MR/Prabhupada 0406 - जो कोणी कृष्ण विज्ञान जाणतो, तो आध्यात्मिक गुरु असू शकतो

Revision as of 04:32, 6 May 2019 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0406 - in all Languages Category:MR-Quotes - 1967 Category:MR-Quotes - C...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Discourse on Lord Caitanya Play Between Srila Prabhupada and Hayagriva -- April 5-6, 1967, San Francisco

प्रभुपाद: पहिला देखावा असेल विजय नृसिंह गड मंदिराची यात्रा. हयग्रीव: विजय… प्रभुपाद: विजय नृसिंह गड. हयग्रीव: मी तुमच्यकडून नंतर या शब्दांचे वर्ण घेतो.

प्रभुपाद: मी शब्दांचे वर्ण देतो. वि-ज-य-नृ-सिं-ह-ग-ड. विजय नृसिंह गड मंदिर. हे विशाखापट्टणम शिपयार्ड जवळ आहे. विशाखापट्टणम इथे एक खूप मोठे शपयार्ड आहे. पूर्वी ते विशाखापट्टणम नव्हते. तर त्याच्या जवळ, त्या स्थानकापासून पाच मैल दूर तिथे टेकडीवर सुंदर मंदिर आहे. तर मला वाटते मंदिराचे दृश्य असू शकेल, आणि चैतन्य महाप्रभु त्या देवळाला भेट देत. आणि त्या देवळांतर, ते गोदावरी नदीच्या तीरावर आले. ज्याप्रमाणे गंगा नदी पवित्र नदी आहे, त्याचप्रमाणे अजूनही आहेत, चार इतर नद्या. यमुना, गोदावरी, कृष्ण, नर्मदा. गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, आणि कृष्ण. या पाच नद्यांनां खूप पवित्र मानले जाते. तर ते गोदावरी नदीच्या काठावर आले, आणि त्यांनी तिथे स्नान केले, आणि एका चांगल्या ठिकाणी झाडाखाली बसले, आणि हरे कृष्ण हरे कृष्ण जप करत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी पहिले की एक मोठी मिरवणूक येत आहे, आणि तो याचा देखावा असला पाहिजे… त्या मिरवणुकीचा… पूर्वीचे राजे आणि राज्यपाल, ते त्यांच्या लवाजम्यासह गंगेत स्नान करीत असत. बँड पार्टी आणि अनेक ब्राम्हण आणि अनेक प्रकारच्या धर्मार्थ वस्तू. अशाप्रकारे ते स्नान करायला येत असत. तर भगवान चैतन्य यांनी पहिले की कोणीतरी त्या मोठ्या मिरवणुकीत येत आहे, आणि त्यांना मद्रास प्रांताचे राज्यपाल रामानंद राय यांच्याबद्दल सांगितले गेले. सार्वभौम भट्टाचार्यांनी त्यांना विनंती केली की " तुम्ही दक्षिण भारताला जात आहात. तुम्ही रामानंद राय यांना जरूर भेटा. ते एक महान भक्त आहेत." तर जेव्हा ते कावेरी नदीच्या काठावर बसले होते आणि रामानंद राय मिरवणूक घेऊन येत होते, ते समजले की ते रामानंद राय आहेत. पण कारण ते सांन्यासी होते. त्यांनी त्यांना संबोधित केले नाही. पण रामानंद राय, ते एक महान भक्त होते, आणि त्यांनी एका चांगल्या संन्यासीला पाहिले. एक तरुण संन्यासी बसले आहेत आणि हरे कृष्ण जप करीत आहेत. साधारणपणे, संन्यासी ते हरे कृष्णाचा जप करीत नाहीत. ते, "ओम, ओम…" फक्त ओमकार. हरे कृष्ण नाही.

हयग्रीव: याचा काय अर्थ आहे. ते त्यानं संबोधित करणार नाहीत कारण ते संन्यासी आहेत? प्रभुपाद: संन्यासी, सांन्याशाना प्रतिबंध आहे त्यांनी गर्भश्रीमंत माणसाकडून भिक मागू नये किंवा त्याना पाहू नये. हे बंधन आहे. महिला आणि गर्भश्रीमंत पुरुष. हयग्रीव: पण मला वाटते की रामानंद राय भक्त होते.

प्रभुपाद: पण ते भक्त होते, पण निःसंशयपणे, पण बाह्यदृष्टीने ते राज्यपाल होते, बाह्यदृष्टीने. तर चैतन्य महाप्रभु त्यांच्याकडे गेले नाहीत, पण ते समजले की "इथे एक चांगला संन्यासी आहे." ते खाली उतरले आणि त्यांना नमस्कार केला आणि त्याच्यासमोर खाली बसले. आणि तिथे परिचय झाला, आणि भगवान चैतन्य म्हणाले की "भट्टाचार्यांनी मला तुझ्याबद्दल आधीच माहिती दिली आहे. तु एक महान भक्त आहेत. तर मी तुला भेटायला आलो आहे." आणि मग त्यांनी उत्तर दिले, ठीक आहे, भक्त? मी एक गर्भश्रीमंत व्यक्ती आहे, राजकारणी. पण भट्टाचार्य माझ्याप्रति अत्यंत दयाळू आहेत त्यांनी तुम्हाला मला भेटायला सांगितले. म्हणून जर तुम्ही आला असाल, तर कृपया, कृपया या भौतिक मायेतून मला मुक्त करा." तर रामानंद राय यांच्याबरोबर वेळ निश्चित करण्यात आली. आणि ते दोघे परत संध्याकाळी भेटले, आणि तिथे चर्चा झाली, मला म्हणायचे आहे, आध्यात्मिक जीवनाची प्रगती. भगवान चैतन्य यांनी त्यांची चौकशी केली आणि रामानंद राय यांनी उत्तर दिले. अर्थात, ती एक मोठी गोष्ट आहे, कसे त्यांनी प्रश्न विचारले आणि कशी त्यांनी उत्तरे दिली.

हयग्रीव: रामानंद राय. प्रभपाद: होय. हयग्रीव: बरं, ते महत्वाचे आहे का? ते दृश्य भेटीबद्दल आहे. प्रभुपाद: भेट, भेट, ती चर्चा तुला द्यायची इच्छा आहे. हयग्रीव: जर ती महत्वपूर्ण असेल तर ती या दृश्यात दाखवायची आहे.जर तुमची इच्छा असेल मी चर्चा सादर करू? प्रभुपाद: महत्वपूर्ण दृश्य आहे की रामानंद राय भेटले, ते मिरवणूक घेऊन आले, ते छान दृश्य आहे. या गोष्टी आधीपासूनच पूर्ण आहेत. आता फक्त चर्चे संबंधित आहे, चर्चेचे सार होते... हयग्रीव: मला फक्त थोडक्यात सारांश द्या.

प्रभुपाद: थोडक्यात सारांश. या दृश्यात चैतन्य महाप्रभु विद्यार्थी बनले. अगदी विद्यार्थी नाही. त्यांनी विचारले आणि रामानंद राय यांनी उत्तरे दिली. तर दृश्याचे महत्व हे आहे की चैतन्य महाप्रभु औपचारिकता पाळत नाहीत, फक्त संन्यासी आध्यात्मिक गुरु होऊ शकतो. ज्या कोणाला हे कृष्ण विज्ञान माहित असेल, तो आध्यात्मिक गुरु बनू शकतो. आणि हे उदाहरण प्रत्यक्षपणे दाखवण्यासाठी, जरी ते संन्यासी आणि ब्राम्हण होते. आणि रामानंद राय शूद्र आणि गृहस्थ, होते. तरीही ते विद्यार्थ्यांसारखे बनले आणि रामानंद राय यांची चोकशी केली. रामानंद राय यांना थोडे वाटले, मला म्हणायचे आहे की, संकोच, "मी कसा संन्याश्याच्या शिक्षकाची जागा घेऊ शकतो?" मग चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिले, "नाही, नाही. संकोच करू नका." त्यांनी सांगितले की एकतर एखादा संन्यासी असू शकतो किंवा तो गृहस्थ असू शकतो. किंवा एखादा ब्राम्हण किंवा शूद्र, त्याने काही फरक पडत नाही. कोणीही जो कृष्ण विज्ञान जाणतो, तो शिक्षकाची जागा घेऊ शकतो. तर ते त्याचे, मला म्हणायचे आहे, भेटवस्तू . कारण भारतीय समाजात, असे समजले जाते ब्राम्हण आणि संन्याशी आध्यात्मिक गुरु शकतात. पण चैतन्य प्रभू सांगतात, "नाही. कोणीही आध्यात्मिक गुरु बनू शकतो, जर तो कृष्ण विज्ञानात निष्णात असेल. आणि चर्चेचे सार होते. भगवंतांच्या प्रेमाच्या उच्चतम परिपूर्णतेमध्ये स्वतःला कसे प्रगत करवे. आणि भगवंतांचे प्रेम वर्णन केले आहे, अस्तित्वात, मला म्हणायचे आहे, राधाराणीमध्ये उत्कृष्ठ अव्वल दर्जाचे आहे. तर तो भाव राधाराणीच्या रूपात आणि रामानंद राय, राधाराणीची पार्षद ललिता सखीच्या रूपात. त्या दोघांनी आलिंगन दिले आणि परमानंदाने नृत्य करू लागले. तो या दृश्याचा शेवट असेल. ते दोघे आनंदाने नृत्य करू लागले.

हयग्रीव: रामानंद राय. प्रभुपाद: आणि चैतन्य महाप्रभु. हयग्रीव: ठीक आहे.