MR/Prabhupada 0235 - अपात्र गुरु म्हणजे ज्याला माहित नाही कसे शिष्याला मार्गदर्शन करायचे: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0235 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
 
No edit summary
 
Line 7: Line 7:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0234 - |0234|MR/Prabhupada 0236
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0234 - भक्त बनणे सर्वात मोठी योग्यता आहे|0234|MR/Prabhupada 0236 - एक ब्राम्हण, एक सन्यासी भिक्षा मागू शकतो, पण एक क्षत्रिय नाही, एक वैश्य नाही|0236}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 17: Line 17:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|wJnuJgAau9c|अपात्र गुरु म्हणजे ज्याला माहित नाही कसे शिष्याला मार्गदर्शन करायचे - Prabhupāda 0235}}
{{youtube_right|E4Rnz6UoC8I|Unqualified Guru Means Who Does not Know How to Guide the Disciple<br />- Prabhupāda 0235}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->



Latest revision as of 11:56, 1 June 2021



Lecture on BG 2.4-5 -- London, August 5, 1973

तर गुरूनहत्वा. कृष्ण भक्त, जर गरज असेल तर, जर तो अपात्र गुरु असेल तर... अपात्र गुरु म्हणजे ज्याला माहित नाही कसे शिष्याला मार्गदर्शन करायचे. मार्गदर्शन करणे गुरुचे कर्तव्य आहे. तर अशाप्रकारचे गुरु किमान नाकारले जाऊ शकतात. ते जीव गोस्वामी आहेत… कार्य-कार्यम अजानतः गुरूला माहित नाही काय करायचे आणि काय करायचे नाही, पण चुकून, चुकून मी एखाद्याला गुरु म्हणून स्वीकारले आहे, त्याला नकार देऊ शकतो. त्याला नाकारून, तुम्ही वास्तविक प्रामाणिक गुरु स्वीकारू शकता. तर गुरुची हत्या होत नाही, पण त्याला नाकारू शकतो. हा शास्त्राचा आदेश आहे.

तर भीष्मदेव किंवा द्रोणाचार्य, नक्कीच ते गुरु होते. पण कृष्ण अप्रत्यक्षपणे अर्जुनाला संकेत देत आहे. की "जरी ते गुरूच्या पदावर असले तरी तू त्यांना नाकारू शकतोस." कार्य-कार्यम-अजानतः. "त्यांना सत्यता माहित नाही." भीष्मदेवाना, भौतिकदृष्ट्या त्यांची अवस्था समजली होती. त्यांना पहिल्यापासून सर्वकाही माहित होते, की पांडव, ती पालक नसलेली, वडील नसलेली मुले होती, आणि त्यानी त्यांना लहानपणापासून वाढवले. इतकेच नाही, त्यांचे पांडवांवर खूप प्रेम होते ते विचार करीत होते, जेव्हा त्याना जगंलात पाठवले, निर्वासित केले, त्यावेळी भीष्मादेव रडत होते. की "हि पाच मुले, ती इतकी शुद्ध, इतकी प्रामाणिक आहेत. आणि फक्त शुद्ध आणि प्रामाणिक नाहीत, तर शक्तिशाली योद्धे, अर्जुन आणि भीम आणि द्रौपदी हि प्रत्यक्षात लक्ष्मी आहे. आणि भगवान कृष्ण त्यांचे मित्र आहेत. आणि ते दुःख सहन करीत आहेत?" ते रडले. ते इतके प्रेमळ होते.

म्हणून अर्जुन विचार करीत आहे, "मी कसे भीष्मांना मारू शकतो?" पण कर्तव्य इतके बलवान आहे. कृष्ण सल्ला देतात, "होय, त्याना मारले पाहिजे कारण ते विरुद्ध पक्षात गेले आहेत. ते त्यांचे कर्तव्य विसरले आहेत. ते तुमच्यात सामील व्हायला हवे होते. म्हणून ते आता गुरूच्या पदावर नाहीत. तू त्याना मारले पाहिजे. ते चुकून विरुद्ध पक्षात सामील झाले आहेत. म्हणून त्यांना मारण्यात काही गैर नाही. त्याचप्रमाणे द्रोणाचार्य. त्याचप्रमाणे द्रोणाचार्य. मला माहित आहे त्या महान व्यक्ती आहेत, त्याना खूप आपुलकी आहे. पण फक्त भौतिक विचाराने ते तिकडे गेले आहेत." ते भौतिक विचार काय आहेत?

भीष्मांनी विचार केला की "मी दुर्योधनाच्या पैशावर पोसला गेलो. दुर्योधन मला सांभाळत आहे. आता तो संकटात आहे. जर मी विरुद्ध पक्षात गेलो, तर मी कृतघ्न ठरेन. त्याने मला इतके दिवस सांभाळले. आणि जर संकटाच्या वेळी, जेव्हा लढाई आहे, जर मी विरुद्ध पक्षात गेलो, ते चुकीचे होईल…" त्यांनी अशाप्रकारे विचार केला. त्यांनी असा विचार केला नाही की "दुर्योधन सांभाळत असेल, पण त्याने पांडवांची मालमत्ता हडप केली आहे. पण ती त्यांची महानता आहे. त्यांना माहित होते की अर्जुन कधीही मारला जाणार नाही कारण तिकडे कृष्ण आहे. "तर भौतिकदृष्टया, मी दुर्योधनाशी कृतघ्न असले पाहिजे." तीच स्थिती द्रोणाचार्यांची होती. त्यांना सांभाळले होते.