MR/Prabhupada 0146 - माझ्या अनुपस्थित , जर ते ध्वनिमुद्रण सुरु केलं तर ते ध्वनिमुद्रण अचूकपणे तेच वाजेल
Lecture on BG 7.4 -- Nairobi, October 31, 1975
श्रीकृष्णांनी सांगितलंय की कसे तुम्ही भौतिक गोष्टींचा विचार करता. भौतिक शास्त्रज्ञ, ते पृथ्वीचा अभ्यास करतात. त्याला काय म्हणतात? माती विशेषज्ञ. ते मातीचा अभ्यास करत आहेत: "खाण कुठे आहे? सोन कुठे आहे? कोळसा कुठे आहे? हे ,ते कुठे आहे?" अनेक गोष्टी, ते अभ्यास करत आहेत. पण त्यांना माहित नाही ह्या गोष्टी कुठून आल्या. इथे आहे... श्रीकृष्णांनी स्पष्ट केलंय की भिन्ना मी प्रकृती:"हि माझी शक्ती आहे,माझी शक्ती." कशी हि वेगवेगळी रसायने आणि पृथ्वीवरील वस्तू प्रकट होतात. कोणताही विचारवंत मनुष्य, प्रत्येकजण जिज्ञासू असतो. इथे उत्तर आहे. इथे उत्तर आहे, की :भूमीरापोSनलो वायु:
- खं मनो बुध्दिरेव च
- अहंकार इतीयं मे
- भिन्ना प्रकृतिर अष्टधा:(भ गी ७।४)
भिन्ना प्रकृति अष्टधा. जसे मी बोलत आहे, तेच ध्वनीमुद्रित होत आहे. पण माझ्या अनुपस्थितीत, जर ते ध्वनीमुद्रण सुरु केलं तर ते ध्वनिमुद्रण अचूकपणे तेच वाजेल. तर माझी शक्ती किंवा कोणाचीतरी शक्ती,पण भिन्ना, माझ्यापासून वेगळी. तुम्ही अश्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. तर सर्वकाही देवाची, श्रीकृष्णांची शक्ती आहे. पण हे भौतिक जग म्हणजे आपण श्रीकृष्णांना विसरत आहोत हि शक्ती कुठून आली? तो मुद्दा आपण विसरत आहोत. भिन्ना. एखादा जो हे जाणतो... जसे तेच उदाहरण. ध्वनिमुद्रण चालू आहे,पण एखादा ज्याला माहित नाही हे ध्वनीमुद्रण कोणी केलय, तो शोधू शकत नाही. पण ज्याला आवाज माहित आहे, तो ओळखू शकतो, "हा प्रभुपादांचा आवाज आहे, किंवा स्वामीजी." तसेच, शक्ती इथे आहे, पण कारण आपण शक्तीचा स्त्रोत विसरलो आहोत किंवा आपल्याला शक्तीचा स्त्रोत माहित नाही, म्हणून आपण भौतिक गोष्टी अंतिम समजतो. हे आपलं अज्ञान आहे.
ही प्रकृती, भौतिक जग,ह्या गोष्टीनी बनली आहे.
- भूमीरापोSनलो वायु: खं मनो बुध्दिरेव च (भ गी ७।४)
तर हे कुठून येत आहे? ते श्रीकृष्णांनी स्पष्ट केलंय,की "त्या माझ्या शक्ती आहेत." कारण आपल्याला माहित हवं, तर... श्रीकृष्णांना समजणे म्हणजे एखाद्याला माहित हवं ही पृथ्वी काय आहे,हे पाणी काय आहे, हा अग्नी काय आहे,वायू काय आहे, आकाश काय आहे, हे मन काय आहे,अहंकार काय आहे. या भौतिक गोष्टी, त्यांना माहित पाहिजे की ह्या गोष्टी कुठून आल्या. ते फक्त असं मानतात की पाणी हे काही रासायनिक,हैड्रोजन,ऑक्सिजनचे मिश्रण आहे. पण हि रसायन कुठून आली, हैड्रोजन,ऑक्सिजन? त्याच ते उत्तर देऊ शकत नाहीत. तर म्हणून याला म्हणतात अचिंत्य-शक्ती. अचिंत्य-शक्ती. जर तुम्ही लागू केली नाही, जर तुम्ही नाकारलीत, अचिंत्य-शक्ती, भगवंतांमध्ये, अचिंत्य शक्ती,अकल्पनीय शक्ती,मग तिथे भगवंत अस्तित्वात नाहीत. अचिन्त्य-शक्ती-संपन्नह. आता तुम्ही समजू शकाल अचिंत्य शक्ती म्हणजे काय. अचिंत्य शक्ती तुम्हालाही मिळाली आहे,अचिंत्य शक्ती, कारण आपण भगवंतांचे अंश आहोत. म्हणून सूक्ष्म... पण आम्ही... गुणोत्तर काय आहे? गुणोत्तर आहे, शास्त्रात संगितलं आहे... ते काय आहे?
- केशाग्र-शत भागस्य शतधा कल्पितस्य च जीव-भागह स विज्ञेह स चानंत्याय कल्पते (चै च मध्य १९।१४०)
केशाग्र-शत भागस्य. फक्त कल्पना दिलीय. ते काय आहे? केसाच्या वरच्या अग्राचे,फक्त छोटा पूर्णविराम, तुम्ही त्याचे शंभर भागांमध्ये विभाजन केले. आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा शंभर भाग केले. ते म्हणजे,केसाच्या अग्राचे दशसहस्रांश भाग. ते पूर्णविरामासारखे आहे. तो जिवाच्या आकाराचा परिणाम आहे. आत्मा,अध्यात्मिक स्फुलिंग, सूक्ष्म भाग,अणुरूप. तर
- केशाग्र-शत भागस्य शतधा कल्पितस्य च जीव-भागह स विज्ञेह स चानंत्याय कल्पते (चै च मध्य १९।१४०).
तर सूक्ष्म भाग, पण कारण या भौतिक डोळ्यांनी आपण फक्त स्थूल गोष्टी बघू शकतो. सूक्ष्म गोष्टी ज्या आपण जाणू शकत नाही. परंतु श्रुतीमधून, शास्त्रावरून आपण समजून घेतले पाहिजे. मग तुम्ही समजून घ्याल. भगवद् गीतेत श्लोक आहे.
- इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धि (भ गी ३।४२).
ज्याप्रमाणे इथे सांगितलंय मनो बुद्धि: मनसस् च परा बुद्धि: मानापेक्षा बुद्धी श्रेष्ठ ते... दुसऱ्या एका ठिकाणी सुद्धा स्पष्ट केलंय की स्थूल गोष्टी म्हणजे इंद्रिय. इन्द्रियाणि पराण्याहु. हि स्थूल दृष्टी आहे. मी एका मनुष्याला बघतो म्हणजे. मी त्याचे शरीर,त्याचे डोळे,त्याचे कान, त्याचे हात,आणि पाय आणि बाकीसर्व बघतो. ती स्थूल दृष्टी आहे. पण स्थूल इंद्रियांपेक्षा सूक्ष्म, मन आहे जे इंद्रियांवर ताबा ठेवते. ते तुम्ही बघू शकत नाही.
- इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः (भ गी ३।४२).
मग बुद्धी मनावर नियंत्रण ठेवते. मनसस्तु परा बुद्धि: तर तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे. फक्त सामान्य माणसाप्रमाणे जर तुम्ही नाकारलंत की "देव नाही आहे,आत्मा नाही आहे," हा फक्त मूर्खपणा आहे. फक्त मूर्खपणा. अजाण राहू नका. इथे भगवद् गीता आहे. सर्वकाही खूप व्यवस्थित, सूक्ष्मपणे शिका, आणि हे सर्वांनसाठी खुले आहे.