MR/Prabhupada 0373 - भजहू रे मनचे तात्पर्य

Revision as of 04:19, 7 February 2019 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0373 - in all Languages Category:MR-Quotes - Unknown Date Category:MR-Qu...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Purport to Bhajahu Re Mana -- The Cooperation of Our Mind

भजहू रे मन श्री-नंद-नंदन-अभय चरणारविंद रे. हे गाणे गोविंद दास यांनी गायले आहे. कवी गोविंद दास. ते त्यांच्या मनाला संबोधित करीत आहेत, कारण, शेवटी, आपल्याला आपल्या मनाच्या सहाय्याने काम केले पाहिजे. जर आपले मन गोंधळलेले असेल, जर आपले मन आपल्याला दुसरे काही निवडण्यासाठी खेचत असेल तर एका विशिष्ट कामावर लक्ष केंद्रत करणे खूप कठीण आहे. ते व्यावहारिक आहे. म्हणून योग प्रणाली म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे. ती मनावर नियंत्रण ठेवण्याची यांत्रिक पद्धत आहे. कारण मनावर नियंत्रण ठेवल्याशिवाय, मनात गोंधळ निर्माण झाल्याशिवाय, आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. परंतु आमची वैष्णव प्रक्रिया मनाला थेट आध्यात्मिक सेवेत गुंतवण्याची आहे. जेणेकरून ते भक्ती सेवेच्या बाहेर जाऊ शकणार नाही. ती आमची प्रणाली आहे. आणि ती व्यावहारिक आहे. जर आपण आपले मन कृष्णाच्या पदकमलांशी केंद्रित केले, अर्चनं श्रवणं किर्तनं विष्णुः, स्मरणं पाद-सेवनं (श्रीमद भागवतम ७.५.२३) ।

पाद-सेवनं मग आपोआप मन नियंत्रित होते. योगी कृत्रिमरीत्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते अयशस्वी होतात. अनेक उदाहरणे आहेत, मोठे, मोठे योगी अयशस्वी होतात. तर कृत्रिमरीत्या केलेले काहीही पूर्णतः पूर्ण करणे शक्य नाही. म्हणून मनावर नियंत्रण मिळवण्याची पद्धत म्हणजे तुम्ही मनाला चांगल्या गोष्टीत गुंतवणे, मग मन कनिष्ठ शक्तीकडे आकर्षित होणार नाही . हे विज्ञान किंवा यशाचे रहस्य आहे. तर गोविंद दास कृष्णाच्या पदकमलांशी मन स्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत ज्याला अभय-चरण म्हणतात. अभय म्हणजे "जिथे भीती नाही." ज्याप्रमाणे आपण आपले पैसे विश्वसनीय बँकेत जमा करतो, कारण आपल्याला वाटते की तिथे हानीची काही भीती नाही. त्याला अभय म्हणतात, "कोणत्याही भीतीशिवाय," आणि चरण म्हणजे "पदकमल ." तर गिविंद दास त्यांच्या मनाला सल्ला देतात, हुरे मन "माझ्या प्रेमळ मना," हुरे मनाला संबोधतात. भज हुरे मन. भज. भज म्हणजे भक्तीच्या सेवेमध्ये व्यस्त रहा."

भज हुरे मन श्री-नंद-नंदन, "नंद महाराजांचा पुत्र कृष्ण त्याच्या सेवेत." असे अनेक कृष्ण आहेत, परंतु आमचा संबंध विशिष्ट कृष्णाशी जो नंद महाराजांचा पुत्र आणि वासुदेव पुत्राच्या रूपात आला. म्हणून ते सांगतात विशेष… जसे आपण एक व्यक्ती,त्याचे नाव त्याच्या वडिलांचे नाव ओळखतो, मग ती पूर्ण ओळख होते. म्हणून ते सांगतात श्री-नंद-नंदन; भजहू रे मन श्री-नंद-नंदन अभय-चरणारविंद रे, "त्याचे पदकमल आश्रय घ्यायला सुरक्षित आहेत." याचा बद्दल भागवतामध्ये अनेक श्लोक आहेत. समाश्रिता पदपल्लवप्लवं महत-पदं पुण्ययशो मुरारे: महत-पदं "कृष्णाच्या पदकमलांशी, संपूर्ण भौतिक सृष्टी स्थित आहे." म्हणून जर विशाल निर्मिती स्थित होऊ शकते, मी तर एक लहान तुच्छ जीव आहे. जर मी पदकमलांशी आश्रय घेतला, जे निर्भय आहे, कृष्णाचे, मग माझी सुरक्षा निश्चित आहे.

भजहू रे मन श्री-नंद-नंदन, अभय चरणारविंद रे, दुर्लभ मानव-जनम सत-संगे, तरोहो ए भव-सिंधू रे. दुर्लभ, "अत्यंत दुर्मिळ मनुष्य जन्म मिळाला आहे." दुर्लभ मानव-जनम. तर कृष्णाच्या पदकमलांशी मन स्थिर करण्यासाठी. आपण भक्तांच्या संगात राहणे आवश्यक आहे. दुर्लभ मानव-जनम सत-संगे. सत-संगे म्हणजे "भक्तांच्या संगात." जर आपण भक्तांच्या संगात राहिलो नाही, जर आपण स्वतंत्रपणे आपले मन कृष्णाच्या पदकमलांशी स्थिर करण्याचा प्रयत्न केला. ते शक्य नाही. ते अयशस्वी होईल. म्हणून ते म्हणतात सत-संगे, "भक्तांच्या संगात."

तरोहो ए भव-सिंधू रे, "जीवनाचा खरा उद्देश अज्ञानाचा महासागर पार करणे आहे." म्हणून जर आपण भक्तांच्या संगात कृष्णाच्या पदकमलांशी आपले मन स्थिर केले, तर आपण सहज अज्ञानाचा, भौतिक अस्तित्वाचा हा महासागर पार करू शकतो, मग, माझे वर्तमान कर्तव्य काय आहे? आता माझे वर्तमान कर्तव्य आहे: शीत आतप बात बरिषण, ए दिन जामिनी जागी रे. माझे भौतिक काम असे आहे की "मी कडाक्याच्या थंडीची चिंता करत नाही, मी कडक उन्हाळ्याची चिंता करत नाही, मी रात्री झोपण्याची चिंता करत नाही; मी दिवस आणि रात्र कठोर परिश्रम करत आहे."

शीत आतप बात बरिषण, ए दिन जामिनी जागी रे. आणि कशासाठी? कृपण, भीपले सेविनु कृपण दुर्जन, "कृपण दुर्जनांच्या सेवेसाठी." कृपण दुर्जन म्हणजे बाहेरचे लोक. तथाकथित भौतिक समाज, मैत्री, प्रेम वगैरे; प्रत्यक्षात ते बाहेरचे लोक आहेत. ते माझ्या जीवनात वास्तविक आध्यात्मिक प्रगती देऊ शकत नाहीत. पण आपण समाज, मैत्री, किंवा प्रेम, राष्ट्रवाद, समाजवाद यासारख्या अनेक सेवांमध्ये व्यस्त आहोत. आपला वेगवेगळ्या ठिकाणी सहभाग आहे, पण तो बिफले आहे.

बिफले म्हणजे "कोणत्याही परिणामाशिवाय." परिणाम असा की विशिष्ट प्रकारची मानसिकता निर्माण करतो, तथाकथित देशाला, समाजाला, कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी, आणि मृत्यू समयी मला माझ्या मानसिकतेनुसार शरीर स्वीकारावे लागेल. त्यामुळे लोक इतके घृणास्पद माध्यम स्वीकारत आहेत. तथाकथित समाज, मैत्री, आणि प्रेमाचा व्यवसाय चालू राहण्यासाठी. याचा परिणाम आहे की तो विशिष्ट प्रकारची मानसिकता निर्माण करीत आहे जी मानवी नाही, आणि परिणाम पुढील जन्मी त्याला त्या मानसिकतेनुसार शरीर स्वीकारायला भाग पाडले जाईल. म्हणून कृपण दुर्जन. कृपण म्हणजे "कंजूष." ते मला कोणतीही बुद्धिमत्ता, माझ्या जीवनातील वास्तविक गरजांचे ज्ञान प्रदान करणार नाहीत. पण तरीही आपण अशा दुर्जन "बाहेरच्या." लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहोत."

बिफले सेविनु कृपण दुर्जन चपल सुख-लब लागि' रे आणि तिथे थोडासाच आनंद आहे. नाहीतर, माणूस कसा दिवस आणि रात्र इतकी मेहनत करू शकतो. ख़ुशी आहे लैगिक आनंद, चपल, "चंचल." विद्यापतीनी गायले आहे, ततल सैकते वरि बिंदू-सम, "तो आनंद वाळवंटातील पाण्याच्या एका थेंबा सारखाच आहे." वाळवंटाला पाण्याची गरज आहे, पण थोडेसे पाणी घेतले आणि त्याच्यावर शिंपडले, "आता पाणी घ्या." तर त्या पाण्याची काय किंमत आहे? त्याचप्रमाणे, आपण उत्कटतेने शाश्वत आनंद शोधात आहोत, हे समाज, मैत्री आणि प्रेम आपल्याला काय देईल? म्हणून आपण आनंद मिळवण्याच्या बाबतीत आपला वेळ वाया घालवत आहोत. या तथाकथित भौतिकवादी जीवनातून, समाज, मैत्री आणि इतर सांभाळण्यात, वेळ वाया घालवतो. बिफले. बिफले म्हणजे "कोणत्याही चांगली परिणामाशिवाय."

बिफले सेविनु कृपण दुर्जन चपल सुख-लब लागि' रे "काही हरकत नाही, मी वैयक्तिकरित्या आनंद घेईन. मला माझे तारुण्य लाभले आहे. मी पैसे कमवू शकतो, आणि मी माझ्या कुटुंबाची काळजी करीत नाही." प्रत्यक्षात हे सध्याच्या क्षणी घडत आहे. कोणीही कुटूंबाची काळजी घेत नाही, पण तो स्वतःच्या देखभालीमध्ये व्यस्त आहे. त्याच्या तरुण आयुष्याचा आणि इतर अनेक गोष्टींचा उपयोग करण्यासाठी. तर… कवी गोविंद दास, सल्ला देतात, "माझ्या प्रिय मना, मी स्वीकार करतो की आता तुला तारुण्य मिळाले आहे, तू आनंद घेऊ शकतोस."

म्हणून तू सांगतोस ए धन यौबन पुत्र परिजन, इथे कि आचे परतिती रे, "संपत्तीचा हा संग्रह: पैशाची कमाई; आणि हे तरुण जीवन: आनंद घेतो." ए धन यौबन पुत्र परिजन, आणि समाजाद्वारे, मैत्री आणि प्रेम, तुम्हाला वाटत का, त्यात काही वास्तविक सुख किंवा दिव्य आनंद आहे? इथे कि आचे परतिती रे, "तर कमळाच्या पानावरील पाण्यासारखे आहे." कमल-दल-जल, जीवन तलमल. "या पाण्याचे अस्तित्व अस्थिर आहे, कोणत्याही क्षणी ते खाली पडेल."

खरं तर, आपला हा तारुण्य उपभोगण्याचा आनंद किंवा पैसे कमावण्याचा व्यवसाय, कोणत्याही क्षणी संपू शकतो. तर वास्तवात आपण विश्वास ठेऊ शकत नाही किंवा त्याप्रकारच्या आनंदावर विश्वास ठेऊ शकत नाही. हे चांगले नाही कारण कोणत्याही क्षणी ते संपुष्टता येऊ शकते. हे लोक गगनचुंबी इमारती बांधण्यात, बॅंक बॅलन्स वाढवण्यात, आणि चांगली मोटरकार बनवण्यात गुंतलेले आहेत, आणि इतर अनेक गोष्टीत ते आनंद घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण ते विसरतात की कोणत्याही क्षणी हे संपू शकते. कोणत्याही क्षणी. तर हे कमल-दल-जलसारखे आहे, "कमळाच्या पानावर पाणी ठेवण्यासारखे." ते रहाणार नाही, ते अस्थिर असते, कोणत्याही क्षणी खाली पडेल, उदाहरण खूप चांगले आहे.

म्हणून ते सल्ला देतात, श्रवण कीर्तन, ते मनाला निर्देश देतात की "हे करू नको, हे करू नको," अनेक नकारात्मक गोष्टी. मग पुढचा प्रश्न असेल, तर वास्तवात, मन गोविंद दासला विचारू शकते, "वास्तवात तुला नक्की काय करायचे आहे? तू या सर्व भौतिक गोष्टींना नाकारीत आहेस ठीक आहे, मग तुझा सकारात्मक प्रस्तव काय आहे?" ते सांगतात, "होय, माझा सकारात्मक प्रस्ताव हा आहे: श्रावण कीर्तन स्मरण वंदन, पाद-सेवन दास्य रे पूजन सखी-जन आत्म-निवेदन, गोविंद दास-अभिलाष रे."

"माझ्या प्रिय मना, माझी इच्छा आहे की तू मला कृपया मदत कर, अभय चरणारविंदबद्दल ऐकण्यासाठी, कृष्ण, श्रवण. आणि मला त्याच्या गौरवाचा जप करू दे, श्रवण कीर्तन. मला आठवण होऊ दे, मला त्याच्या पदकमलांची सेवा करू दे, मला त्याच्याशी मैत्री करू दे. प्रदान, जे काही माझ्याकडे आहे ते मला त्याला प्रदान करू दे. या माझ्या इच्छा आहेत. जर तू मला दयाळूपणे सहकार्य केलेस, तर मी ते करू शकेन." तर हे एक अतिशय प्रभावी गाणे आहे, मानवी जीवनाच्या उद्दिष्टा सार. आणि जो कोणी या तत्वाचे पालन करेल तो खरोखरच दिव्य आनंद अनुभवेल.