MR/Prabhupada 0367 - वृंदावनाचा केंद्रबिंदू कृष्ण आहे

Revision as of 05:22, 28 January 2019 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0367 - in all Languages Category:MR-Quotes - 1975 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 7.1 -- Bombay, December 20, 1975

तर श्रीकृष्ण त्याला समजण्यासाठी वैयक्तिकरित्या भगवद् गीता शिकवतात, तर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे, नाहीतर आपण मनुष्य जीवनात मिळालेली हि संधी गमावू. श्रीकृष्ण भगवद् गीता कुत्र्या आणि मांजरांना शिकवत नाही. ते सर्वात प्रभावशाली व्यक्तीला शिकवत आहेत. इमं राजर्षयो विदुः (भ.गी. ४.२) | तर भगवद् गीता राजर्षीसाठी आहे, खूप श्रीमंत, त्याच बरोबर संत व्यक्ती. पूर्वी सर्व राजे राजर्षी होते. राजा आणि ऋषी एकत्र. तर भगवद् गीता मवाली लोकांसाठी नाही. समाजातील प्रमुखाद्वारे समजली पाहिजे. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः (भ.गी. ३.२१) | तर जे समाजाचे नेते असण्याचा दावा करत आहेत. त्यांनी भगवद् गीता शिकली पाहिजे. कसे व्यावहारिक आणि वास्तविक नेता बनले पाहिजे, त्यानंतर समाजाचा फायदा होईल. आणि जर आपण भगवद् गीता आणि कृष्ण यांची शिकवण अनुसरली, तर सर्व समस्यांचे निराकरण होईल. ती सांप्रदायिक भावना किंवा कट्टरतावाद नाही. ते तसे नाही. ते विज्ञान - सामाजिक विज्ञान, राजकीय विज्ञान, सांस्कृतिक विज्ञान. सर्वकाही आहे.

तर आमची विनंती आहे की तुमच्यापैकी प्रत्येकजण गुरु बना. तो चैतन्य महाप्रभूंचा आदेश आहे. त्यांना हवे होते की प्रत्येकजण गुरु बनला पाहिजे. कसे? तर त्यांनी सांगितले: यारे देख तारे कह कृष्ण-उपदेश आमार आज्ञाय गुरु हना तार एइ देश:(चैतन्य चरितामृत मध्य ७.१२८)

हा गुरु आहे. समजा तुम्ही कुटुंबातील सदस्य आहात. तर अनेक जीव, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमची सून, किंवा जावई, तुम्ही त्यांचे गुरु बनू शकता. यासारखेच तुम्ही संध्याकाळी बसून भगवद् गीतेबद्दल बोलू शकता. यारे देख तारे कह कृष्ण-उपदेश (चैतन्य चरितामृत मध्य ७.१२८) । तुम्हाला काहीतरी निर्माण करण्याची गरज नाही. सूचना आहे. तुम्ही फक्त पुनरुच्चार करा आणि त्याना ऐकू द्या - तुम्ही गुरु बनता. हे अजिबात कठीण नाही. तर तो आपला प्रचार. आम्ही एकटे गुरु बनू इच्छित नाही, पण आम्ही अशा प्रकारे प्रचार करू इच्छितो की प्रत्येकजण, प्रमुख व्यक्ती, किंवा कोणतीही व्यक्ती, तो त्याच्या परिसरात गुरु बनू शकतो. कोणीही हे करू शकतो. अगदी हमाल, तो देखील, त्याला कुटूंब आहे, मित्र आहेत, तर जरी अगदी तो अशिक्षित आहे, तो श्रीकृष्णांचे आदेश ऐकू शकतो, आणि तो त्याचा प्रचार करू शकतो. हे आम्हाला हवे आहे. आणि आम्ही सर्व सन्माननीय सज्जन, नेत्यांना आमंत्रित करतो. हे खूप सोपे आहे: मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु (भ.गी. १८.६५), आणि या कृष्णांच्या आदेशाचे पालन केल्याने, त्यांनी आश्वासन दिले आहे, मामेवैष्यसि, "तुम्ही माझ्याकडे याल." यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम (भ.गी. १५.६) | त्यक्त्वा देहं पुर्नजन्म नैति मामेति कौतेय (भ.गी. ४.९) । खूप सोपी गोष्ट.

तर आमची एकच विनंती आहे की समाजातील नेत्यांनी भगवद् गीतेची शिकवण गंभीरपणे स्वीकारली पाहिजे. स्वतः शिका, आणि इतरांना शिकवा. ते कृष्णभावनामृत अंदोलन आहे. ते अजिबात कठीण नाही; ते खूप सोपे आहे. प्रत्येकजण करू शकतो. पण त्याचा परिणाम जेव्हा तुम्ही समजाल, तेव्हा लोक कृष्ण समजतील. जन्म कर्म च मे दिव्यं यो जानाति तत्त्वतः (भ.गी. ४.९),लोक कृष्ण समजतील. जन्म कर्म च मे दिव्यं यो जानाति तत्त्वतः (भ.गी. ४.९), जो कोणी कृष्णाला समजतो, त्याचा परिणाम त्यक्त्वा देहं पुर्नजन्म नैति… या देहाचा त्याग केल्यावर पुन्हा तो नवीन भौतिक देह स्वीकारत नाही. तो आपल्या आध्यात्मिक स्वरूपात राहतो आणि श्रीकृष्णांच्या समाजात आनंद घेतो. ते वृंदावन आहे.. गोपिजन-वल्लभ. कृष्ण… कृष्ण, वृंदावन म्हणजे कृष्ण केंद्र आहे. ते सर्वांच्या प्रेमाचा विषय आहेत. गोपी, गुराखी मुले, वासरे, गायी, झाडे, फळे, फुले, वडील,आई - सर्वजण कृष्णाकडे आकर्षित झाले आहेत. ते वृंदावन आहे. तर हे वृंदावन प्रतिकृती आहे, आणि असे वास्तविक वृंदावन सुद्धा आहे. ते सुद्धा खरे आहे. परिपूर्ण मध्ये काही फरक नाही. पण आपल्या समजुतीसाठी मूळ वृंदावन आहे.

चिन्तामणिप्रकरसद्मसु कल्पवृक्ष
लक्षावृतेषु सुरभीरभिपालयन्तम्
लक्ष्मीसहस्रशतसम्भ्रमसेव्यमानं
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि
(ब्रह्मसंहिता ५.२९)
वेणुं क्वणन्तमरविन्ददलायताक्षं
बर्हावतंसमसिताम्बुदसुन्दराङ्गम्
कन्दर्पकोटिकमनीयविशेषशोभं
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि

(ब्रम्हसंहिता ५.३०).

हे गोलोक वृंदावनाचे वर्णन आहे.