तर तुम्ही शुन्य बनू शकत नाही,तुम्ही इच्छारहित बनू शकत नाही. ते शक्य नाही. आमची पद्धत... जसे इतर ते सांगतात,"तुम्ही इच्छारहित बना." तो एक मूर्ख प्रस्ताव आहे. कोण इच्छारहित बनू शकतो? ते शक्य नाही. जर मला काही इच्छा नसतील,तर मी मृत.मनुष्य. मृत मनुष्याला इच्छा नसतात. तर ते शक्य नाही. आपण इच्छा शुद्ध केल्या पाहिजेत. ते आवश्यक आहे. इच्छा शुद्ध करा.
सर्वउपाधी-विनिर्मुक्तं तत् परत्वेनिर्मलं (चै च मध्य १९।१७०)
ह्याला शुद्धीकरण म्हणतात.निर्मलं तत् परत्वे. तत् परत्वे. म्हणजे जेव्हा कृष्णभावनामृत, भगवंत चेतना जागृत होते तेव्हा इच्छांचे शुद्धीकरण होते. तर आपण इच्छारहित स्थिती पर्यंत पोचण्यापेक्षा,इच्छांचे शुद्धीकरण केले पाहिजे. त्याची आवश्यकता आहे. म्हणून इथे सांगितलंय, मय्यासत्त्कमनाः "तुम्ही तुमचं मन इच्छारहित करण्यापेक्षा ,तुमचं मन माझ्यावर स्थिर करा." त्याची गरज आहे. मय्यासत्त्कमनाः पार्थ. हि योग पद्धती आहे. ह्याला भक्ती योग म्हणतात,आणि याला पहिल्या दर्जाचा योग म्हणतात. ते भगवद् गीतेत वर्णिले आहे,की
योगिनामपि सर्वेषां मद् गतेनान्तरात्मना (भ गी ६।४७)
योगी, पहिल्या श्रेणीचा योगी, योगिनामपि सर्वेषां... "निरनिराळ्या योग पद्धती आहेत, पण ज्याने भक्ती-योग स्वीकारला आहे, तो सतत माझा विचार करतो." ज्याप्रमाणे हि मुलं आणि मुली त्यांना सतत श्रीकृष्णांचा विचार करायला शिकवलं आहे. "हरे कृष्ण,हरे कृष्ण,कृष्ण कृष्ण,हरे हरे/ हरे राम,हरे राम,राम राम,हरे हरे." जर तुम्ही भगवद्-गीता वाचलीत हरे कृष्णाचा जप केलात,लगेच त्याला विज्ञानाचे परिपूर्ण ज्ञान होते. भगवान श्रीकृष्णांशी कसे जोडले जायचे त्याला म्हणतात मय्यासत्त्कमनाः। मय्यासत्त्कमनाः पार्थ योगं युञ्जन. योगाचा सराव... हा भक्ती-योग. मदाश्रयः मदाश्रयःम्हणजे "माझ्या निर्देशनानुसार," किंवा माझ्या संरक्षणाखाली."आश्रय.