MR/Prabhupada 0236 - एक ब्राम्हण, एक सन्यासी भिक्षा मागू शकतो, पण एक क्षत्रिय नाही, एक वैश्य नाही

Revision as of 04:17, 24 September 2019 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0236 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.4-5 -- London, August 5, 1973

म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की विषयीर अन्न खाईले मालिन हय मन (चैतन्य चरितामृत अन्त्य ६.२७८) अशी महान व्यक्तिमत्व कृतघ्न बनली कारण त्यांनी त्यांच्याकडून पैसे, अन्न घेतले. जर मला एखाद्या खूप भौतिकतावादी व्यक्तीकडून मिळाले असेल तर त्याचा माझ्यावर परिणाम होईल. मी देखील भौतिकतावादी बनेन. मी देखील भौतिकतावादी बनेन. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी इशारा दिला आहे की "जे विषयी आहेत. ते भक्त नाहीत. त्यांच्याकडून काही स्वीकारू नका कारण ते तुमचे मन अशुद्ध बनवेल." तर म्हणून एक ब्राम्हण आणि एक वैष्णव, ते थेट पैसे स्वीकारत नाहीत. ते भिक्षा स्वीकारतात. भिक्षा, भिक्षा तुम्ही घेऊ शकता… ज्या प्रमाणे इथे सांगितले आहे भैक्ष्यम. श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके भ.गी. २.५) जेव्हा तुम्ही कोणाकडे मागता… तरीही, काही वेळा खूप जास्त भौतिकतावादी व्यक्तीकडून देखील भिक्षा घेण्याला प्रतिबंध आहे. पण संन्याशांना, ब्राम्हणांना भिक्षा घेण्याला परवानगी आहे.

तर म्हणून अर्जुन बोलत आहे की "हत्या करण्यापेक्षा, असे महान गुरु ज्या महान व्यक्तिमत्व आहेत, महानुभावान…" तर भैक्ष्यम. क्षत्रियांसाठी… एक ब्राम्हण, एक सन्यासी भिक्षा मागू शकतात, पण एक क्षत्रिय नाही, एक वैश्य नाही. त्याला परवानगी नाही. फक्त… तो एक क्षत्रिय होता अर्जुन. तर तो म्हणतो, "मी ब्राम्हणाचा पेशा स्वीकारीन. आणि दारोदार जाऊन भिक्षा मागेन, माझ्या गुरूंची हत्या करून राज्य उपभोगण्यापेक्षा" तो त्याचा प्रस्ताव होता. तर एकूणच, अर्जुन मोहजालात अडकला - मोहजालात अडकणे म्हणजे तो त्याचे कर्तव्य विसरत आहे. तो एक क्षत्रिय आहे, त्याचे कर्तव्य लढणे आहे; अगदी विरुद्ध पक्ष, जरी त्याचा मुलगा असेल. एक क्षत्रिय अगदी त्याच्या मुलाची हत्या करायलाही मागे पुढे पाहत नाही जर तो हानिकारक असेल. त्याचप्रमाणे, मुलगा जर वडील हानिकारक असतील, तो त्याच्या वडिलांची हत्या करायला मागे पुढे पाहणार नाही.

ते क्षत्रियांचे कठोर कर्तव्य आहे, एक क्षत्रिय अशाप्रकारे विचार करीत नाही. म्हणून कृष्ण विचारतात, क्लैब्यं: "तू भित्रट होऊ नको. तू भित्रट का बनत आहेस?" हे विषय सुरु आहेत. नंतर, कृष्ण त्याला खऱ्या आध्यात्मिक सूचना देतील. या… मित्रा मित्रामधील सर्व सामान्य गोष्टी सुरु आहेत.

ते ठीक आहे. आभारी आहे.