MR/Prabhupada 0032 - जे काही मला बोलायचा आहे ते मी माझे पुस्तक मध्ये बोलले आहे

Revision as of 04:20, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Arrival Speech -- May 17, 1977, Vrndavana

प्रभुपाद: तर मी बोलू शकत नाही. मला अतिशय अशक्त वाटत आहे. मला चंडीगढ कार्यक्रमा सारख्या इतर ठिकाणी जायचे होते, पण मी कार्यक्रम रद्द केला कारण माझ्या आरोग्याची स्थिती अतिशय खालवत चालली आहे त्यामुळे मी वृंदावन मध्ये येणे पसंत केले. जर मृत्यू आला, तर इथे येऊ दे. त्यामुळे नवीन सांगण्या सारखे काही नाही आहे. मला जे काही बोलायचे होते, ते मी माझ्या पुस्तकात बोललो आहे. आता तुम्ही ते समजण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा प्रयास चालू ठेवा. कसे ही असले तरी मी उपस्थित असलो किंवा उपस्थित नसलो, काही फरक पडत नाही. जसे श्रीकृष्ण निरंतर जिवंत आहेत, त्याचप्रमाणे, जिवात्मे सुद्धा निरंतर जिवंत आहेत. पण कीर्तिर्यस्यस जीवति: "ज्याने कोणी भगवंतांची सेवा केली आहे तो कायमचा राहतो." त्यामुळे तुम्हाला श्रीकृष्णांची सेवा करण्यास शिकवले आहे, आणि श्रीकृष्णांबरोबर आम्ही अनंत काळासाठी राहू शकतो. आमचे जीवन अनंत आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे (भ.गी.२.२०). या शरीराचे तात्पुरते दृष्टीआड होणे, काही फरक पडत नाही. शरीर हे नष्ट होण्यासाठीच आहे. तथा देहान्तरप्राप्ति: (भ.गी. २.१३). तर श्रीकृष्णांची सेवा करून अनंत काळापर्यंत राहा. खूप आभारी आहे.

भक्त: जय!