MR/Prabhupada 0252 - आपण विचार करतो की आपण स्वतंत्र आहोत

Revision as of 12:22, 11 June 2018 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0252 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.6 -- London, August 6, 1973

तर सर्व भौतिकवादी लोक, ते इतके मूर्ख,अपराधी आहेत,ते या भौतिकगोष्टी वाढवत आहेत. ते विचार करतात या भौतिक गोष्टी वाढवून ते आनंदी होतील.नाही. ते शक्य नाही. दूरशया ये... आणि त्यांचे नेते... अन्धा यथान्धैरुपनीयमाना स्तेSपीशतन्त्र्यामुरुदाम्नि बद्धाः ((श्री भ ७।५।३१) आपण सगळे खूप घट्ट बांधले गेले आहोत, हात आणि पाय,आणि आपण विचार करतो आपण मुक्त आहोत, स्वतंत्र. भौतिक प्रकृतीच्या नियमाने... तरीही, आपण विचार करतो की आपण स्वतंत्र आहोत. शास्त्रज्ञ विज्ञानाने देवापासून स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ते शक्य नाही. आपण भौतिक प्रकृतीच्या घट्ट पकडीत आहोत. भौतिक प्रकृती म्हणजे श्रीकृष्णांची प्रतिनिधी. मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते साचराचरम्भ गी ९।१०) प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः (भ गी ३।२७)आपण सतत अर्जुनासारखे गोंधळलेल्या स्थितीत असतो,काय करायचे आणि काय करायचे नाही. पण जर आपण हे तत्व स्वीकारलं,की "आपण श्रीकृष्णांसाठीच करू..." तर श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन घ्या आणि श्रीकृष्णांच्या प्रतिनिधींकडून मार्गदर्शन घ्या आणि तुम्ही हे करा; मग तिथे नाही कर्म्माणि निर्दहति किन्तु च भक्तिभाजां (ब्रम्हसंहिता ५.५४). नाहीतर,आपण प्रत्येक कर्माच्या परिणामाने बांधले गेले आहोत. आपण बाहेर पडू शकत नाही. तर हा गोंधळ, "मी युद्ध करु की न करु," ते स्पष्ट केली की " हो तू युद्ध श्रीकृष्णांसाठी कर. मग ते बरोबर आहे." कामः कृष्ण कर्मार्पणे. हनुमानाप्रमाणे. तो प्रभू रामचंद्रांसाठी लढला. तो स्वतःसाठी लढला नाही. त्याचप्रमाणे,अर्जुन सुद्धा, त्याचा ध्वज कपी-ध्वज, त्याच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे. त्याला हे माहित होत. तर हनुमान महान योद्धा रावणाबरोबर लढला, त्याच्या व्यक्तिगत फायद्यासाठी नाही. त्याला रस होता, कसे रावणाच्या हातातून सीताजीला सोडवायचे. संपूर्ण कुटुंबाची हत्या करायची,आणि तिला सोडवायची आणि ती रामचंद्रांच्या बाजूला बसू दे. हे हनुमानाचे,भक्ताचे धोरण आहे. आणि रावणाचे धोरण आहे "सीतेला रामाच्या तावडीतून सोडवून घ्यायची आणि तिला उपभोगायची." हे रावणाचे धोरण आहे. आणि हनुमानाचे धोरण आहे: "रावणाच्या हातातून सीतेला सोडवायचे. आणि तिला रामाच्या बाजूला बसवायचे." तीच सीता. सीता म्हणजे लक्ष्मी. तर लक्ष्मी म्हणजे नारायणाची शक्ती आहे, देवाची शक्ती. तर आपण हे धोरण जाणलं पाहिजे की सर्व भौतिकवादी लोक, रावण,ते देवाची मालमत्ता उपभोगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या नाहीतर त्या मार्गाने... अर्थात आम्ही रावणाच्या दर्जाच्या माणसांशी लढू शकत नाही.... ते आहे... आपण एवढे शक्तिमान नाही. म्हणून आपण भिकारी बनण्याचे धोरण स्वीकारलं आहे "श्रीमान,तुम्ही खूप चांगले आहेत. कृपया आम्हाला काहीतरी द्या. काहीतरी द्या. कारण तुम्ही देवाची मालमत्ता ठेवून तुमचे जीवन बिघडवत आहात,तुम्ही नरकात जाणार आहेत. या नाहीतर त्या मार्गाने, जर तुम्ही सदस्य झालात,तर तुम्हाला वाचवलं जाईल. तुम्हाला वाचवलं जाईल." ते आपलं धोरण आहे. आपण भिकारी नाही. पण हे धोरण आहे. आता आपण एवढे ताकदवर नाही की रावणाबरोबर लढू; नाहीतर, आम्ही सर्व पैसे भांडून घेतले असते. पण ते शक्य नाही. आम्ही एवढे ताकदवर नाही. म्हणून आम्ही भिकाऱ्याचे धोरण घेतले आहे. आभारी आहे.