MR/Prabhupada 0251 - गोपी श्रीकृष्णांच्या चिरंतर पार्षद आहेत
Lecture on BG 2.6 -- London, August 6, 1973
भगवद् गीतेची संपूर्ण शिकवण अशी आहे की: स्वतःसाठी करू नका, जे काही कराल ते केवळ श्रीकृष्णांसाठी करा. तर अगदी युद्ध पण श्रीकृष्णांसाठी, किंवा आक्षेपार्हही श्रीकृष्णासाठी करा. गोपींप्रमाणे. गोपी श्रीकृष्णांद्वारे आकर्षित झाल्या श्रीकृष्ण तरुण,खूप सुंदर होते, आणि गोपी तरुण मुली होत्या. ते वरवरचं आहे... वास्तविक, गोपी श्रीकृष्णांच्या चिरंतर पार्षद आहेत. आनंदचिन्मयरसप्रतिभाविताभीस ( ब्रम्हसंहिता ५.३७).ते श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहे, श्रीकृष्णांची आनंद शक्ती. त्या श्रीकृष्णांच्या आनंदासाठी आहेत. त्या सामान्य स्त्रिया नाहीत. पण वरवर, आपल्याला शिकवण्यासाठी कोणताही धोका पत्करून कसे श्रीकृष्णांवर प्रेम करायचे... म्हणून गोपी, जेव्हा त्या मध्यरात्री श्रीकृष्णांकडे आकर्षित झाल्या... श्रीकृष्ण बासरी वाजवत होते, आणि त्या आकर्षित झाल्या आणि त्यांनी घर सोडलं. . काहींना घरात अडकवल्या होत्या. त्यांनी त्याचा प्राण त्याग केला. त्या एवढ्या आकर्षीत झाल्या होती. आता, या प्रकारचे वागणे, जर तरुण मुली... वैदिक सांस्कृतिनुसार, त्या वडील,नवरा किंवा भाऊ यांच्या संरक्षणाशिवाय घराबाहेर पडू शकत नाहीत. नाही. त्या जाऊ शकत नाहीत. खासकरून मध्यरात्री. तर हे वैदिक संस्कृतीच्या विरुद्ध आहे. हे उघडउघड वेश्येप्रमाणे आहे. पण कारण हे श्रीकृष्णांसाठी होत. चैतन्य महाप्रभु, त्यांनी शिफारस केली, रम्या काचिद उपासना व्रज-वधुभि: कल्पिता: "व्रज गोपींच्या आराधनेपेक्षा इतर कुठलीही आराधना श्रेष्ठ नाही. व्रज-वधू. सर्वात वाईट. एका तरुण मुलीने पती आणि वडीलांना सोडून, आणि दुसऱ्या तरुण मुलाकडे जाणे वैदिक संस्कृतीनुसार, हे सर्वात तिरस्करणीय आहे. तरीही कारण केंद्रबिंदु श्रीकृष्ण होते, त्याचा उत्तम प्रकारची आराधना म्हणून स्वीकार होतो. त्याला कृष्णभावनामृत म्हणतात. आपण शिकलं पाहिजे कसे केवळ श्रीकृष्णांसाठी कर्म करायचे. केवळ श्रीकृष्णांवर प्रेम करायचे. मग आपलं आयुष्य यशस्वी होत. आणि मनुष्य जीवन... कारण अनेक वर्षांपूर्वी आपण सुद्धा वैकुंठातून खाली आलो आहोत. अनादी करम फले. अनादी म्हणजे निर्मितीपूर्वी, आपण जीव, आपण शाश्वत आहोत. लाखो आणि हजारो वर्षानंतर निर्मितीचा विनाश होतो,जीव, त्यांचा नाश होत नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे (भ गी २।२०) ते राहतात. तर जेव्हा संपूर्ण सृष्टी अव्यक्त होईल, तेव्हा जीव विष्णूंच्या शरीरात रहातील. मग परत जेव्हा सृष्टी व्यक्त होईल,ते त्यांच्या इच्छा पुऱ्या करायला परत बाहेर येतील. वास्तविक इच्छा कसे देवाच्या द्वारी परत जायचे तर हि संधी दिली आहे. जर हि संधी हुकली, हे आयुष्य,मनुष्य जीवन, ते खूप खूप,धोकादायक आहे. परत आपल्याला जन्म मृत्यूचे चक्र स्वीकारावे लागेल. आणि केवळ एवढेच नाही,जर आपण जीवनाचे ध्येय पूर्ण करत नसल्यास, मग परत संपूर्ण सृष्टी अव्यक्त होईल. आणि आपल्याला लाखो हजारो वर्षे विष्णूंच्या शरीरात राहावं लागेल. परत आपल्याला यावं लागेल. म्हणून याला म्हणतात अनादी करम-फल. अनादी म्हणजे "निर्मितीच्या पूर्वी." हे चालू आहे. आणि श्रीकृष्ण व्यक्तिशः बेपर्वा जिवांना शिकवण्यासाठी येतात. आपल्याला परत घरी नेण्यासाठी श्रीकृष्ण खूप उत्सुक आहेत. कारण आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत. समजा जर तुमचा मुलगा रेंगाळत असेल,तुम्ही चिंता करत नाही "अरे,काही अपघात होऊ शकतो,आणि आणि गरीब मुलगा मारला जाईल." तर तुम्ही जा,शोधण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे,श्रीकृष्णांची तीच परिस्थिती आहे. भौतिक जगात आहोत केवळ जन्मा मागून जन्म भोग भोगण्यासाठी. दुःखालयमशाश्वतम् (भ गी ८।१५) हि जागा दुःखदायक आहे. पण मायेचे मोहजाल, आपण जीवनाच्या या दुःखदायक परिस्थितीला सुख समजत आहोत. हिला माया म्हणतात. पण हे... इथे या भौतिक जगात आनंद नाही. सर्वकाही त्रासदायक. जसे आपण समजू की या भौतिक जगात सर्वकाही दुःखदायक आहे आणि जितक्या लवकर आपण हे भौतिक जग सोडण्याची तयारी करू आणि देवाच्याद्वारी परत जाऊ...ती आपली समज. नाहीतरी, जे काही आपण करत आहोत,आपण फक्त पराभूत होणार आहोत. कारण आपण उद्देश हरवत आहोत. न ते विदुः स्वार्थगति हि विष्णुं (श्री भ ७।५।३१). दुराशया. आम्ही आशेवर आहोत - जी कधीही पूर्ण होणार नाही.- आपण देवाच्या चेतनेशिवाय आनंदी होण्यासाठी गोष्टी सुधारण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे कधीही होणार नाही... न ते विदुः स्वार्थगति हि विष्णुं दुराशया. दुराशया म्हणजे "अशा जी कधीही पूर्ण होणार नाही."