MR/Prabhupada 0201 - तुमची मृत्यु कशी थांबवावी

Revision as of 07:36, 14 May 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0201 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on CC Madhya-lila 20.102 -- Baltimore, July 7, 1976


तर आपण ज्ञानाच्या मागे आहोत, पण बऱ्याच गोष्टी आपल्याला अज्ञात आहेत . म्हणूनच सनातन गोस्वामी त्यांच्या प्रात्यक्षिक वागणुकीतून , अध्यात्मिक स्वामींशी संपर्क करण्याचे मार्ग शिकवत आहेत . आणि आपला पक्ष ठेवत आहेत कि , "मी अशाप्रकारे ग्रस्त आहे. " ते एक अधिकारी होते, दुःखांचा प्रश्नच नव्हता. ते फार चांगल्या प्रकाराचे जीवन जगत होते. त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की , ग्राम्य-व्यवहारे पंडित। ताई सत्य करी मानि । "मला उत्तर देता येत नाही असे अनेक प्रश्न आहेत.त्यांचे कोणत्याही प्रकारचे उत्तर नाही . तरीही, लोक म्हणतात की मी खूप हुशार मनुष्य आहे - मी ते मूर्खपणे स्वीकारतो." जोपर्यंत एखादा गुरुकडे जात नाही तो ज्ञानी बानू शकत नाही .

तद-विज्ञानार्थम स गुरुम एवाभीगच्छेत ( मु उ १।२।१२)

म्हणूनच वेदिक आज्ञा अशी आहे की जर तुम्हाला शिकायचे असेल तर मग गुरु, योग्य गुरूंकडे जा, तथाकथित गुरूंकडे नाही.

तद विद्धि प्रणिपातेन
परिप्रश्नेन सेवया
उपदेक्षयन्ति ते ज्ञानम
ज्ञानिनस तत्व-दर्शिन: (BG 4.34)

गुरू म्हणजे ज्यांनी परम सत्य पाहिले आहे. ते गुरू आहेत . तत्व-दर्षिना: तत्व-म्हणजे परम सत्य , आणि दर्शिनः , ज्याने पाहिले आहे. तर ही चळवळ, आपली कृष्ण भावनामृत चळवळ, या उद्देश्यासाठी, संपूर्ण सत्य पाहण्यासाठी , परम सत्य जाणण्यासाठी , जीवनातील समस्या जाणून घेण्यासाठी , आणि त्याचे समाधान प्राप्त करण्यासाठी . या गोष्टी आमचे विषय आहेत . आमचे विषय भौतिक गोष्टी नाहीत, कि कसेतरी आपल्याला गाडी आणि चांगले घर आणि चांगली पत्नी मिळेल , आणि नंतर आपल्या सर्व समस्या सुटतील. नाही . ते समस्येचे उत्तर नाही आहे .

वास्तविक समस्या आहे आपली मृत्यू कशी थांबवावि , ती खरी समस्या आहे . परंतु ही बाब फारच अवघड आहे म्हणून कोणीही त्याला स्पर्श करीत नाही . "अरे, मृत्यू- आम्ही शांतपणे मारावे " पण कुणीही शांतपणे मारत नाही. जर मी एक खंजीर घेतला आणि मी म्हणालो, "आता शांतपणे मर ," (हशा) संपूर्ण शांततेची स्थिती लगेच भंग होईल .तो रडू लागेल. तर हा मूर्खपणा आहे, जर कोणी म्हणते, "मी शांतपणे मरेन ." कोणीही शांतपणे मरत नाही, हे शक्य नाही. म्हणून मृत्यू एक समस्या आहे. जन्म देखील एक समस्या आहे. आईच्या गर्भाशयात असताना कोणीही शांत नसतं . ते बंदिस्त , निर्वात आणि आजकाल त्यांना हत्येचाही धोका आहे. तर शांतीचा प्रश्नच उद्भवत नाही ,जन्म आणि मृत्यू . आणि मग वृद्धत्व . जसे मी वृद्ध मनुष्य आहे, मला बरेच त्रास आहेत. त्यामुळे वृद्धत्व . आणि रोग, प्रत्येकास अनुभव आला असेल , केवळ डोकेदुखी देखील त्रास देण्यासाठी पुरेशी आहे. वास्तविक समस्या ही आहे: जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग . कृष्णाद्वारे ते विधान केले गेले आहे,

जन्म-मृत्यु-जरा-व्याधि दुःख -दोशानुदर्शनम (BG 13.9)

जर तुम्ही हुशार असाल तर तुम्हाला आयुष्याच्या या चारही समस्या अतिशय धोकादायक समजल्या पाहिजेत. त्यांना काही समज नाही. म्हणून ते हे प्रश्न टाळतात. परंतु आम्ही हे प्रश्न गंभीरतेने घेतो. इतर चळवळ आणि कृष्ण भावनामृत चळवळीत हा फरक आहे . आमची चळवळ या समस्यांचे निराकरण कसे करायचे यासाठी आहे .