MR/Prabhupada 0256 - या कली युगात श्रीकृष्ण त्यांच्या नावाच्या रूपात येतात. हरे कृष्ण

Revision as of 11:09, 14 June 2018 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0256 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.8 -- London, August 8, 1973

कृष्ण-वर्णम त्विशाकृष्णम
सांगोपांगास्त्र-पारषदम
यजै: संकीर्तनै: प्रायैर
यजन्ति हि सुमेदस:
(श्री भ ११।५।३२)
तर इथे या खोलीत, विशेषतः, कृष्णवर्ण त्विषाकृष्णं, इथे चैतन्य महाप्रभु आहेत. ते स्वतः कृष्ण आहेत,पण त्यांचा वर्ण अकृष्ण आहे,सावळा नाही. कृष्णवर्ण त्विषाकृष्णं… त्विषा म्हणजे वर्णनानुसार. आकृष्ण. पिवळसर सांगोपांगास्त्रपार्षदम् आणि ते त्यांच्या पार्षदांबरोबर आहेत. नित्यानंद प्रभू, अद्वैत प्रभू, श्रीवासादी गौर-भक्त-वृंदा. या युगात आराधना करण्याचा देवता आहेत. कृष्णवर्ण त्विषाकृष्णं. तर पूजेची काय पद्धत आहे? यज्ञैः संकीर्तनप्रायैर्यजन्ति हि सुमेधसः हा संकीर्तन यज्ञ, जसा आपण चैतन्य,नित्यानंद आणि इतरां समोर करत आहोत. हा यज्ञ करणे या कली युगात सर्वात उत्कृष्ट आहे. नाहीतर, इतर नाही… म्हणून तो यशस्वी होत आहे. केवळ हा अधिकृत यज्ञ आहे. बाकीचे यज्ञ, राजसूय यज्ञ, हा यज्ञ, की… अनेक यज्ञ आहेत… आणि काहीवेळा भारतात, ते तथाकथित यज्ञ करतात. ते पैसे गोळा करतात. एवढंच. ते यशस्वी होणं शक्य नाही कारण तिथे यज्ञीक ब्राम्हण नाही. आताच्या क्षणी यज्ञीक ब्राम्हण अस्तित्वात नाहीत. यज्ञीक ब्राम्हण वैदिक मंत्र बरोबर उच्चारले का ते तपासून पाहत. चाचणी अशी की एक जनावर अग्नीत टाकून पाहणे आणि ते तरुण शरीर घेऊन परत येईल. यज्ञ उत्तमरीत्या पार पडल्याची ती तपासणी आहे. ब्राम्हण, यज्ञीक ब्राम्हण, ते वेद मंत्र बरोबर उच्चारत. हि चाचणी आहे. पण आता या युगात तसे ब्राम्हण कुठे आहेत. म्हणून यज्ञ करण्याची शिफारस केलेली नाही. कलौ पंच विवर्जयेत अश्वमेधम, अवलंभं संन्यासं बाल-पैत्रकं, देवरेण सूत-पित्र कलौ पंच विवर्जयेत (चैतन्य चरितामृत मध्य १७.१६४). तर या युगात यज्ञ नाही. यज्ञीक ब्राम्हण नाहीत. केवळ हा यज्ञ आहे: हरे कृष्ण मंत्राचा जप करा आणि ब्रम्हानंदात नृत्य करा. केवळ हा यज्ञ आहे. 

तर राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्(भ गी २।८) पूर्वीच्या काळी अनेक असुर देवतांची राज्य जिकायचे. राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् हिरण्यकश्यपुप्रमाणे. त्याने इंद्राच्या राज्यावरही आपला गाजवला. इन्द्रारिव्याकुलं लोकं मृड यन्ति युगे युगे (श्री भ १।३।२८) । इन्द्रारि. इन्द्रारि म्हणजे इंद्राचा शत्रू. इंद्र स्वर्गाचा राजा आहे,आणि शत्रू म्हणजे असुर. देवता आणि त्यांचे शत्रू,असुर. ज्याप्रमाणे आपल्याला अनेक शत्रू आहेत. कारण आपण हरे कृष्णाचा जप करतो,इथे अनेक टीकाकार आणि अनेक शत्रू सुद्धा आहेत. त्यांना आवडत नाही. तर हे नेहमीच असते. आता संख्या वाढली आहे. पूर्वी,काही होते. आता अनेक आहेत. तर म्हणून इन्द्रारिव्याकुलं लोकं जेव्हा हे असुर, लोकसंख्या,असुरी लोकसंख्येत वाढते, मग इन्द्रारिव्याकुलं लोकं लोक गोंधळून जातात. इन्द्रारिव्याकुलं लोकं मृड यन्ति युगे युगे तर जेव्हा, त्यावेळेला,श्रीकृष्ण येतील. एते चांशकला: पुंसः कृष्णस्तु भगवान् स्वयम् (श्री भ १।३।२८) । देव आणि श्रीकृष्णांच्या अवतारांच्या नावांची यादी आहे. पण सर्व नावांचा उल्लेख केल्यावर,भागवत दर्शवतो की:"यासह सर्व नाव सूचीबद्ध आहेत, ते श्रीकृष्णांचे आंशिक प्रतिनिधी आहेत. पण श्रीकृष्णांचे नाव तिथे आहे. ते खरे,मूळ व्यक्तिमत्व…" कृष्णस्तु भगवान् स्वयम् आणि ते येतात… इन्द्रारिव्याकुलं लोकं असुरांचा हल्ल्याने जेव्हा लोक अतिशय गोंधळलेली असतात, तेव्हा तो येतो. आणि त्यांनी सुद्धा पुष्टी दिली आहे. हे शास्त्र आहे. एक शास्त्र सांगत ते येतात या स्थितीत. आणि श्रीकृष्ण सांगतात: "हो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत… तदात्मानं सृजाम्यहम् (भ गी ४।७)

त्या वेळेला. मी येईन."तर या कली युगात, लोक इतकी अस्वस्थ आहेत. म्हणून, श्रीकृष्ण त्यांच्या नावाच्या रूपाने आले, हरे कृष्ण. श्रीकृष्ण व्यक्तिशः आले नाहीत, पण त्यांचे नाव. पण श्रीकृष्ण परिपूर्ण आहेत, त्यांचे नाव आणि ते स्वतः यामध्ये काही फरक नाही. अभिन्नत्वान नाम नामिनो: (चै च मध्य १७।१३३)  नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रहः पूर्ण: शुद्धो नित्य मुक्तः. नाव परीपूर्ण आहे. जसे श्रीकृष्ण परिपूर्ण आहेत, पूर्ण,त्याचप्रमाणे, कृष्णाचे नाव सुद्धा परिपूर्ण आहे,पूर्ण. शुद्ध. ती भौतिक गोष्ट नाही. पूर्ण: शुद्धो नित्य शाश्वत. जसे श्रीकृष्ण शाश्वत आहेत, त्यांचे नाव सुद्धा शाश्वत आहे. पूर्ण: शुद्धो नित्य मुक्तः.हरे कृष्णाच्या जपात भौतिक संकल्पना नाही. अभिन्नत्वान नाम नामिनो: नाव, नाव आणि भगवान, ते अभिन्न,एकच. तर आपण आनंदी असू शकत नाही. राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् (भ गी २।८)  अगदी जरी देवांचे राज्य आपल्याला मिळाले,अस्पत्य कोणत्याही प्रतिस्पर्ध्या शिवाय, तरीही आपण आनंदी असू शकत नाही जोपर्यंत भौतिक संकल्पना आपल्याकडे आहे. ते शक्य नाही. ते या श्लोकात स्पष्ट केले आहे. आभारी आहे. एवढेच.