MR/Prabhupada 0083 - हरे कृष्ण जपा सर्व काही येईल

Revision as of 18:07, 1 October 2020 by Elad (talk | contribs) (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 7.9.11-13 -- Hawaii, March 24, 1969

तर प्रल्हाद महाराज म्हणतात- आपण याआधीच यावर चर्चा केली आहे - कि यासाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही. शांत करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी , संतुष्ट करण्यासाठी, कोणत्याही पूर्व पात्रतेची आवश्यकता नाही : ओह, आपल्याला विद्यापीठात आपली परीक्षा उत्तीर्ण करावी लागते , किंवा आपल्याला रॉकफेलर किंवा फोर्ड सारखे समृद्ध मनुष्य बनणे आवश्यक आहे, किंवा तुम्हाला हे किंवा ते बनावे लागते ... कुठलीही अट नाही.अहैयतुकि अप्रतिहता .

जर तुम्हाला कृष्ण आवडत असेल, तर तिथे कोणती ही अट नाही रस्ता खुला आहे आपल्याला फक्त प्रामाणिक व्हावे लागेल. बस . मग कृष्ण मार्ग मोकळा करेल. आणि जर प्रामाणिकपणा नसेल, तर कृष्णाची माया आहे. ती नेहमीच, ती नेहमीच अडखळा , काही अडथळे आणेल : "हे नाही, हे नाही, हे नाही." तर प्रहलाद महाराजांनी ठरवले की "जरी मी एक लहान मूल आहे, माझ्याजवळ शिक्षण नाही, वेदांचा अभ्यास नाही , आणि नास्तिक पित्याकडून माझा जन्म झाला आहे, हीं कुळात , तर सर्व वाईट पात्रता ... तर , देव पूजाला जातो पवित्र बुद्धीच्या मनुष्यांकडून , जे वैदिक भजने देवाला अर्पण करतात , आणि ब्राह्मण हे अत्यंत सुसंस्कृत लोकांकडून .

तर माझ्याकडे अशी काहीच योग्यता नाही . परंतु तरीही हे सर्व देवता जे आपल्या पदांवर इतक्या उच्च स्तरावर आहेत , त्यांनी मला विनंती केली आहे याचा अर्थ देव माझ्याद्वारे देखील शांत होऊ शकतो.नाही तर त्यांनी शिफारस कशी केली असती? तर मग माझ्याकडे जी काही योग्यता आहे, बुद्धिमत्ता आहे, ती मी कृष्णाला अर्पण करतो . " म्हणूनच ,आपले हि कृष्ण भावनामृत चळवळ अशीच आहे, की तुमची जी काही पात्रता आहे, ती पुरेशी आहे. तुम्ही त्या पात्रते सह सुरुवात करा . तुम्ही कृष्णाची ततुमच्या पात्रतेनुसार सेवा करण्याचा प्रयन्त करा . कारण वास्तविक पात्रता - तुमची सेवेची भावना आहे . ती खरी पात्रता आहे. म्हणून तुम्ही ती भावना विकसित करा , आपली बाह्य पात्रता, सौंदर्य, संपत्ती, ज्ञान, हे, हे, नाही. या गोष्टींचे मूल्य नाही. कृष्णाच्या सेवेत आल्यास त्या मौल्यवान बनतात . जर आपण जर खूप श्रीमंत व्यक्ती असाल , आपण आपली संपत्ती कृष्णाच्या सेवेमध्ये आणलीत तर .. ते ठीक आहे. परंतु सेवा करण्यासाठी आपण खूप श्रीमंत असले पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. तर प्रह्लाद महाराज म्हणतात,

नीचो अजया गुणा-विसर्गं अनुप्रविश्ठ: पूयेत येन पुमान अनुवर्नितेन (श्री भा ७।९।१२) .

आता एखादा असे विचारू शकतो की प्रह्लाद हा हीन कुळातल्या वडिलांचा मुलगा आहे . हा तर्क आहे. प्रह्लाद अपवित्र नाही, परंतु हे वादविवाद आहेत , राक्षसी प्रवृत्तीचे वडील , हीन कुळात जन्म असे अनेक वादविवाद ते करू शकतात. परंतु प्रल्हाद महाराज म्हणतात की "जर मला सुरवात करायची असेल , तर मी फक्त भगवंताचे गुण गौरव करेन , मग मी शुद्ध होईन ." जर मी शुध्दीकरण जप करतो करतो ... हा हरे कृष्ण मंत्र शुध्दीकरण प्रक्रिया आहे. असे नाही कि मला आधी शुद्ध व्हावे लागेल आणि मग हरे कृष्ण मंत्र जपायचा आहे , नाही. तुम्ही जप करणे सुरू करा . मग शुद्धीकरण होईल . आपण शुध्द व्हाल. आपण कोणत्या परिस्थितीत असाल , जप सुरू करा, काही फरक पडत नाही .

खरं तर मी हे माझे कृष्ण भावनामृत चळवळ सुरु केले - असे नाही कि ते अतिशय शुध्द स्थितीत आले होते . आपल्यापैकी प्रत्येकाला माहित आहे की जे माझ्याकडे आले होते , त्यांना बालपणापासून प्रशिक्षित केले गेले होते .. भारतीय पद्धतीनुसार , त्यांना स्वच्छ नियमांचेही ज्ञान नव्हते . शुध्दीकरण करणे तर दूर राहिले. आपण पहा भारतात ही पद्धत लहानपणापासून आहे, मुलाला स्नान करण्यासाठी, सकाळी दात घासण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. होय मला आठवतं, जेव्हा माझा दुसरा मुलगा चार वर्षांचा होता, नाश्त्याच्या आधी, मी त्याला विचारायचो , "मला तुझे दात दाखव." तर तो दाखवायचा ... "होय". "ठीक आहे, तु दात घासले आहेस , ठीक आहे, मग तुला नाश्ता करण्याची परवानगी आहे ". तर हे प्रशिक्षण तिथे आहे. पण इथे, या देशात,प्रशिक्षण .. अर्थात, काही ठिकाणी आहे, पण ते फार कडक नाही.. त्यामुळे काही फरक पडत नाही. फक्त हरे कृष्ण जपा. हरे कृष्णा ने सुरुवात करा. मग सर्व येईल. सर्व काही येईल..