MR/Prabhupada 0174 - प्रत्येक जीव भगवंताचे मूल आहे

Revision as of 09:54, 27 May 2018 by Sushil (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0174 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 1.8.26 -- Los Angeles, April 18, 1973


प्रत्येक जीव भगवंतांचे मूल आहे. भगवंत सर्वांचे पिता आहेत. श्रीकृष्ण सांगतात:अहम् बीजप्रदः पिता "मी सर्व जीवांचा बीज प्रदान करणारा पिता आहे."

सर्वयोनिषु कौन्तेय (BG 14.4).

"ते कोणत्याही रूपात असले,ते सर्व जीव आहेत, ते सर्व माझे पुत्र आहेत." खरंतर ते सत्य आहे. आपण सर्व जीव,आपण सर्व भगवंतांचे पुत्र आहोत. पण आपण विसरलो आहोत. म्हणून आपण लढत आहोत. ज्याप्रमाणे एका चांगल्या घराण्यात,जर एखाद्याला माहित असेल; "पिता आपल्याला जेऊ घालत आहे. तर आपण भाऊ, आपण का लढायचं?" त्याचप्रमाणे जर आपली देव भावना जागृत झाली,जर आपण कृष्णभावनमृत बनलो,ही लढाई संपुष्टात येईल. "मी अमेरिकन आहे,मी भारतीय आहे, मी रशियन आहे, मी चायनीज आहे." या सगळ्या मूर्ख गोष्टी संपतील कृष्णभावनामृत चळवळ इतकी छान आहे. ज्यावेळी लोक कृष्णभावनामृत बनतील.

ही लढाई, ही राजकीय लढाई,राष्ट्रीय लढाई,लगेच संपेल. का रणं त्यांची खरी चेतना जागृत होईल की सर्व काही देवाच्या मालकीचे आहे आणि ज्याप्रमाणे मुलांना, कुटुंबातील मुलाला पित्याकडून लाभ घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे जर प्रत्येकजण भगवंतांचे अंश आहेत. जर प्रत्येकजण भगवंतांचे मूल आहे. प्रत्येकाला वडिलांची मालमत्ता वापरण्याचा हक्क मिळाला आहे. तर तो हक्क आहे... तो हक्क नाही, तो हक्क मानव समाजाच्या मालकीचा आहे. भगवद् गीतेनुसार हा हक्क सर्व जीवांचा आहे. तो जीव आहे,किंवा जनावर किंवा वृक्ष,किंवा पक्षी,किंवा पशु, किंवा कीटक आहे का याचा विचार करु नका. ती कृष्णभावना आहे. आपण असा विचार करत नाही की फक्त माझा भाऊ चांगला आहे,मी चांगला आहे. आणि बाकी सर्व वाईट. अशाप्रकारच्या संकुचित भावनेचा आपण द्वेष करतो व तिचा त्याग करतो. आपण विचार करतो

पण्डिताः समदर्शिनः (भगवद् गीता ५.१८)

भगवद् गीतेत तुम्हाला सापडेल.

विद्याविनयसंपन्ने ब्राम्हणे गवि हस्तिनि
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः (BG 5.18)

एखादा जो पंडित आहे. जो शिकलेला आहे,तो प्रत्येक जीवाला समान पातळीवर पाहतो. म्हणून वैष्णव इतका दयाळू आहे. लोकानाम हितकारीनौ ते खरच मानवाच्या फायद्याच काम करू शकतात. ते पहातात,खरंतर त्यांना जाणवत की सर्व जीव, हे भगवंतांचे अंश आहेत. काही मार्गाने किंवा इतर, या भौतिक जगाच्या संपर्कामुळे त्यांचे पतन झाले आहे. आणि वेगवेगळ्या कर्मानुसार,त्यांनी वेगवेगळे देह धारण केले आहेत . तर पंडित, जो ज्ञानी आहेत त्याच्यामध्ये ते कोणताही भेदभाव करत नाहीत. "हे जनावर आहे, ते कत्तलखान्यात पाठवले पाहिजे, आणि हा मनुष्य आहे, तो ते खाईल." नाही. खरंतर कृष्णभावनामृत मनुष्य,तो प्रत्येकास दया दाखवतो. प्राण्यांची का कत्तल करायची. म्हणूनच आपलं तत्वज्ञान मांस खाण्याचे नाही. . मांसाहार नाही. तुम्ही करू शकत नाही. म्हणून ते आमचं ऐकत नाहीत. "हा काय मूर्खपणा आहे? हे आपलं अन्न आहे.का मी खाऊ शकत नाही?" कारणं

एधमान मदः (SB 1.8.26)

तो नशा घातलेला आहे. वास्तविक सत्य तो ऐकणार नाही.