MR/Prabhupada 0298 - जर तुम्ही श्रीकृष्णांची सेवा करायला उत्सुक असाल, ती खरी अमूल्य संपत्ती आहे

Revision as of 05:03, 24 October 2018 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0298 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture -- Seattle, October 4, 1968

प्रभुपाद: काही प्रश्न आहेत का?

विष्णूजन: आम्ही कशी श्रीकृष्णांना पूर्ण सेवा देऊ शकतो? प्रभुपाद: तुमच्या चिंतेने. (हशा, "हरीबोल!") जर तुम्ही श्रीकृष्णांची सेवा करण्यास उत्सुक असाल, ती खरी संपत्ती आहे. श्रीकृष्ण अमर्याद आहेत. आपण त्यांना कोणती सेवा देऊ शकतो? आणि त्यांना अमर्याद सेवक सुद्धा आहेत. तुमच्या आणि माझ्याकडून त्यांना काय सेवा हवी आहे? ते स्वतःमध्ये परिपूर्ण आहेत. त्यांना कोणत्याही सेवेची आवश्यकता नाही. पण जर तुम्ही त्यांची सेवा करायला उत्सुक असाल तर ते नाकारत नाहीत. ती त्यांची दया आहे; ती त्यांची उदारता आहे. तर जितकी अधिक श्रीकृष्णांची सेवा करण्याची चिंता वाढवता, तेवढी ती परिपूर्ण बनते. ते अमर्याद आहेत. तुमची चिंता, तुम्ही अमर्याद बनता. तर स्पर्धा आहे. जितकी अधिक श्रीकृष्णांची सेवा तुम्ही करता तितके अधिक ते तुम्हाला स्वीकारतात आणि तितकी अधिक बुद्धी तुम्हाला देतील. तुम्ही पाहता? आध्यात्मिक जग अमर्याद आहे. सेवेला शेवट नाही, आणि सेवाचा स्वीकार करण्याला कोणताही शेवट नाही. ते असे नाही. म्हणून उत्सुकता. तत्र लौल्यम एक मूल्यम (चैतन्य चरितामृत मध्य ८.७०) ते आहे…मी याचे उत्तर तयार करत नाही, पण मी रूप गोस्वामी, आमच्या आचार्यांचे पुरावे देत आहे. ते म्हणतात, कृष्ण-भक्ती-रस-भाविता मति: क्रियतां यदि कुतो अपि लभ्यते: सज्जनहो, माझ्या प्रिय मुले आणि मुली, जर तुम्ही खरेदी करू शकता… तुमची श्रीकृष्णांवर प्रेम करायची भावना - मी कसे श्रीकृष्णांवर जास्तीतजास्त प्रेम करू शकेन' - हि चिंता जर तुम्ही ह्या मति: ला खरेदी करू शकता," - तर बुद्धिमान; ती खूप छान बुद्धिमत्ता आहे," 'मी कशी श्रीकृष्णांची सेवा करू…' " कृष्ण-भक्ती-रस-भाविता मति:. मति: म्हणजे बुद्धिमत्ता किंवा मनाची स्थिती, "मी श्रीकृष्णांची सेवा करीन." "जर तुम्ही मनाच्या या स्थितीला कुठे खरेदी करू शकता तर कृपया लगेच करा." मग पुढचा प्रश्न असेल की, "ठीक आहे, मी खरेदी करेन. किंमत काय आहे, तुम्हाला माहित आहे का?" " हो, काय किंमत आहे मला माहित आहे. " "ती किंमत काय आहे?" "लौल्यम, फक्त तुमची उत्सुकता, त्यात सर्व आले." लौल्यम एकं मूल्यम. (चैतन्य चरितामृत मध्य ८.७०) "अरे ते माझ्याकडे आहे." नाही न जन्म कोटिभिस सुकृतिभिर लभ्यते. श्रीकृष्णांवर प्रेम करायची उत्सुकता, ती अनेक जन्मानंतरही मिळत नाही. म्हणून जर तुम्हाला थोडी जरी चिंता असेल की, "मी श्रीकृष्णांची सेवा कशी करू?" तुम्हाला माहित असले पाहिजे की तुम्ही सर्वात भाग्यवान व्यक्ती आहात. एक चिमूटभर,लौल्य, हि चिंता, "मी कशी श्रीकृष्णांची सेवा करू शकतो?" हे खूप छान आहे. मग श्रीकृष्ण आपल्याला बुद्धी देतील.

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् बुद्धीयोगं ददामि तं… :(भ.गी. १०.१०)

"जो कोणी माझ्या सेवेत प्रेमाने आणि स्नेहभावाने गुंतलेला असेल कोणत्याही दांभिकतेशिवाय," मग श्रीकृष्ण सर्वकाही समजू शकेल. ते माझ्या हृदयात आहेत,तुमच्या हृदयात आहेत, मग ते तुम्हाला बुद्धी देतील: "माझ्या प्रिय मुला, तू असं कर. आणि ते करून तो काय साध्य करेल? येन मामुपयान्ति ते: "तो माझ्याकडे परत येईल." आणि तिथे जाऊन त्याचा काय फायदा होईल? यद्गत्वा न निवर्तन्ते तध्दाम परमं मम (भ.गी. १५.६) | मां हि पार्थ व्यपाश्रित्य येsपि स्यु: पापयोनय: ((भ.गी. ९.३२)) | दुःखालयमशाश्वतम् (भ.गी. ८.१५) । बरेच आहेत. कृपया भगवद् गीता जशी आहे तशी वाचा. तुम्हाला परिपूर्ण ज्ञान, देवाचे शास्त्र मिळेल. मनुष्यांसाठी हा एकमेव अभ्यास आहे. फक्त तुमची उत्सुकता श्रीकृष्णांची सेवा करण्याची परिपूर्णता आहे. ती उत्सुकता वाढावा. आणि उत्सुकता म्हणजे जर तुम्ही श्रीकृष्णांवर प्रेम केले, वाढत्या प्रेमाने ती उत्सुकता वाढेल. "मी कशी श्रीकृष्णांची सेवा करू?" कारण तुम्ही ऐच्छिक सेवक आहात, कोणीही जबरदस्ती करत नाही. याचा अर्थ असा की जर तुम्ही श्रीकृष्णांवर प्रेम केले नाही, तर ती उत्सुकता कशी वाढेल? श्रीकृष्णांवर प्रेम करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. श्रवणं कीर्तनं ही सुरवात आहे. हे श्रवणं, ऐकणे, आणि जप करणे. ऐकणे, तुम्ही हरे कृष्ण ऐकता, तुम्ही भगवद् गीता ऐकता, तुम्ही श्रीकृष्णांबद्दल असलेले श्रीमद-भागवत ऐकणे. आणि जप करता. हि सुरवात आहे. मग नैसर्गिक,

श्रवणं कीर्तनं विष्णोः 
स्मरणं पाद-सेवनम् 
अर्चनं वन्दनं दास्यं 
सख्यमात्मनिवेदनम्
(श्रीमद भागवतम ७.५.२३)

या श्रीकृष्णांच्या नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा तुम्हाला ज्ञान देतील, तुमची कृष्णभावनामृतात प्रगती करतील, आणि तुमचे जीवन यशस्वी होईल. इतर काही प्रश्न? समजण्याचा प्रयत्न करा, प्रश्न. अशी कोणतीही गोष्ट नाही जी जबरदस्तीने देत आहोत. तुम्हाला बुद्धी आहे. श्रीकृष्णांनी तुम्हाला बुद्धी दिली आहे. तुमच्या बुद्धीने समजण्याचा प्रयत्न करा पण टाळण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे प्रश्न समजण्यासाठी करा, टाळण्यासाठी प्रश्न करू नका. दोन प्रकारचे प्रश्न आहेत. हा प्रश्न तुमची मदत नाही करणार. जर तुम्ही टाळण्याचा प्रयत्न कराल, तर श्रीकृष्ण टाळण्यासाठी तुम्हाला मदत करतील. आणि जर तुमची श्रीकृष्णांना पकडण्याची इच्छा असेल, तर श्रीकृष्ण तुमची मदत करतील की कसे तुम्ही पकडू शकाल. दोन गोष्टी सुरु आहेत.तुम्हाला पाहिजे असलेला मार्ग तुम्ही स्वीकारू शकता. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् (भ.गी. ४.११) | श्रीकृष्ण व्यक्तीच्या वृत्तीनुसार मदत करतात. जर… इथे आहेत… असे अनेक तत्वज्ञानी आहेत, ते श्रीकृष्णांना विसरू इच्छित आहेत. जसे तुम्हाला डॉ. राधाकृष्णांच्या पुस्तकात सापडेल, नवव्या अध्यायात कृष्ण सांगतात. मन्मना भव मद्भत्त्को मद्याजी मां नमस्कुरु(भ.गी. १८.६५) | भाषांतर सर्व ठीक आहे, पण ते म्हणतात, "असे नाही की तुम्ही श्रीकृष्णांना शरण गेले पाहिजे." जरा पहा. याचा अर्थ त्याची पुस्तक लिहिण्याची संपूर्ण प्रक्रिया लोकांची दिशाभूल करण्यासाठी आहे. कसे एखादा श्रीकृष्णांना विसरु शकतो. म्हणून जर कोणी श्रीकृष्णांना विसरु इच्छित असेल, श्रीकृष्ण त्याला अशी बुद्धी देतील की तो कधीच श्रीकृष्णांना समजू शकणार नाही. पण जर कोणी श्रीकृष्णांवर प्रेम करायचा प्रयत्न करत असेल, श्रीकृष्णांना समजण्याचा ते पूर्ण बुद्धी देतील, तुम्ही समजू शकता. ते कृष्ण आहेत. तुम्हाला पूर्ण स्वतंत्र मिळाले आहे. पण जर तुम्ही श्रीकृष्णांना विसरलात, तर तुम्हाला मायेची सेवा करावी लागेल, आणि जर तुम्ही श्रीकृष्णांवर प्रेम केलेत, तर माया तुम्हाला सोडेल.