MR/Prabhupada 0401 - श्री श्री शिक्षाटकं तात्पर्य
Purport Excerpt to Sri Sri Siksastakam -- Los Angeles, December 28, 1968
भगवान चैतन्य महाप्रभु त्यांच्या शिष्यांना कृष्णभावनामृत विज्ञानावर पुस्तक लिहायची आज्ञा देतात. हे कार्य त्यांच्या अनुयायांनी आजच्या तारखेपर्यंत पुढे चालू ठेवले आहे. . चैतन्य प्रभूंच्या शिकवणीच्या तत्वज्ञानावरील विस्तार आणि स्पष्टीकरण खरोखरच सर्वात मोठे, अचूक, आणि सातत्यपूर्ण आहे. जगातील कोणत्याही धार्मिक संस्कृतीच्या गुरु शिष्य परंपरेच्या अतूट प्रणालीमुळे जरी भगवान चैतन्य, त्यांच्या तरुणपणी स्वतः एक विद्वान म्हणून प्रसिद्ध होते, ते आपल्यासाठी केवळ आठ श्लोक ठेऊन गेले ज्याला शिक्षतकं म्हणतात श्री-कृष्ण संकीर्तनाचा गौरव असो. जे अनेक वर्षे साठलेला आपल्या हृदयातील मळ साफ करते.
अशाप्रकारे बद्ध जीवनाची आग, पुनर्जन्म आणि मृत्यूची विझली जाते. दुसरा श्लोक. माझ्या भगवंता, तुमचे पवित्र नाव समस्त प्राण्यांना आशीर्वाद देते. आणि म्हणून तुम्हाला शेकडो आणि लाखो नावे आहेत कृष्ण, गोविंद, इत्यादी. या दिव्य नावात तुम्ही तुमची संपूर्ण दिव्य शक्ती गुंतवली आहेत. आणि पवित्र नावाचा जप करण्यासाठी कोणतेही कठोर नियम नाहीत. हे प्रभू, तुमच्या कृपेने तुमच्या दिव्य नावाने तुमच्यापर्यंत पोहोचणे सुलभ केले आहे. पण मी दुर्दैवी आहे, मला त्याचे आकर्षण नाही. तिसरा. आपण मनाच्या विनम्र स्थतीत भगवंतांच्या पवित्र नावाचा जप करू शकतो. स्वतःला रस्त्यावरच्या गवताच्या काडीपेक्षाही कमी समजणे, झाडापेक्षाही जास्त सहनशील, खोट्या प्रतिष्ठेच्या सर्व भावनांशिवाय, आणि इतरांना आदर देण्यास तयार. मनाच्या या अवस्थेत आपण सतत भगवंतांच्या पवित्र नावाचा जप करू शकतो.