MR/Prabhupada 0098 - श्री कृष्णाच्या सौंदर्याकडे आकर्षित व्हा: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0098 - in all Languages Category:MR-Quotes - 1972 Category:MR-Quotes - L...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
 
Line 8: Line 8:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0097 - मैं बस एक डाक चपरासी हूँ|0097|MR/Prabhupada 0099 - कैसे कृष्ण द्वारा मान्यता प्राप्त हो|0099}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0097 - मी साधा टपालखात्याचा शिपाई आहे|0097|MR/Prabhupada 0099 - श्रीकृष्णाद्वारे कसे ओळखले जाऊ|0099}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 18: Line 18:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|9ccFczRrcY8|श्री कृष्णाच्या सौंदर्याकडे आकर्षित व्हा -<br / >Prabhupāda 0098}}
{{youtube_right|nykF2kXpJYY|श्री कृष्णाच्या सौंदर्याकडे आकर्षित व्हा -<br / >Prabhupāda 0098}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->



Latest revision as of 18:08, 1 October 2020



The Nectar of Devotion -- Vrndavana, November 11, 1972


मदन-मोहन. मदन म्हणजे लैंगिक आकर्षण. मदन, लैंगिक आकर्षण,कामदेव,आणि भगवान श्रीकृष्णांना मदन मोहन म्हणतात. कोणी,मला म्हणायचंय,जर कोणी श्रीकृष्णांकडे आकर्षित झाले तर अगदी लैंगिक आकर्षणाकडे दुर्लक्ष करू शकतो. ती खरी परीक्षा आहे. ह्या भौतिक जगात मदन आकर्षित करत असतो. सगळे जण कामजीवनाकडे आकर्षित होतात. संपूर्ण भौतिक जग कामजीवनावर आधारित आहे.

यन्मैथुनादिगृहमेधिसुखं हि तुच्छं (श्री भ ७।९।४५)

इथे,आनंद,तथाकथित आनंद म्हणजे मैथुन,मैथुनादि. इथे मैथुनादि म्हणजे मैथुनापासून आनंदाची .संभोग साधारणपणे,लोक ..., माणूस लग्न करतो. लैंगिक इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने. मग त्याला मुलं होतात.मग परत,मुलं जेव्हा मोठी होतात,ती, मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करते आणि मुलगा दुसऱ्या मुली बरोबर लग्न करतो. ते सुद्धा त्याच हेतूने: कामजीवन. मग परत,नातवंड. अशा प्रकारे,हा भौतिक आनंद -श्रीयैश्वर्य प्रजेप्सव: (श्री भ १|२|२७))

मागच्या वेळी आम्ही चर्चा केली. श्री म्हणजे सौंदर्य, ऐश्वर्य म्हणजे संपत्ती, आणि प्रजा म्हणजे पिढी. तर सामान्यपणे,लोकांनां,त्यांना हे आवडत- चांगले कुटुंब,बँकेत चांगली शिल्लक. आणि छान बायको,चांगली मुलगी, सून. जर एखादया कुटुंबामध्ये सुंदर बायको आणि संपत्ती असेल. आणि महान... अनेक मुले, त्याला यशस्वी माणूस समजतात. तो यशस्वी झाला असे समजतात. तर शास्त्र म्हणते, "ह्याला यश म्हणायचं का? यश कामजीवनापासून सुरु होते, एवढेच आणि त्यांना सांभाळणे." तर यन्मैथुनादिगृहमेधिसुखं हि तुच्छं (श्री भ ७।९।४५)

इथे आनंदाची सुरवात कामजीवनापासून होते, मैथुनादि आपण ते वेगळ्या पद्धतीने मांडतो,पण हे मैथुन,कामजवनातील आनंद, डुक्करांमध्ये पण असतो. डुक्करसुद्धा,ते अख्खा दिवस इथे आणि तिथे खातात:"विष्ठा कुठे आहे? विष्ठा कुठे आहे?" आणि कसलाही भेदभाव न करता कामजीवनाचा आनंद घेतात. आई,बहीण किंवा मुलगी डुक्करांना काही फरक पडत नाही. तर म्हणून शास्त्र सांगत,"इथे ,ह्या भौतिक जगात,आपण बद्धावस्थेत आहोत. आपण ह्या भौतिक जगात कामजीवनामुळे जखडले गेले आहोत." ते म्हणजे कामदेव. कामजीवनाची कामदेव आहे. जोपर्यंत एखादा,त्याला काय म्हणणार,मदनाद्वारे प्रेरित,कामदेव, तो होऊ शकत नाही, मला म्हणायचंय, कामजीवनाचा पुरेपूर आनंद घेणे. आणि श्रीकृष्णांचे दुसरे नाव मदन-मोहन आहे. मदन-मोहन म्हणजे तो जो श्रीकृष्णांकडे आकर्षिला गेला आहे, त्याला कामजीवनापासून मिळणाऱ्या आनंदाचा विसर पडेल. हि खरी परीक्षा आहे. म्हणून त्याचे नाव मदन-मोहन आहे. इथे मदन-मोहन आहे. सनातन गोस्वामी मदन-मोहन पूजत होते. मदन किंवा मादन. मादन म्हणजे वेड होणे. आणि मदन,कामदेव. तर सर्वजण कामजीवनाद्वारे बेभान झाले आहेत.अशा खूप जागा आहेत... भागवतात असं सांगितलंय,

पुंस: स्त्रिया मिथुनी भावम् एतत् तयोर् मिथो हृदय-ग्रन्थिम अाहुर् ((श्री भ ५।५।८)

संपूर्ण जग चाललंय: पुरुष स्त्रीकडे आकर्षिला जातो,स्त्री पुरुषाकडे आकर्षली जाते. आणि, ह्या आकर्षणाच्या शोधात,जेव्हा ते एकत्र येतात. त्यांची ह्या भौतिक जगाची ओढ वाढतंच जाते. आणि ह्या प्रकारे, नंतर ते एकत्र येतात,किंवा लग्न झाल्यावर,एक स्त्री आणि पुरुष, ते सुंदर घर शोधतात,गृह; क्षेत्र,उपक्रम,व्यवसाय,कारखाना,किंवा कृषी क्षेत्र. कारण प्रत्येकाला पैसे कमवावे लागतात. तर, अन्न मिळण्यासाठी. गृह-क्षेत्र; सुत, मुलं, आणि आप्त, मित्र; वित्त, संपत्ती.

अतो गृहक्षेत्रसुताप्तवित्तै र्जनस्य मोहोsयमीहं (श्री भ ५।५।८)

ह्या भौतिक जगाची ओढ अधिकाधिक घट्ट होत जाते. ह्याला मदन म्हणतात. मदनाचे आकर्षण. पण आपला उद्देश ह्या भौतिक जगाच्या झगमगाटाकडे आकर्षिले जाता कामा नये तर श्रीकृष्णांकडे आकर्षिले गेले पाहिजे. त्याला कृष्णभवनामृत संघ म्हणतात. जोपर्यंत तुम्ही श्रीकृष्णांच्या सौदर्याकडे आकर्षिले जात नाही, आपल्याला ह्या भौतिक जगातल्या खोट्या सौन्दर्यावर समाधान मानाव लागत. म्हणूनच श्री यमुनाचार्य सांगतात की: यदावधी मम चेत: कृष्ण-पदारविन्दयोर नवं-नवं-धाम रंतुं असित "जेव्हापासून कृष्णांच्या सौन्दर्याकडे मी आकर्षित आणि तेव्हापासून मी त्यांच्या चरण कमलांची सेवा करू लागलो, आणि तेव्हापासून, मला नवनवीन ऊर्जा मिळायला लागली. जेव्हा केव्हा मी कामजीवनाचा संभोगाचा विचार करतो,मला त्यावर थुंकावंस वाटत." त्याला वित्रिशना म्हणतात. आकर्षण नाही. . ह्या भौतिक जगात आकर्षणाचा केंद्रबिंदू कामजीवन आहे, आणि, तेव्हा एखादा कामजीवनाच्या आकर्षणापासुन अलिप्त होईल... तदवधि मम् चेत:.....

यदावधि मम चेत: कृष्ण-पदारविन्दयोर्
नव-नव-(रस-)धाम(अनुद्यत)रन्तुम् अासीत् :
तदावधि बत नारी संगमे स्मर्यमाने
भवति मुख विकार: सुष्टु निष्ठीवननं च

"जेव्हा केव्हा मी लैगिक सुखाचा विचार करतो, तात्काळ माझे मुख विकाराने भरते आणि मी त्या विचारावर थुंकतो." तर म्हणूनच श्रीकृष्ण म्हणजे मदन-मोहन. मदन सगळ्याना आकर्षित करतो,कामजीवन, आणि कृष्ण,जेव्हा कोणी श्रीकृष्णांकडे आकर्षिला जातो,तेव्हा मदनाचा पराभव होतो. जेव्हा मदनाचा पराभव होतो,तेव्हा आपण भौतिक जगावर मात करतो नाहीतर हे फार कठीण आहे.