MR/Prabhupada 0065 - प्रत्येक जण सुखी होईल

Revision as of 17:53, 1 October 2020 by Elad (talk | contribs) (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Arrival Lecture -- Gainesville, July 29, 1971


स्त्री अतिथी : इतर व्यक्तींसाठी चळवळीत जागा आहे का? जो दिवसभर हरे कृष्ण बोलण्याऐवजी अप्रत्यक्षरित्या कृष्णाची सेवा करत आहे ?

प्रभुपाद: नाही, प्रक्रिया अशी आहे , जसे तुम्ही जर वृक्षाच्या मुळावर पाणी ओतले , तर पानं , फांद्या डहाळ्या या सर्वांना पाणी पोहोचते आणि ते टवटवीत राहतात . पण जर तुम्ही फक्त पानांवर पाणी ओतले . पाने सुद्धा सुकतील , आणि झाडंही सुकेल . जर तुम्ही अन्न पदार्थ पोटात टाकलेत , तर तुमची बोटं , केस , नखं आणि सगळीकडे ऊर्जा पोहोचवली जाते आणि जर तुम्ही अन्न हातात घेतले आणि पोटाला दिले नाही तर त्याचा काही उपयोग नाही . तर सर्व मानवतावादी सेवा वाया जात आहेत कारण तिथे कृष्ण भावना नाही आहे . ते मानवी समाजाची सेवा करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहात, परंतु ते सगळे निरुपयोगी प्रयत्नात हताश आहेत, कारण तिथे कृष्ण भावनेची जाणीव नाही आहे .

आणि जर लोकांना कृष्ण भावनेची जाणीव शिकवली तर आपोआप सर्व आनंदी होतील . जो कोणी सामील होईल, जो कोणी ऐकेल, जो कोणी सहकार्य करेल - सगळे आनंदी होतील तर आपली प्रक्रिया ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. तुम्ही देवावर प्रेम करता, आणि जर तुम्ही खरंच देवावर प्रीती करत असाल , नैसर्गिकपणे तुम्ही सर्वांवर प्रेम कराल . जसे कृष्ण भनेताला मनुष्य , तो देवावर प्रेम करत असल्याकारणाने तो प्राण्यांवर सुद्धा प्रेम करतो . तो पक्षी प्राणी सर्वांवर प्रेम करतो . पण तथाकथित मानवतावादी प्रेम म्हणजे ते काही माणसांवर प्रेम करतात, पण प्राण्यांची हत्या होत आहे . ते प्राण्यांवर प्रेम का नाही करत ? कारण अपूर्णता . पण कृष्ण भावनेतील मनुष्य कधीही प्राण्याला मारणार नाही किंवा प्राण्याला त्रास सुद्धा नाही देणार . पण हे सर्वव्यापक प्रेम आहे . जर आपण केवळ आपल्या भावावर किंवा बहिणीवर प्रेम केले तर ते सर्वव्यापक प्रेम नाही. सर्वव्यापक प्रेम म्हणजे तुम्ही सर्वांवर प्रेम कराल . हे सर्वव्यापक प्रेम कृष्ण भावनेद्वारे विकसित केले जाऊ शकते, इतर कशाने नाही .

स्त्री अतिथी : मला माहित आहे कि काही भक्तांना संबंध तोडावे लागले , त्यांच्या भौतिक विश्वाच्या आईवडिलांसोबत , आणि ते त्यांना काही प्रमाणात दुःखी करते , कारण त्यांचे पालक समजू शकत नाहीत. आता आपण त्यांना काय सांगाल ,या स्थितीला सोपे करण्यासाठी ?

प्रभुपाद: पहा , एक मुलगा जो कृष्ण भावनेमध्ये आहे, तो आपल्या पालकांना, कुटुंबांना, देशबांधवांना, समाजाला सर्वोत्तम सेवा देत आहे. कृष्ण भावना न बाळगता ते त्यांच्या पालकांना कोणती सेवा देत आहेत? मुख्यतः ते वेगळे राहतात . पण , जसे प्रहलाद महाराज, एक महान भक्त होते . आणि त्याचे वडील एक मोठे नास्तिक होते , इतकेच कि त्याच्या वडिलांना नृसिंहदेवांनी मारले होते , परंतु प्रल्हाद महाराज, जेव्हा त्यांनी काही वरदान मागावे अशी देवाने आज्ञा केली , ते म्हणले " मी व्यापारी नाही आहे , प्रभू , " की तुम्हाला काही सेवा देऊन मी काही परतावा घ्यावा . कृपया मला माफ करा. " नृसिंहदेव फार संतुष्ट झाले : " हा आहे एक शुद्ध भक्त ." पण याचशुद्ध भक्ताने भगवानांना विनंती केली, "माझ्या पालनकर्त्या, माझे वडील निरीश्वरवादी होते आणि त्यांनी अनेक अपराध केले आहेत, म्हणून मी तुला विनंति करतो की, माझ्या वडिलांना मुक्ती मिळावी . " आणि नृसिंहदेव म्हणाले, " तुझ्या वडिलांना आधीच मुक्ती मिळाली आहे कारण तू त्यांचा मुलगा आहेस . त्यांनी अनेक गुन्हे केले असूनही , ते मुक्त आहेत , कारण तू त्यांचा मुलगा आहेस फक्त तुझे वडील नाही , तुझ्या वडिलांचे वडिल, त्यांचे वडिल असे सात पिढ्या पर्यंत त्याचे वडील, ते सर्व मुक्त आहेत. "

म्हणून जर कुटुंबात जर वैष्णव आला तर तो केवळ त्याच्या वडिलांनाच नव्हे तर त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील या सर्वांना त्याच मार्गाने मुक्त करतो . म्हणून कृष्ण भावनेत येणे हि कुटुंबाची उत्तम सेवा आहे . वास्तविक, हे घडले आहे. माझा एक विद्यार्थी, कार्तिकेय, त्याची आई समाजाचे इतके वेड होते होते की जेव्हा कधी तो आपल्या आईला भेटायला जात असे , आई म्हणायची "बसून राहा , मी नृत्य पार्टी करायला जात आहे ." अशे संबंध होते . तरीही, हा मुलगा कारण, तो कृष्ण भावनायुक्त आहे , तो आपल्या आईशी अनेक वेळा कृष्णाविषयी बोलत असायचा . मृत्युच्या वेळी त्या आईने मुलाला विचारले, "तुझी कृष्ण कुठे आहे? तो इथे आहे?" आणि ती ताबडतोब मरण पावली. याचा अर्थ मृत्युच्या वेळी तिला कृष्णाची आठवण आली आणि लगेचच तिची सुटका झाली. ते भगवद-गीतेत सांगितले आहे ,

यं यं वापि स्मरन् लोके त्यजत्यन्ते कलेवरम् (भ गी ८।६ ).

मृत्यूच्या वेळी एखाद्याला कृष्णाचे स्मरण झाले असेल, तर त्याचे जीवन सफल झाले . तर ही आई, मुलाच्या कृपेमुळे, कृष्ण भावनायुक्त मुलामुळे , तिला मुक्ती मिळाली , कृष्ण भावना युक्त नसून सुद्धा . तर हा फायदा आहे.