MR/Prabhupada 0257 - तुम्ही कसे भगवंतांनी केलेला कायदा बदलू शकाल

Revision as of 12:34, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture -- Seattle, September 27, 1968

तर आमचा कार्यक्रम भगवान श्रीकृष्णांची उपासना करणे हा आहे. गोविन्दमादिपुरुष तमहं भजामि. या भौतिक जगात प्रत्येकजण आनंद मिळवण्याच्या आणि दुःखातून मुक्तता मिळवण्याच्या शोधात आहे. दोन गोष्टी चालू आहेत, प्रयत्न. विविध प्रक्रिया आहेत. भौतिक प्रक्रिया निरर्थक आहे. ते आधीच सिद्ध झाले आहे. काही प्रमाणात भौतिक सुखसोयी किंवा आनंद, तथाकथित आनंद, आपल्याला खरा आनंद देऊ शकेल आशाच्या शोधात आपण आहोत. ते शक्य नाही. मग तिथे इतर विविध पद्धतीसुद्धा आहेत. आपल्या भौतिक बद्धावस्थेमुळे तीन प्रकारचे भोग आहेत. अध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. अध्यात्मिक म्हणजे शरीर आणि मनाशी संबंधित. ज्याप्रमाणे काहीवेळा शरीरातील चयापचय क्रियेवर परिणाम होतो, आपल्याला ताप येतो, आपल्याला काही वेदना होतात,डोकेदुखी - अनेक गोष्टी. तर या दुःखांना अध्यात्मिक म्हणतात, शरीराशी संबंधित. आणि आणखी भाग या अध्यात्मिक दुःखचा जे मनामुळे होते. समजा माझं खूप नुकसान झालं. म्हणून मनाची अवस्था चांगली नाही. तर हे सुद्धा भोग आहेत. शरीराच्या रोगग्रस्त अवस्थेत किंवा मानसिक असंतोषामुळे, दुःख आहेत. मग परत,अधिभौतिक - इतर जीवांनी दिलेला त्रास. ज्याप्रमाणे आपण मानवप्राणी आहोत, दररोज आपण लाखो गरीब प्राणी कत्तलखान्यात पाठवत आहोत. ते व्यक्त करू शकत नाहीत,पण याला अधिभौतिक म्हणतात. इतर जीवांनी दिलेला त्रास. त्याचप्रमाणे, आपल्याला सुद्धा इतर जीवांनी दिलेला त्रास भोगावा लागतो. देवाचा न्याय तुम्ही नाही, मला म्हणायचंय,बदलू शकत. भौतिक कायदा, राज्याचा कायदा,तुम्ही स्वतःला लपवू शकता, पण देवाच्या कायद्यापासून तुम्ही स्वतःला लपवू शकत नाही. तिथे अनेक साक्षीदार आहेत. सूर्य तुमचा साक्षी आहे,चंद्र तुमचा साक्षी आहे,दिवस तुमचा साक्षी आहे,रात्र तुमची साक्ष आहे, आकाश तुमचं साक्षी आहे. तुम्ही कसे देवाच्या कायद्याचे उल्लंघन करु शकता. तर…पण हा भौतिक निसर्ग असा घडवला आहे की आपल्याला भोगावे लागते. अध्यात्मिक,शरीरामुळे,मनामुळे, आणि इतर जीवनी दिलेले त्रास, आणि इतर भोग अधिदैविक. अधिदैविक,ज्याप्रमाणे एखादा भूताने झपाटलेला आहे, त्याच्यावर भूताने हल्ला केला आहे. भूत दिसू शकत नाही, पण तो झपाटलेला आहे,तो काहीतरी मुर्खासारखे बोलत आहे. किंवा दुष्काळ आहे, भूकंप आहे, युद्ध आहे, साथीचा रोग आहे,अनेक गोष्टी. तर त्रास नेहमीच असतात. पण आपण परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. भोग नेहमीच आहेत.प्रत्येकजण दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे.ते सत्य आहे. अस्तित्वासाठी संपूर्ण संघर्ष हा दुःखातून बाहेर पडण्यासाठी आहे. पण तिथे वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत. कोणी सांगेल की भोगापासून मुक्तता अशाप्रकारे होईल, कोणी सांगेल की भोगापासून मुक्तता तशाप्रकारे होईल. तिथे आधुनिक वैज्ञानिकांनी,तत्वज्ञानींनी दिलेले नियम आहेत. नास्तिक किंवा आस्तिकांद्वारे, कार्मिक इतर अनेक आहेत. पण कृष्णभावनामृत चळवळीनुसार, तुम्ही सर्व दुःखातून बाहेर पडू शकता. जर तुम्ही फक्त तुमच्या चेतनेत बदल केलात, एवढंच. ते कृष्णभावनामृत आहे. जसे मी अनेक वेळा तुम्हाला उदाहरण दिले आहे… आपले सगळे भोग हे ज्ञानाच्या अभाव, अज्ञानामुळे आहेत. ते ज्ञान अधिकारी व्यक्तींच्या संगतीत मिळवता येऊ शकेल.