MR/Prabhupada 0384 - गौरंग बोलिते हबेचे तात्पर्य

Revision as of 04:51, 6 March 2019 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0384 - in all Languages Category:MR-Quotes - 1969 Category:MR-Quotes - P...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Purport to Gauranga Bolite Habe -- Los Angeles, January 5, 1969

नरोत्तम दास ठाकूर यांनी हे गाणे गायले आहे. ते म्हणतात, "तो दिवस कधी येईल, की मी केवळ चैतन्य प्रभूंचे नाव गाईन, आणि माझ्या शरीरावर रोमांच कधी उभे राहतील?" गौरांग बोलिते हबे पुलक-शरीर. पुलक-शरीर म्हणजे शरीरावर रोमांच उभे राहणे. जेव्हा एखादी व्यक्ती दिव्य स्तरावर स्थित असते, कधीकधी आठ प्रकारची लक्षण असतात: रडणे, वेड्या माणसाप्रमाणे बोलणे, आणि अंगावर रोमांच उभे राहणे, इतर माणसांची पर्वा न करता नाचणे… हि लक्षणे आपोआप विकसित होतात. त्याच कृत्रिमरीत्या सराव करत नाहीत.

तर नरोत्तम दास ठाकूर त्या दिवसासाठी इच्छुक आहेत. असे नाही की कोणी कृत्रिमरीत्या नक्कल करेल. ते याची शिफारस करत नाहीत. ते म्हणतात, "तो दिवस कधी येईल, की फक्त चैतन्य प्रभूंचे नाव घेऊन, माझ्या शरीरावर रोमांच उभे राहतील?" गौरांग बोलिते हबे पुलक-शरीर. आणि हरी हरी बोलिते: "आणि जसे मी हरी हरी जप करेन,' किंवा हरे कृष्ण,' माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतील." हरी हरी बोलिते नयने बाबे नीर म्हणजे पाणी.

त्याचप्रमाणे, चैतन्य महाप्रभु देखील असे म्हटले आहे की "तो दिवस कधी येईल?" आपण फक्त कामना केली पाहिजे. पण जर कृष्ण कृपेने, त्या स्तरापर्यंत पोचू शकलो, ती लक्षणे आपोआप दिसतील, पण नरोत्तम दास ठाकूर सांगतात की ते शक्य नाही, त्या स्तरापर्यंत पोचण्यासाठी भौतिक आसक्तितुन मुक्त झाल्याशिवाय. म्हणून ते म्हणतात, आर कबे निताई-चंदेर, करुणा होईबे: "केव्हा तो दिवस येईल, केव्हा प्रभू नित्यानंदांची कृपा माझ्यावर होईल…" विषय छाडिया. आर कबे निताई-चंदेरी करुणा होईबे, संसार-बासना मोर कबे तुच्छ हबे. संसार-बासना म्हणजे भौतिक उपभोगाची इच्छा. संसार-बासना मोर किबे तुच्छ हबे: "केव्हा माझी भौतिक आनंदाची इच्छा कमी होईल, महत्वहीन." तुच्छ. तुच्छ म्हणजे अशी गोष्ट ज्याची काही किंमत नाही: "ती फेकून द्या."

अशाप्रकारे आध्यात्मिक प्रगती शक्य आहे जेव्ह एखाद्याची खात्री पटते, की "हे भौतिक जग आणि भौतिक आनंदची काही किंमत नाही. ते मला जीवनाचा खरा आनंद देत नाही." हा विश्वास खूप आवश्यक आहे. संसार-बासना मोर किबे तुच्छ हबे: आणि ते असे सुद्धा सांगतात की "मी कधी भौतिक उपभोगाच्या इच्छेतून मुक्त होईन, तेव्हा वृंदावनाच्या वास्तविकप्रकृतीला पाहणे शक्य होईल." विषय छाडिया कबे शुद्ध हबे मन: केव्हा माझे मन पूर्णपणे शुद्ध होईल, भौतिक कल्माषापासून शुद्ध, त्यावेळी वृदावन काय आहे हे पाहणे शक्य आहे." वेगळ्या शब्दात, कोणीही वृन्दावनला सक्तीने जाऊन तिथे राहू शकत नाही, आणि तो दिव्य आनंद प्राप्त करू शकेल. नाही. त्याला आपल्या मनाला सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त केले पाहिजे. मग तो वृंदावनमध्ये राहू शकतो आणि निवासी लाभाचा स्वाद घेऊ शकतो.

तर नरोत्तम दास ठाकूर म्हणतात की. विषय छाडिया कबे शुद्ध हबे मन: "माझे मन केव्हा या भौतिक आनंदाच्या कल्मषातून मुक्त होईल. आणि मी शुद्ध होईन, मग वृंदावन जसे आहे तसे पाहणे शक्य होईल." नाहीतर ते शक्य नाही. आणि ते पुन्हा म्हणतात की वृंदावनला जाणे म्हणजे राधा आणि कृष्णाच्या दिव्य लीला समजण्यासाठी. हे कसे शक्य आहे? तर ते म्हणतात, रुप-रघुनाथ-पदे होईबे आकुती. रुप, रुप गोस्वामी, रुप गोस्वामींपासून रघुनाथ दास गोस्वामींपर्यंत, सहा गोस्वामी आहेत: रुप, सनातन, गोपाल भट्ट, रघुनाथ भट्ट, जीव गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी. तर ते म्हणतात, रुप-रघुनाथ-पदे: "रुप गोस्वामींपासून रघुनाथ दास गोस्वामींपर्यंत," पदे, "पदकमलांशी. केव्हा मी त्यांच्या पदकमलांना शरण जाईन…" रुप-रघुनाथ-पदे, होईबे आकुती. आकुती, उत्कंठा. ती उत्कंठा काय आहे? याचा अर्थ गोस्वामींच्या मार्गदर्शनानुसार राधा-कृष्ण समजणे होय. आपण राधा-कृष्ण स्वतःच्या प्रयत्नाने समजून घेण्याचा प्रयत्न करू नये. ते त्याला उपयोगी पडणार नाही.

या गोसावींनी, त्यांनी आपल्याला दिशा दाखवली आहे. ज्याप्रमाणे भक्ती रसामृत सिंधू. प्रगती कशी करावी यासाठी अनुसरण केले पाहिजे. मग एक सुदैवी दिवस असेल, जेव्हा आपण समजू शकू, राधा-कृष्णाच्या लीला किंवा प्रेमाच नातं काय आहे. नाहीतर, आपण सर्वसाधारण मुलगा आणि मुलगी पाहिली, त्यांच्या प्रेम भावना, मग आपण गैरसमजूत करून घेऊ. नंतर प्राकृत-साहजिय निर्माण होतील, वृंदावनात पीडित. तर नरोत्तम दास ठाकूर आपल्याला दिशा देत आहेत. आपण कसे राधा कृष्णाशी संबंध जोडणाऱ्या सर्वोच्च परिपूर्ण स्तरापर्यंत पोहोचायचे.

सर्वप्रथम आपण चैतन्य महाप्रभूंशी प्रामुख्याने जोडले गेले पाहिजे. ते आपले नेतृत्व करतील. कारण ते कृष्णभावनामृत समजून देण्यासाठी आले होते, म्हणून सर्वप्रथम आपण श्री, चैतन्य महाप्रभूंना शरण गेले पाहिजे. श्री. चैतन्य महाप्रभूंना शरण गेल्याने, नित्यानंद प्रभू प्रसन्न होतील. आणि त्यांना प्रसन्न करून, आपण भौतिक इच्छांमधून मुक्त होऊ. आणि जेव्हा भौतिक इच्छा असणार नाहीत, तेव्हा आपण वृंदावनात प्रवेश करु शकू. आणि वृंदावनात प्रवेश केल्यानंतर, जेव्हा आपण सहा गोस्वामींची सेवा करण्यास उत्सुक असू, तेव्हा आपण राधा कृष्णाच्या लीला समजण्याच्या स्तरापर्यंत पोहोचु शकतो,