MR/Prabhupada 0151 - आपण आचार्यांकडून शिकले पाहिजे
Lecture on SB 7.6.1 -- Madras, January 2, 1976
तर आपण विविध योजना तयार करत आहोत. पण त्या यशस्वी होणार नाहीत. काल रात्री मी त्याच स्पष्टीकरण दिल. की आपण स्वतंत्रपणे विचार करतो आणि आपण स्वतंत्रपणे अनेक गोष्टींच्या योजना आनंदी बनण्यासाठी आखतो. हे शक्य नाही. ते शक्य नाही. ती माया आहे भ्रम. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया. तुम्ही टाळू शकत नाही. मग अंतिम उपाय काय आहे?
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते (भ गी ७।१४).
जर आपण श्रीकृष्णांना शरण गेलो, मग आपण आपली मूळ स्थिती पुनरुज्जीवित करतो. ते आहे...कृष्णभावनामृत म्हणजे इतर अनेक गोष्टीत भावना गुतवण्याऐवजी... त्या सर्व प्रदूषित चेतना आहेत.वास्तविक... आपल्याला चेतन मिळाली आहे. ते सत्य आहे. पण आपली चेतना दूषित आहे. तर आपल्याला चेतना शुद्ध केली पाहिजे. चेतना शुद्ध करणे म्हणजे भक्ती. भक्तीची व्याख्या नारद पंचरात्रमध्ये दिली आहे... रूप गोस्वामी... रूप गोस्वामी.सांगतात.
अन्याभिलाषितांशून्यं ज्ञानकर्माद्यनावृतम् आनूकूल्येन कृष्णानुशीलनं भक्तिरुत्तमा (भक्तिरसामृतसिंधू १.१.११)
पहिल्या दर्जाची भक्ती दुसरा कुठलाही हेतू नाही. अन्याभिला कारण या भौतिक जगात,भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाखाली,
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकारविमूढात्मा कर्ता... (भ गी ३।२७)।. .
आपण प्रकृतीच्या नियंत्रणाखाली आहोत, भौतिक प्रकृती. परंतु कारण आपण मुर्ख आहोत, आपण आपली स्थिती विसरलो आहोत,म्हणून अहंकार, खोटा अहंकार. हा खोटा अहंकार आहे: "मी भारतीय आहे," "मी अमेरिकन आहे," "मी ब्राम्हण आहे," "मी क्षत्रिय आहे." हा खोटा अहंकार. म्हणून नारद पंचरात्र सांगत
सर्वोपाधी-विनिर्मुक्तम (चै च मध्य १९।१७०)
त्यामुळे या सगळ्या बाबींपासून मुक्त झालं पाहिजे. "मी भारतीय आहे," "मी अमेरिकन आहे," "मी हा आहे," "मी तो आहे." "मी..." सर्वोपाधी-विनिर्मुक्तम तत् परत्वेन निर्मलम. जेव्हा तो शुद्ध होतो, कोणत्याही हुद्द्याशिवाय, की "मी श्रीकृष्णानंचा अंश आहे." अहं ब्रम्हास्मि. हे अहं ब्रम्हास्मि आहे. श्रीकृष्ण परब्रम्हन आहेत. श्रीमद भागवद गीतेत त्यांचं वर्णन केलं आहे. अर्जुन...
परं ब्रम्ह परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् (भ गी १०।१२)
अर्जुनानेओळखलं आणि तो म्हणाला, तुम्हाला सर्व अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली आहे. त्यातील एक महाजन प्रल्हाद महाराज आहेत. मी महाजनांचे वर्णन केले आहे. ब्रम्हा महाजन आहेत, शंकर महाजन आहेत,आणि कपिल महाजन आहेत, कुमार,चार कुमार, ते महाजन आहेत, आणि मनू महाजन आहे. त्याचप्रमाणे, प्रल्हाद महाराज महाजन आहेत. जनक महाराज महाजन आहेत. बारा महाजन. अर्जुनाने पुष्टी दिली की "तुम्ही सांगत आहात,तुम्हीच पुरुषोत्तम भगवान आहात.
मत्तः परतरं नान्य (भ गी ७।७)
"आणि भगवद गीतेच्या टिकेवरून मी सुद्धा तुम्हाला परब्रम्हन म्हणून स्विकारतो. आणि फक्त तेच नाही, सर्व महर्षींनी सुद्धा तुम्हाला पुष्टी दिली आहे. अलीकडे, आपल्या काळी,रामानुजाचार्य, मध्वाचार्य, सगळ्या आचार्यांनी, त्यांनी सुद्धा श्रीकृष्णांचा स्वीकार केला आहे. अगदी शंकराचार्यानी ,त्यांनी सुद्धा श्रीकृष्णांना स्वीकारले. स भगवान स्वयं कृष्ण: तर सर्व आचार्यांनी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार केला आहे. तर आपण आचार्यांकडून शिकलं पाहिजे, सामान्य माणसाकडून किंवा स्वयं घोषित आचार्यांकडून नाही. नाही. ते करणार नाही. जसे आम्ही... कधीकधी न्यायालयात आपण इतर न्यायालयाकडून दिलेला न्याय गंभीरपणे घेतो कारण तो अधिकारी व्यक्तीने दिलेले असतो. आपण निकाल ठरवू शकत नाही. तसेच, भगवंत गीतेत सल्ला दिला आहे.आश्चर्योपासनं आपण आचार्यांकडे गेले पाहिजे. आचार्यवान पुरुषो वेद: "ज्याने गुरुशिष्य परंपरेने आचार्यांचा स्वीकार केला, त्याला गोष्टींचं ज्ञान असत." तर सर्व आचार्य, ते श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार करतात. नारद, ते सांगतात, व्यासदेव ,त्यांनी स्वीकारलंय, आणि अर्जुनाने सुद्धा स्वीकार केलाय,ज्याने प्रत्यक्ष श्रीकृष्णांनकडून ऐकले. आणि ब्रम्हा. काळ कोणीतरी प्रश्न विचारला होता की "द्वापार युगाच्या आधी श्रीकृष्णच नाव होत का?" नाही,तिथे. शास्त्रात,वेदात,अथर्व वेदामध्ये आणि इतर,श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्णांचे नाव आहे. आणि ब्रम्हसंहितेत - ब्रम्हानी, त्यांनी ब्रह्मसंहिता लिहिली - तिथे स्पष्टपणे विशद केलंय,
- ईश्वरः परमः कृष्ण: सच्चिदानंद विग्रह: (ब्रम्हसंहिता ५.१),
- अनादिरादि. अनादिरादिर्गोविन्द: सर्वकारणकारणम् (ब्रम्हसंहिता ५.१).
आणि श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात, मत्तः परतरं नान्यंत्किंचिदस्ति धनंजय (भ गी ७।७),
- अहं सर्वस्य प्रभवो (भ गी १०।८)
सर्वस्य म्हणजे सर्व देवता, सर्व जीव,सर्वकाही समाविष्ट आहे. आणि वेदांत सागत, जन्माद्यस्य यथो: (श्री भ १।१।१)
तर श्रीकृष्ण परिपूर्ण सर्वोच्च व्यक्ती, ईश्वरः परमः, ब्रम्हा सांगतात. ते वैदिक ज्ञान दिलं, आणि श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलंय,
- वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो (भ गी १५।१५).
हे अंतिम ध्येय आहे.