MR/Prabhupada 0033 - महाप्रभू चा नाव पतित पावन आहे

Revision as of 04:22, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Morning Walk -- October 4, 1975, Mauritius

पुष्ट​ कृष्ण: आज सरकार जास्त नितीनियम गुंडाळणार्‍याला, पापी क्रियाकलाप करणार्‍यांना समर्थन देत आहे. तर सामान्य गट्ठा माणसांना सुधारणे कसे शक्य आहे?

प्रभुपाद: तुम्हाला असे म्हणायचे आहे का की सरकार पूर्णपणे निर्दोष आहे?

पुष्ट​ कृष्ण: नाही.

प्रभुपाद: मग ? त्यांना हलविणे आवश्यक आहे. सरकार म्हणजे, आजकाल, सर्व हरामखोर. ते हरामखोराद्वारे निवडून येतात आणि ते हरामखोर आहेत. ती अडचण आहे. तुम्ही कुठे ही जा, तुम्हाला फक्त हरामखोर भेटतील. मंद. व्याख्या दिली आहे, मंद. तरीही आमच्या शिबिरामध्ये अनेक हरामखोर आहेत. फक्त अहवाल पाहा. जरी ते सुधारणा करण्यासाठी आले असले, ते हरामखोर आहेत. ते त्यांच्या हरामखोर सवयी सोडू शकत नाही. म्हणून सामान्य विधान केले आहे. मंद: "सर्व वाईट." पण केवळ फरक हा आहे की आमच्या शिबिरात वाईट प्रवृती मध्ये सुधारणा होते; बाहेर सुधारणा होत नाही. इथे आशा आहे त्यांचे चांगले होण्याची, पण बाहेर आशा नाही आहे. तो फरक आहे. अन्यथा प्रत्येकजण वाईट आहे. कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता आपण म्हणू शकतो. मन्दाः सुमन्द मतयो (श्री.भा.१.१.१०). आता, सरकार कसे चांगले असेल? हे सुद्धा वाईट आहे. महाप्रभूंचे नाव आहे पतित-पावन; ते सर्व वाईट माणसांना मुक्त करतात. कली-युग मध्य कोणीही चांगला पुरूष नाही आहे, सर्व वाईट. तुम्हाला मजबूत बनायचे आहे वाईट माणसा बरोबर व्यवहार करताना.