MR/Prabhupada 0270 - प्रत्येकाची स्वतःची नैसर्गिक प्रवृत्ती आहे
Lecture on BG 2.7 -- London, August 7, 1973
प्रद्युम्न: भाषांतर, "माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वांत श्रेयस्कर काय आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा.
प्रभुपाद: हा भगवद् गीतेतील खूप महत्वाचा श्लोक आहे. हा आयुष्याला वळण देणारा श्लोक आहे. कार्पण्य-दोष.कृपण,दोष म्हणजे चूक. जेव्हा एखादा त्याच्या परिस्थितीनुसार वागत नाही,ती चूक आहे. आणि त्याला कृपण म्हणतात. तर प्रत्येकाची स्वतःची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, स्वभाव. यस्य हि स्वभावस्य तस्यासो दुरातिक्रमः स्वभाव, नैसर्गिक प्रवृत्ती. हे सर्वसाधारण उदाहरण आहे, ते दिले जाते, की यस्य हि यस्य हि स्वभावस्य तस्यासो दुरातिक्रमः एक… सवय दुसरा स्वभाव आहे.एखाद्याचा स्वभाव,सवय,ती बदलणे कठीण आहे. किंवा एखाद्याची वैशिष्ट्यपूर्ण,प्रवृत्ती आहे, ती बदलणे खुप कठीण आहे. उदाहरण दिले आहे: श्वा यादी क्रियते राजा सः किं न सो उपर्हनम् जर तुम्ही कुत्र्याला राजा बनवलात, त्याचा अर्थ असा आहे का की तो चप्पल चाटणे सोडून देईल? हो, कुत्र्याचा स्वभाव चप्पल चाटणे हा आहे. तर जरी तुम्ही त्याला राजासारखा पोशाख घातलात आणि त्याला सिंहासनावर बसवलेत. तरीही,जेव्हाकेव्हा तो चप्पल बघेल, तो त्यावर उडी मारेल आणि चाटायला लागेल. याला स्वभाव म्हणतात. कार्पण्य-दोष. तर पशु जीवनात, एखाद्याचा स्वभाव बदलणे शक्य नाही.जो भौतिक प्रकृतीने मिळाला आहे.प्रकृती. प्रकृतेः क्रियमाणानि (भ गी ३।२७) । कारणं गुणङ् गोsस्य सदसद्योनिजन्मसु (भ गी १३।२२) का? सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत. म्हणून मुळात सर्व जीवांचा स्वभाव भगवंतांसारखा आहे. केवळ हा मात्रेचा प्रश्न आहे. गुण समान आहेत. ममैवांशो जीवभूतः (भ गी १५।७) । तेच उदाहरण. जर तुम्ही समुद्राचा एक थेंब घेतलात, गुण,रासायनिक रचना समान आहे. पण मात्रा भिन्न आहे, हा एक थेंब आहे,आणि समुद्र विशाल महासागर आहे. त्याचप्रमाणे, आपण श्रीकृष्णांच्या समान गुणवत्तेचे आहोत. आपण अभ्यास करू शकतो. लोक का म्हणतात भगवंत निराकार आहेत? जर मी समान गुणांचा आहे,तर भगवानही व्यक्ती आहेत, ते निराकार कसे असू शकतील? जर गुणात्मकदृष्ट्या, आपण एक आहोत,तर ज्याप्रमाणे व्यक्तिगत रूप अनुभवतो,तर भगवंताचे व्यक्तिव्य का नाकारायचे? हा आणखी एक मूर्खपणा आहे.मायावादी दुष्ट, ते समजू शकत नाहीत भगवंतांची प्रकृती काय आहे. बायबलमध्ये सुद्धा सांगितलंय: "मनुष्य परमेश्वरासारखा बनवला आहे." तुम्ही परमेश्वराच्या गुणांचा अभ्यास तुमच्या गुणांच्या अभ्यासाने करू शकता. केवळ फरक एवढाच मात्रा भिन्न आहे. माझ्याकडे काही गुणवत्ता,उत्पादक क्षमता आहे. आम्ही देखील उत्पादन करतो,प्रत्येक जीवात्मा काहीतरी उत्पादन करत आहे. पण त्याच्या उत्पादनाची तुलना देवाच्या उत्पादनाशी करू शकत नाही. आपण उडत्या यंत्राचे उत्पादन करत आहोत. आपण गर्व करतो की: "आता आपण स्फुटनिकाचा शोध लावला आहे.ते चंद्रावर जात आहे." पण ते पूर्ण नाही.ते परत येत आहे. पण देवांनी अनेक,लाखो आणि करोडो उडते, खूप खूप जड ग्रह निर्माण केले. ज्याप्रमाणे हा ग्रहाप्रमाणे अनेक मोठे मोठे पर्वत,समुद्र उचलत आहे,पण तरीही उडत आहे. तो एका कापसाप्रमाणे उडत आहे. हि परमेश्वराची शक्ती आहे. गामाविष्य (भ गी १५।१३) भगवद् गीतेत तुम्हाला सापडेल: अहं धारयाम्यहमोजसा कोण मोठमोठे ग्रह उचलून धरत आहे? आम्ही गुरुत्वाकर्षणाबद्दल बोलत आहोत. आणि शास्त्रात आपल्याला सापडते की ते शंकर्षणाद्वारे वाहून नेले जाते.