MR/Prabhupada 0379 - दशावतार स्तोत्र भाग १

Revision as of 04:27, 21 February 2019 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Hindi Pages with Videos Category:Prabhupada 0379 - in all Languages Category:HI-Quotes - Unknown Date Category:HI-Quot...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Purport to Dasavatara Stotra, CD 8

प्रलय-पयोधि-जले धर्तवान असि वेदं. हे गाणे, महान वैष्णव कवी जयदेव गोस्वामी यांनी गायले आहे. त्याचे तात्पर्य आहे की जेव्हा प्रलय होतो, संपूर्ण विश्व पाण्याने भरते. या भौतिक जगाचे सर्व प्रथम नाश होईल. तिथे पाणी नसेल, सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील सर्व पाणी सुकेल. सध्याच्या काळापेक्षा सूर्य बारापट तेजस्वी बनेल.

अशाप्रकारे सर्व पाण्याचे बाष्पीकरण, समुद्र, महासागराचे बाष्पीकरण होईल. म्हणून पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राणी मरतील आणि मग, तप्त उन्हामुळे, सगळ्याची राख होईल. मग तिथे शंभर वर्षे पाऊस असेल, मुसळधार पाऊस हत्तीच्या सोंडेसारखा, अशाप्रकारे संपूर्ण विश्व पाण्याने भरले जाईल. त्याला प्रलय-पयोधि म्हणतात. प्रलयाच्या वेळी, संपूर्ण विश्व होईल… जसे आता ते हवेने भरले आहे, त्यावेळी ते पाण्याने भरले जाईल. त्यावेळी एका नावेत भगवंतांद्वारे वेद वाचवले जातील. आणि नाव मोठ्या माशाच्या पंखात अडकली जाईल. मोठा मासा कृष्णाचा अवतार आहे. म्हणूनच ते आराधना करीत आहेत, केशव ध्रीता-मिन-शरीरा जय जगदीश.

तर मिन-शरीरा. पुढे क्षितीर विपुलतरे तिष्ठति तव पृष्ठे धरणी-धारण-किन-चक्र-गरिष्ठे. मग मंथन होईल, पुढील अवतार कासवाचा आहे. कासवाच्या पाठीवर मेरू-पर्वत ठेवला जाईल. किंवा कासवाच्या पाठीवर विश्व राहील. हा दुसरा अवतार आहे. पहिला मासा, आणि मग कासव. मग वराह-अवतार. एक असुर हिरण्य, हिरण्यकश्यपु आणि हिरण्याक्ष. तर तो त्याच्या असुरी प्रवृत्तीने पृथ्वीला गर्भोदक समुद्रात फेकतो. ब्रम्हांडात असा समुद्र आहे. गर्भोसमुद्रने अर्धे विश्व भरले आहे. त्यावर गर्भोदकशायी विष्णू आहे. आणि त्याच्यातून कमळ बाहेर येते, ज्याच्यावर ब्रम्हाचा जन्म होतो.

तर सगळे ग्रह या मूळ देठाचे वेगवेगळे देठ म्हणून तरंगत आहेत. गर्भोदकशायी विष्णूच्या उदरातून बाहेर येत आहेत. तर एक असुर हिरण्याक्ष नावाचा, तो या पृथ्वीला पाण्यामध्ये ठेवतो. आणि त्या वेळी, भगवंतांचा वराह अवतार होईल. ब्रम्हाच्या नाकातून एका छोट्या किड्याच्या रूपात वराह अवतार होतो. आणि जेव्हा त्यांनी त्याला हातावर ठेवले, तो वाढू लागला. अशा प्रकारे त्यांनी खूप विशाल शरीर धारण केले, आणि त्याच्या नाकाने, त्यानी पृथ्वीला गर्भोदकशायी महासागराच्या पाण्यातून उचलेले.

त्याला केशव-ध्रीता-वराह-रूप म्हणतात. पुढचे आहे तव कर-कमल-वरे नखां अद्भुत-श्रींगं. दलित-हिरण्यकश्यपू-तनु-भ्रिंगम. हिरण्यकश्यपु. तो आणखी एक असुर होतो ज्याला अमर व्हायचे होते. तर त्यानी ब्रम्हाकडून वर घेतला की जमिनीवर,आकाशात किंवा पाण्यात त्याला मरण येणार नाही, म्हणून ब्रम्हानी दिलेला वर राखण्यासाठी… भगवान कृष्ण आपल्या भक्तांच्या शब्दाचा मान राखण्याचा प्रयत्न करतात. तर ब्रम्हा त्याला वर देतात, होय, जमिनीवर, पाण्यात, आकाशात तुला मरण येणार नाही. पण नरसिंहदेव अर्धे सिंह, अर्धे मानवाच्या रूपात अवतरले. कारण हिरण्यकाशपूने असा सुद्धा वर ब्रम्हाकडून घेतला होता की तो कोणत्याही मानवाकडून किंवा प्राण्याकडून मारला जाणार नाही. म्हणून त्यानी असा अवतार घेतला ज्याला तुम्ही मानव किंवा प्राणी म्हणू शकत नाही. आणि त्यानी असुराला आपल्या मांडीवर घेतले, जी जमीन, पाणी किंवा आकाश नाही. आणि त्याला कोणत्याही हत्याराने मरण यायला नको होते.

म्हणून भगवंतांनी त्याला नखांनी मारले,नखाला हत्यार म्हणता येत नाही. अशा प्रकारे तो ब्रम्हाला फसवू इच्छित होते, पण भगवंत खूप हुशार आहेत. की त्यानी हिरण्यकश्यपूला फसवले आणि त्याला मारले. केशव ध्रीता-नरहरी-रूपा. दलित-हिरण्यकश्यपू-तनु-भ्रिंगम. ज्याप्रमाणे आपण आपल्या नखाने एखादा कीडा मरतो. मुगीं घ्या, तिला तुम्ही मारू शकता. त्याचप्रमाणे, हिरण्यकश्यपु मोठा असुर होता, त्याची तुलना अगदी लहान कीटकाशी केली गेली. आणि भगवंतांच्या नखांनी तो मारला गेला.