MR/Prabhupada 0160 - श्रीकृष्ण विरोध करत आहेत
Conversation at Airport -- October 26, 1973, Bombay
तर आमची कृष्णभावनामृत चळवळ लोकांना जीवनाचे मूल्य शिकवण्यासाठी आहे. आधुनिक शिक्षणाची पद्धत आणि संस्कृती ही इतकी खालच्या दर्जाची आहे की लोक जीवनाची मूल्य विसरली आहेत. साधारणपणे, या भौतिक जगात प्रत्येकजण जीवनाची मूल्ये विसरला आहे. मानवी आयुष्य जीवनाचे महत्व जागृत करण्यासाठी एक संधी आहे. श्रीमद्-भागवतात असं सांगितलंय, पराभवस्तावदबोधजातो यावन्न जिज्ञासत आत्मतत्त्वम् जोपर्यंत एखाद्याची आत्मसाक्षात्काराची जाणीव जागृत होत नाही. मूर्ख सजीव प्राणी,जे काही तो करत आहे ते त्याचा पराभव करत. हा पराभव निम्न प्रजातींमध्ये चालू आहे. कारण त्यांना समजत नाही जीवनाचे मूल्य काय आहे. त्यांची चेतना प्रगत नाही. पण अगदी मनुष्य जन्मात सुद्धा, तोच पराभव लांबणीवर पडत आहे, ती काही फार चांगली संस्कृती नाही. ती जवळपास जनावरांची संस्कृती झाली आहार-निद्रा-भय-मैथुन च समान्यायतेत पशुभीर नाराणाम जर लोक फक्त शारीरिक मागणीच्या चार तत्वांत गुंतली-आहार-निद्रा-भय-मैथुन- ते प्राणी जीवनात सुद्धा दिसून येते, त्यामुळे संस्कृतीची फार प्रगती होत नाही तर आपला प्रयत्न कृष्णभावनामृत चळवळ ही लोकांना मानवी जातीच्या जबाबदाऱ्या शिकवण्याचा आहे. ही आपली वैदिक संस्कृती आहे. आयुष्याच्या समस्या या जीवनाच्या कालावधी पुरत्या मर्यादित नाहीत. जीवनाची वास्तविक समस्या जन्म मृत्यू जरा व्याधी यांची पुनरावृत्ती कशी थांबवायची. त्या सूचना भगवद् गीतेत आहेत.
- जन्ममृत्यूजराव्याधी दुःखदोषानुदर्शनम् (BG 13.9)
लोक आयुष्याच्या समस्यांमुळे गोधळलेले असतात, पण जीवनाची वास्तविक समस्या जन्म मृत्यू जरा व्याधी कसे थांबवायचे. लोक निष्ठुर झाली आहेत. त्यांच्या मंद बुद्धीमुळे ते जीवनाच्या समस्या समजत नाहीत. खूप वर्षांपूर्वी, जेव्हा विश्वामित्र मुनींनी दशरथ महाराजांना पहिले, विश्वामित्र मुनींनी दशरथ महाराजांना विचारले ऐहिस्तं यत् तम् पुनर जन्म जयय: "महाराज, तुम्ही मृत्यूवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, ते चांगलं चाललं आहे का? त्यात काही व्यत्यय आला का?" तर हि आपली वैदिक संस्कृती, जन्म,मृत्यू,जरा,व्याधीवर कसा विजय मिळवायचा. पण आताच्या आधुनिक काळात अशी काही माहिती नाही, कोणाला त्यात स्वारस्य नाही. अगदी मोठे मोठे प्राध्यापक, त्यांना माहित नाही या जीवनानंतर काय आहे. ते मृत्यूनंतर पुनर्जन्म होतो यावर ते विश्वास ठेवत नाहीत. तर हि अंध संस्कृती आहे. जी चालू आहे. जीवनाचा उद्देश विशेषतः मनुष्य जन्मात काय आहे हे शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हे शारीरिक गरजांपेक्षा वेगळं आहे, आहार,निद्रा,भय मैथुन. भगवद् गीतेत सुद्धा असं सांगितलंय,
- मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्ध्ये (BG 7.3)
"सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच त्याच्या जीवनांत सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो." सिद्धये,सिद्धी. ती सिद्धी, कसा जन्म,मृत्यू,जरा व्याधीवर विजय मिळवायचा. आणि मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्ध्ये, आधुनिक सुसंस्कृत मनुष्य एवढा मंद आहे, त्याला सिद्धी म्हणजे काय समजत नाही. ते विचार करतात की "मला काही पैसे मिळाले आणि एक बंगला आणि एक गाडी, ती आहे सिद्धी." ती सिद्धी नव्हे. तुम्हाला काही वर्ष खूप छान बंगला,गाडी,चांगले कुटूंब मिळू शकेल. पण कोणत्याही क्षणी हि योजना संपेल आणि तुम्हाला दुसरं शरीर स्वीकारावं लागेल. ते तुम्हाला कळणार नाही.आणि ते जाणून घेण्याची काळजी घेतात. तर ते इतके मंद बुद्धीचे झाले आहेत, जरी त्यांना शिक्षणाचा ,आधुनिक संस्कृतीचा गर्व झाला आहे. पण आम्ही अंदोलन करत आहोत. आम्ही विरोध करत आहोत. मी विरोध करत नाही. श्रीकृष्ण विरोध करतात.
- न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमाः
- माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः (BG 7.15)
हे तिरस्करणीय लोक, खालच्या दर्जाची माणसं आणि कायम पापकर्म करण्यात गुंतलेली असतात. अशी माणसं कृष्णभावनामृत स्वीकारत नाहीत. "नाही. ती जास्त शिकलेली असतात MA,PhD's." भगवान श्रीकृष्ण सांगतात,माययापहृतज्ञाना. "वरवर पाहता ते अतिशय शिकलेले आहेत, पण त्यांचं खरं ज्ञान मायामुळे नष्ट झाले आहे. आसुरं भावमाश्रिताः ही निरीश्वरवादी संस्कृती अतिशय धोकादायक आहे या करणास्तव लोक दुःख भोगत आहेत. पण ते फार गंभीर नाहीत. म्हणूनच श्रीकृष्ण त्यांना मुढं, नराधम संबोधतात.न मां दुष्कृतिनो मूढा: म्हणून आम्ही या मूढांना, मुढं संस्कृती, प्रकाशमय अध्यात्मिक जीवनात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. हा आमचा विनम्र प्रयत्न आहे. पण हे आधीच सांगितलं आहे.
- मनुष्याणां सहस्रेषु (BG 7.3)
"सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच, हे स्वीकारु शकतो." मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्ध्ये. पण अर्थ असं नाही की आपण थांबलं पाहिजे. ज्याप्रमाणे आमच्या शाळा महाविद्यालयीन दिवसात. आशुतोष मुखर्जी सरांनी विद्यापीठात उच्च शिक्षण, पदव्युत्तर वर्ग सुरु केले. एक किंवा दोन विद्यार्थी होते, तरीही बऱ्याच हजार रुपयांचा खर्च करून चालू ठेवण्यात आला होता. फक्त एक किंवा दोन विद्यार्थी आहेत याच विचार न करता. त्याचप्रमाणे ही कृष्णभावनामृत चळवळ चालूच ठेवा मूर्ख लोक, त्यांना समजल नाही किंवा ते आले नाहीत. याने काही फरक पडत नाही आपण आपला प्रचार चालू ठेवायचा. धन्यवाद.